पुडाची चटणी कशी बनवायची

हरभरा डाळीचे फायदे : 1] नेहमी हरभरे खाण्याने मधुमेही व्यक्तींची इन्सुलिनची गरज कमी होते. लघवीतून जाणा-या साखरेचे प्रमाणही घटते. 2] हरभ-याच्या ताज्या पानांत लोह भरपूर असते. म्हणून लोहाच्या कमतरतेमुळे होणा-या रक्तक्षयावर ही पाने अत्यंत चांगली आहेत. या पानांचा चमचाभर रस मधात मिसळून घ्यावा. 3] अकाली रेतस्खलन व वंध्यत्व यावर दोन चमचे डाळीचे पीठ, थोडी साखर, खजूर वाटून व साय काढलेल्या दुधाची पावडर असे मिश्रण करून घ्यावे, फायदा होतो. 4] डाळीचे पीठ त्वचेला लावल्यास डाग जाऊन त्वचा गोरी व कांतीमान होते. इसब, सांसर्गिक त्वचारोग, खरूज यावर हे पीठ उपकारक असते. मुरमेही जातात. यासाठी पीठ दह्यात भिजवावे व त्याचा लेप चेह-यावर देऊन थोडा वेळ ठेवावा तसेच चण्याच्या पिठाने केस धुतल्यास ते मऊ व स्वच्छ होऊन केसाचे रोग होत नाहीत.

0 10
पुडाची चटणी कशी बनवायची
पुडाची चटणी

पुडाची चटणी कशी बनवायची

पुडाची सुकी चटणी कशी बनवायची

 

साहित्य

१ वाटी हरभऱ्याची डाळ

अर्धी वाटी पांढरी उडीद डाळ

१ चमचा तांदूळ

१ चमचा तीळ

अर्धी वाटी सुकलेले खोबऱ्याचा किस

छोटा चमचा धने

छोटा चमचा जिरे

८ ते ९ लाल सुक्या मिरच्या

चिमुटभर हिंग

मीठ चवीप्रमाणे

 

कृती

प्रथम कढई मध्ये उडीद डाळ , तांदूळ , हरभऱ्याची डाळ , तीळ , जिरे , धने , लाल सुक्या मिरच्या सर्व जिन्नस मंद  गॅस वर खमंग भाजून घ्यावे

सर्व जिन्नस एका ताटात काढून थंड होण्यास ठेवावे

त्याच कढईत सुके खोबऱ्याचा किस लालसर होईल पर्यंत खरपूस भाजून घ्यावर , त्यातच हिंग टाकावे

सर्व जिन्नस थंड झाल्यावर मिक्सर मध्ये घ्यावे त्यात चवीप्रमाणे मीठ घालून  बारीक करून घ्यावे , पूर्णतः बारीक न करता हलकी जाडसर करून ठेवावी

अशी हि पुडाची चटणी तयार आहे

हवा बंद डब्यात हि चटणी काढून ठेवा

 

मला हि चटणी गरम गरम इडली सोबत खूप आवडते , अप्रतिम लागते नक्की खाऊन बघा

 

हरभरा डाळीचे फायदे :

1] नेहमी हरभरे खाण्याने मधुमेही व्यक्तींची इन्सुलिनची गरज कमी होते. लघवीतून जाणा-या साखरेचे प्रमाणही घटते. 

2]  हरभ-याच्या ताज्या पानांत लोह भरपूर असते. म्हणून लोहाच्या कमतरतेमुळे होणा-या रक्तक्षयावर ही पाने अत्यंत चांगली आहेत. या पानांचा चमचाभर रस मधात मिसळून घ्यावा. 

3] अकाली रेतस्खलन व वंध्यत्व यावर दोन चमचे डाळीचे पीठ, थोडी साखर, खजूर वाटून व साय काढलेल्या दुधाची पावडर असे मिश्रण करून घ्यावे, फायदा होतो. 

4]  डाळीचे पीठ त्वचेला लावल्यास डाग जाऊन त्वचा गोरी व कांतीमान होते. इसब, सांसर्गिक त्वचारोग, खरूज यावर हे पीठ उपकारक असते. मुरमेही जातात. यासाठी पीठ दह्यात भिजवावे व त्याचा लेप चेह-यावर देऊन थोडा वेळ ठेवावा तसेच चण्याच्या पिठाने केस धुतल्यास ते मऊ व स्वच्छ होऊन केसाचे रोग होत नाहीत. 

 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User