महाराष्ट्रीयन पुरण पोळी
पुरण पोळी हि एक पारंपरिक महाराष्ट्रीयन मराठी रेसिपी आहे. बहुतेक अश्या फेस्टिव्हल च्या वेळी पुरण पोळी खास बनवली जाते. विशेष ह्यात चणा डाळ आणि गूळ ह्यांचं मोजमाप नीट जमलं कि पुरण पोळी कशी बनवायची हे समजत महराष्ट्रातील सणा मधील खास पदार्थ म्हणून पुरण पोळी हि ओळखली जाते . पुरणपोळी हि महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेच पण त्याबरोबर ती गुजरात , केरळ इत्यादी ठिकाणी देखील बनवली जाते . जसा देश तसा वेष असं म्हंटल जात , तसेच प्रत्येक देशात प्रदेशात गावात पुरण पोळी बनवण्याच्या पद्धतीमध्ये भिन्नता दिसून येते .
Puran Poli Kashi Banvaychi
Puran Poli
महाराष्ट्रीयन पुरणपोळी
पुरण पोळी हि एक पारंपरिक महाराष्ट्रीयन मराठी रेसिपी आहे.
बहुतेक अश्या फेस्टिव्हल च्या वेळी पुरण पोळी खास बनवली जाते.
विशेष ह्यात चणा डाळ आणि गूळ ह्यांचं मोजमाप नीट जमलं कि पुरण पोळी कशी बनवायची हे समजत
माझी आई म्हणते , ज्या मुलीला पुरण पोळी कशी बनवायची ह्याच गुपित कळल ती खरी सुगरण .
पुरण पोळीचे वैशिष्ट्य :
कोणत्याही सणाच्या दिवशी किंवा कोणत्या आनंदाच्या क्षणी गोड धोड पदार्थ बनवायचा असेल तर पुरण पोळी हा पदार्थ केव्हाही उत्तम आणि सगळ्यांना आवडणारा.
सगळ्यांना वाटत पुरण पोळी खूप अवघड पदार्थ आहे , खूप वेळ जातो हा पदार्थ बनवायला
पण खरं तर पुरण पोळी हा घरात सहज उपलब्ध राहील अश्या घटकांमध्ये लवकर बनणारा पदार्थ आहे ,
पुरण पोळीचे अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर देवाला नैवैद्य म्हणून पुरण पोळीचा गोड पदार्थ म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो . होळी , नागपंचमी , अक्षयतृतीया , गुढी पाडवाच्या वेळी विशेष करून पुरण पोळीचा नैवैद्य हा दाखवला जातो.
महराष्ट्रातील सणा मधील खास पदार्थ म्हणून पुरण पोळी हि ओळखली जाते .
पुरणपोळी हि महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेच पण त्याबरोबर ती गुजरात , केरळ इत्यादी ठिकाणी देखील बनवली जाते . जसा देश तसा वेष असं म्हंटल जात , तसेच प्रत्येक देशात प्रदेशात गावात पुरण पोळी बनवण्याच्या पद्धतीमध्ये भिन्नता दिसून येते .
आपल्या इथे चणा डाळ मुख्य आहे तर काही ठिकाणी त्या ऐवजी तूर डाळ चा वापर पुरण साठी केला जातो
काही ठिकाणी नुसत्या मैदाच्या पुरण पोळी बनवतात तर काही ठिकाणी नुसतं गव्हाच्या पिठाच्या पुरण पोळी बनवतात , तर काही ठिकाणी दोन्ही एकत्र करून पोळ्या बनवतात .
पुरण पोळी हा असा स्वादिष्ट पदार्थ आहे कि तो प्रत्येकाच्या घरी अगदी तितक्याच उत्साहाने बनवला जातो
माझ्या दादांसाठी [ माझे वडील ] तर सण हे निमित्त असत त्यांना तर पुरण पोळी चा मोह कधी आवरतच नाही .
प्रत्येक जण पुरण पोळी हि कटाची आमटी , दूध , तूप अश्या आपल्या आवडीप्रमाणे खातात .
माझी आई तर नेहमी पुरण थोडं जास्तच बनवते जेणेकरून दुसऱ्यादिवशी गरम गरम पुरण पोळी बनवून त्यावर तुपाची धार टाकून मस्त न्याहरी करता येईल .
बऱ्याच ठिकाणी मैदाच्या पुरण पोळीचा नैवैद्य दाखवणे अशी प्रथा आहे कारण हि पोळी अत्यंत लूशलुशित होते आणि चवीला खूपच स्वादिष्ट लागते
काही ठिकाणी मैदाच्या पुरण पोळ्या आवडत नाही कारण नुसत्या मैदाच्या पुरण पोळी बनवल्या तर काहींना मैदा हा पचायला जाड जातो म्हणून ते कणकेच्या / गव्हाच्या पिठाच्या पुरण पोळी बनवतात
आणि मला मात्र मैदा आणि गव्हाच्या पिठाच्या दोन्हीचं मिश्रण एकजीव असलेल्या पुरण पोळ्या ह्या फार आवडतात .
इतकं पुरण पोळी बद्द्दल भरभरून बोललो आपण इतकं वर्णन केलं आहे तर आता आपण मैदा आणि गव्हाचं पीठ / कणिक एकजीव करून पुरण पोळी कशी बनवायची ते पाहूया.
तयारीसाठी लागणारा वेळ : २ तास
पुरण शिजवण्यासाठी लागणारा वेळ : १ तास
पुरण पोळी साठी लागणारा साहित्य
पुरण पोळीचे पीठ / कणिक साठी :
२ कप गव्हाचे पीठ
१ कप मैदा
१ ते दिड कप पाणी
२ ते ३ चमचे तेल
चवीपुरते मीठ
पुरण साठी लागणारे साहित्य
१ कप चणा डाळ
१ कप गूळ
१/2 चमचा वेलची पावडर
१ चमचा तूप
पुरण बनवायची कृती :
१] चणा डाळ स्वछ धुवून २ ते ३ तास २ - ३ कप पाणी घालून भिजत ठेवा .
२] आता डाळ कुकरमध्ये टाका आणि पाणी टाकून ३ शिट्या घ्या , गॅस मंद-मध्यम आचेवर ठेवा .
३] कुकर थंड झाल्यावर , गाळणीच्या मदतीने जास्त झालेलं पाणी काढून टाका , त्या पाण्याचा वापर आपण कटाची आमटी बनवण्यासाठी करू शकतो [ त्यामुळे कटाची आमटीला स्वादिष्ट चव येते ] .
४] डाळ आता मिक्सर मध्ये चांगली बारीक करून घ्या , तोपर्यंत बाजूला गूळ किसून चांगला बारीक करून ठेवणे.
५] एक कढई घ्या त्यात हि बारीक केलेली डाळ टाका आणि त्यात समप्रमाणात गूळ टाका [ आपल्याला किती गोड हवं आहे त्या प्रमाणे ठरवा ]
तूप आणि वेलची पावडर टाका आणि चांगलं एकजीव करून घ्या.
गूळ आणि डाळ ह्यांचं मिश्रण एकत्र होईपर्यंत गॅस मंद आचेवर ठेवा आणि कढईला खाली लागणार नाही ना ह्याची काळजी घ्या .
पीठ बनवणायची कृती :
१] एका परातीत / ताटात गव्हाचे पीठ आणि मैदाचे पीठ घ्या ,यात चवीप्रमाणे मीठ टाका
२] तुमच्या चवीनुसार गव्हाचे आणि मैदाच्या पिठाचं माप बदलू शकतो , दोन्ही एकत्र चांगले एकजीव करून घ्या त्यात थोडं तेल टाकून पाहिलं व्यवस्थित रित्या मिक्स करा
३] एका वेळी थोडेसे पाणी टाकून पीठ व्यवस्थित रित्या मऊ करून घ्या , लागेल तस थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मळून घ्या
४] पीठ थोडं पातळ मऊसर ठेवा , जोपर्यंत पीठ आपल्या हाताला चिकटत नाही तोपर्यंत तसेच मळत रहा
५] ते पीठ एका टोपात ठेवून त्यावर स्वछ फडकं ठेवून एक तासभर ठेवून द्या
६] कणिक चे गोळे करा , चपाती साठी जेवढे गोळे करतात त्यापेक्षा लहान गोळा करा
७] एक वाटीत थोडं तेल घ्या आणि ते कणकेचे गोळे त्यात ५ - १० मिनिट टाकून ठेवा
८] कणकेच्या गोळ्या पेक्षा मोठा पुरण चा गोळा घ्या आणि त्या कणकेच्या गोळ्यात टाका
९] मंद आचेवर तवा गरम करा , तवा गरम झाल्यावर त्यावर पुरण पोळी ठेवा , प्रत्येक पुरण पोळी हि एकदम पातळ लाटून घ्यावी
[ तेलात कणकेचा गोळा काही वेळ ठेवल्यामुळे आपण हि पुरणपोळी थापू पण शकतो ]
१०] एका बाजूने भाजून झाल्यावर पोळी ची बाजू बदला थोडी तुपाची धार सोडा
११] पुन्हा पोळीची बाजू पलटून घ्या त्यावर तूप लावा
१२] दोन्ही बाजूनी पोळी चांगली भाजून झाल्यावर , आपली पुरण पोळी खाण्यास तयार आहे

१३] आता ह्या मऊसूत गरमा गरम पुरण पोळ्या दुधासोबत , तुपासोबत , गुळवणी सोबत खायला द्या
इतकी सहज सोपी आहे पुरण पोळी कशी बनवायची ते समजलं असेल तर ,
तुम्ही देखील घरी बनवून बघा आणि मला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.
धन्यवाद !

What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)