Ladki Bahini Yojana : 'या' महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे; लाभार्थ्यांची होणार फेरतपासणी

मुंबई

0 12
Ladki Bahini Yojana : 'या' महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे; लाभार्थ्यांची होणार फेरतपासणी

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेली लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली. या योजनेमुळे देशभरातील लाखो महिलांना मोठा फायदा झाला. या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला १५०० रुपये सरकारकडून पाठवण्यात येतात. आता या योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची होणार फेरतपासणी

लाडकी बहीणच्या योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले, अशा तक्रारी ज्या भागांमधून आल्या त्या ठिकाणी फेर तपासणी केली जात होती. मात्र आता सगळ्यांचीच फेरतपासणी होणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच अद्याप काही अर्जांची छाननी होण्याचं काम बाकी आहे. या अर्जांची छाननी देखील काटेकोर पद्धतीने करण्यात येणार आहे.

‘या’ महिलाना मिळणार नाही योजनेचा फायदा

अडीच लाखहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आता फेरतपासणीत जर अशा महिला आढळल्या तर त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नसल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे लाडकी बहीण योजनेची पात्रता?

1) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
2) राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
3) किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
4) लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User