व्हेज पुलाव
व्हेज पुलाव हा फायबर चा उत्तम स्रोत आहे हा पचायला हलका आणि आरोग्यासाठी लाभदायक आहे फायबर सोबतच आपण इतर भाज्यांचा देखील ह्यात समावेश करतो जसे कि , गाजर , मटार , बीन्स , कोथिंबीर इत्यादी ज्यातून आपल्याला पोषक असे मूल्य मिळतात
1] Veg Pulau kasa banvaycha
व्हेज पुलाव कसा बनवायचा
साहित्य
१ वाटी बासमती तांदूळ
अडीच वाटी उकळलेलं गरम पाणी
पाव कप गाजर [ उभे किंवा आडवे तुकडे ]
पाव कप मटार
पाव पेक्षा थोडे कमी फ्लावर चे तुकडे [ बारीक ]
१ शिमला मिरची [ बारीक आडवी कापलेली ]
१ कांदा
१ बटाटा
दिड चमचा तूप
६ ते ७ काजू बी
१ हिरवी मिरची
१ चमचा आलं लसूण पेस्ट
चवीप्रमाणे मीठ
गरम मसाले / मसाले साहित्य
२ तमालपत्र
१ ते २ लवंग
१ ते २ वेलची
१ मिरी
कृती ;
तांदूळ स्वछ पाण्याने २ ते ३ वेळा धुवून घेणे
१० ते १५ मिन त्यात पाणी टाकून तसेच बाजूला ठेवून देणे
ज्यात पुलाव बनवायचा आहे ते पातेले / कढई गॅस वर ठेवून मंद आचेवर गरम करायला ठेवणे
त्यात तूप गरम करावे
तमालपत्र , लवंग , मिरी आणि वेलची घालून ५ ते ६ सेकंद परतून घ्यावे
नंतर त्यात हिरवी मिरची उभी चिरलेली , आलं लसूण पेस्ट आणि काजू परतून घ्यावे
पाण्यात ठेवलेले तांदूळ निथळून घ्यावे , ५ मिनिट ने निथळून झालेला तांदूळ मध्यम आचेवर हलका मोकळा होईपर्यंत परतून घ्यावा
साधारण ५ ते १० मिनिट नंतर सर्व भाज्या आपल्याला हव्या तश्या आकाराने बारीक चिरलेल्या एकत्र टाकून परतून घ्यावे
२ ते ३ मिनिट परतून झाल्यावर त्यात उकळते पाणी टाकावे , थंड पाणी टाकल्यामुळे चव कमी होते , म्हणून शक्यतो गरम पाणी टाकावे
त्यात चवीप्रमाणे मीठ घालून चांगलं एकत्र करावे
लगेच झाकण ठेवू नये
कढईतील थोडं पाणी कमी झाल्यावर , गॅस मंद आचेवर करावा आणि झाकण ठेवावा
वाफेवर भात शिजून द्यावा
१ ते २ मिनिट नंतर भात अलगद चमच्याने हलवून घ्यावा
बासमती भाताचे शीत मोडणार नाहीत ना , घट्ट होणार नाही ना ह्याची काळजी घ्यावी
पुन्हा झाकण ठेवून १० ते १५ मिनिट मध्ये वाफ घ्यावी
अश्याप्रकारे VEG पुलाव तयार आहे
बारीक उभा चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
लिंबू
काजू [तळून घेतलेले ]
ह्या सर्व veg पुलाव च्या वरून टाकून गार्निश करून सर्व्ह करावे
तो तुम्ही लोणचं , कोशिंबीर आणि पापड सोबत खाऊ शकता
टीप :
गरम मसाल्यांचा वापर तुम्हाला हवा तसा कमी जास्त प्रमाणात तुम्ही करू शकता
भाज्या सुद्धा आपल्याला आवडतात त्या प्रमाणे अजून भाज्या त्यात टाकू शकता
वेग पुलाव चे फायदे :
वेग पुलाव हा फायबर चा उत्तम स्रोत आहे
हा पचायला हलका आणि आरोग्यासाठी लाभदायक आहे
फायबर सोबतच आपण इतर भाज्यांचा देखील ह्यात समावेश करतो जसे कि , गाजर , मटार , बीन्स , कोथिंबीर इत्यादी
ज्यातून आपल्याला पोषक असे मूल्य मिळतात
…………………………………
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)