डाळ मेथी
मेथीचा उच्च डोस घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. जर तुम्ही मधुमेहाचे औषध घेत असाल तर तुम्ही मेथी आहारात घेऊ नये कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण खूप कमी होऊ शकते (हायपोग्लायसेमिया). मेथी रक्तातील पोटॅशियमची पातळी कमी करू शकते.
डाळ मेथी
साहित्य :
दीड कप तूरडाळ ,
२ मोठे कप बारीक चिरलेली मेथीची पाने ,
१ लहान बारीक चिरलेला टोमॅटो ,
३-४ हिरव्या मिरचीचे तुकडे ,
२ कप पाणी ,
१ चमचा तेल ,
अर्धा चमचा मोहरी ,
अर्धा चमचा जिरे ,
१ चमचा लसूण - हिरव्या मिरचीची पेस्ट ( ८-१० लसूण पाकळ्या आणि ३-४ हिरव्या मिरची ) ,
पाव चमचा हळद ,
अर्था चमचा लाल तिखट ,
१ चमचा बेसन ,
१ चमचा शेंगदाण्याचा कूट ,
चवीनुसार मीठ .
कृती:
भांड्यात तूरडाळ घ्या . पाण्याखाली चांगली धुवा . धुतलेली आणि बारीक चिरलेली मेथी पाने डाळीत घालून मिक्स करा . त्यातच टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घाला . कुकरच्या डब्यामध्ये ही तूरडाळ घेऊन पाणी घाला . झाकण बंद करून फक्त १ शिट्टी काढून घ्या . तडक्यासाठी एका कढईत तेल गरम करा . तेल गरम झाल्यावर मोहरी घाला आणि ती तडतडू द्या . त्यात जिरे घाला . नंतर हिंग आणि मिरची पेस्ट घाला . सुमारे एक मिनिट परतून घ्या . त्यात हळद , लाल तिखट आणि बेसन घाला . फक्त एक मिनिट परतून घ्या . आता त्यात शिजवलेली डाळ आणि मेथी घाला . चांगलं मिक्स करा . आपल्या आवडीनुसार पाणी घालून चांगले नीट ढवळून घ्या . भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला . मीठ घालून चांगले मिक्स करा . सुमारे ५-७ मिनिटे उकळी काढा . गॅस बंद करा .
टीप : ही भाजी ज्वारी , बाजरी किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर छान लागते . साध्या भाताबरोबरही छान लागते .
मेथीचा उच्च डोस घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. जर तुम्ही मधुमेहाचे औषध घेत असाल तर तुम्ही मेथी आहारात घेऊ नये कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण खूप कमी होऊ शकते (हायपोग्लायसेमिया). मेथी रक्तातील पोटॅशियमची पातळी कमी करू शकते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)