पालक पुलाव
रक्तदाबावर (blood pressure) फायदेशीर- पालकमध्ये भरपूर नायट्रेट असते, ज्यामुळे रक्तदाबाची पातळी संतुलित राहते आणि हृदयविकारापासून बचाव होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पालक खाल्ल्यानं रक्तदाबाची पातळी प्रभावीपणे कमी होते. त्यामुळे हृदय निरोगी राहते. पालकामध्ये पोटॅशियम भरपूर असतं आणि सोडियमचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळं रक्तदाबाच्या रुग्णांनी पालक जरूर खाल्ला पाहिजे.
पालक पुलाव
पालक भात पुलाव कसा बनवायचा
Palak Rice Kasa Banvaycha
साहित्य :
• २ वाट्या तांदूळ
• २ पालकच्या जुड्या
• ३/४ वाटी डाळीचे पीठ
• २ चमच धणे पूड
• ४-५ हिरव्या मिरच्या
• १/२ चमचा हळद
• लहानसा आल्याचा तुकडा
• २५ ग्रॅम काजू , २ कांदे
• ४-५ लवंगा , ३-४ वेलदोडे
• दालचिनीच्या ३-४ काड्या
• १०-१२ काळे मिरे ,
१/२ वाटी दही
• मीठ
कृती :
• पालकाची पाने हातानेच काढून घ्यावीत व धुऊन अगदी थोड्या पाण्यात वाफवून घ्यावीत . नंतर चाळणीवर ओतून सर्व पाणी काढून टाकावे.नंतर पालक , मिरच्या , आले वाटून घ्यावे . • तांदूळ धुऊन निथळत ठेवावेत . थोड्या तुपावर डाळीचे पीठ जरा भाजून घ्यावे . नंतर हळद , मीठ , धणेपूड , वाटलेला पालक व डाळीचे पीठ एकत्र करुन त्याचे छोटे छोटे गोळे करुन तळून घ्यावेत . • सर्व मसाला थोड्या तुपावर भाजून घ्यावा . कांदा उभा चिरुन घ्यावा व थोड्या तुपावर कांदा लालसर रंगावर येईपर्यंत परतून घावा . काजूही बदामी रंगावर येईपर्यंत परतून घ्यावेत . • • कांदा व काजू बाजूला ठेवावेत . थोड्या तुपात २ लवंगा व २ वेलदोडे टाकून फोडणी करावी . त्यात तांदूळ घालून जरा परतावेत . नंतर त्यावर वाटलेला मसाला घालावा . • १/२ वाटी दही व मीठ घालून भात करुन घावा . निखार्यावर किंवा कुकरमध्ये भात गरम राहील असाच ठेवा . आयत्या वेळी भात उकरुन काढल्यावर त्यावर पालकाचे गोळे , कांदा व काजू घालून वाढावा . हा भात फारच रुचकर लागतो .
पालक खाण्याचे फायदे
1 रक्तदाबावर (blood pressure) फायदेशीर- पालकमध्ये भरपूर नायट्रेट असते, ज्यामुळे रक्तदाबाची पातळी संतुलित राहते आणि हृदयविकारापासून बचाव होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पालक खाल्ल्यानं रक्तदाबाची पातळी प्रभावीपणे कमी होते. त्यामुळे हृदय निरोगी राहते. पालकामध्ये पोटॅशियम भरपूर असतं आणि सोडियमचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळं रक्तदाबाच्या रुग्णांनी पालक जरूर खाल्ला पाहिजे.
2 रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढवतो पालक- हिवाळ्याच्या मोसमात लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. पालक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतो. आरोग्य तज्ज्ञ हिवाळ्यात अधिकाधिक पालक खाण्याचा सल्ला देतात. त्यात केवळ बीटा-कॅरोटीनच समृद्ध नाही, तर त्यात सर्व आवश्यक अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. त्यात व्हिटॅमिन सी देखील भरपूर आहे, जे शरीराला संक्रमणाशी लढण्यास मदत करतं.
3 हिमोग्लोबिन वाढवतो - ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे, त्यांनी आपल्या आहारात पालकाचा समावेश करावा. पालकामध्ये भरपूर प्रमाणात फोलेट असतं, जे लाल रक्तपेशी वाढवण्यासाठी आवश्यक मानलं जातं.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)