खोबऱ्याची सुकी चटणी कशी बनवायची
खोबऱ्याचे फायदे : • संधिवाता सारख्या समस्या ऑस्टियोपोरोसिस वगैरे त्रास रोज सुकं खोबरं खाल्ल्याने टाळता येतात. वाळलेल्या नारळामध्ये अनेक खनिजे असतात जी आपल्या संयोजी ऊतकांना मजबूत ठेवायला मदत करतात आणि अशा प्रकारे शरीर निरोगी राहतं. • सुके खोबरे आहारातील फायबरने समृद्ध आहे आणि ते निरोगी हृदय ठेवायला मदत करतं. पुरुषांना 38 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते, तर स्त्रियांना 25 ग्रॅमची आवश्यकता असते. सुक्या खोबऱ्याचं सेवन केल्याने, हृदयाशी संबंधित सर्व समस्या समतुल्य ठेवण्यासाठी आपल्याला आवश्यक त्या प्रमाणात आहारातील फायबर मिळेल.
खोबऱ्याची सुकी चटणी कशी बनवायची
साहित्य
१ वाटी सुके खोबरे
१० ते १२ लाल सुक्या मिरची
५ ते ६ लसूण पाकळ्या
अर्धी छोटा चमचा हिंग
मीठ चवीप्रमाणे
कृती
एका कढईत सुके खोबरे आणि मिरच्या मंद आचेवर खमंग भाजून घ्यावेत
मिक्सर च भांड मध्ये लसूण पाकळ्या , लाल सुक्या मिरच्या , हिंग आणि मीठ बारीक करून घ्यावे
नंतर त्यात भाजलेलं सुक खोबर हलकं जाडसर मिक्सर मध्ये वाटून घ्यावे
अश्या प्रकारे खोबऱ्याची सुकी चटणी तयार आहे
खोबऱ्याचे फायदे :
· संधिवाता सारख्या समस्या ऑस्टियोपोरोसिस वगैरे त्रास रोज सुकं खोबरं खाल्ल्याने टाळता येतात. वाळलेल्या नारळामध्ये अनेक खनिजे असतात जी आपल्या संयोजी ऊतकांना मजबूत ठेवायला मदत करतात आणि अशा प्रकारे शरीर निरोगी राहतं.
· सुके खोबरे आहारातील फायबरने समृद्ध आहे आणि ते निरोगी हृदय ठेवायला मदत करतं. पुरुषांना 38 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते, तर स्त्रियांना 25 ग्रॅमची आवश्यकता असते. सुक्या खोबऱ्याचं सेवन केल्याने, हृदयाशी संबंधित सर्व समस्या समतुल्य ठेवण्यासाठी आपल्याला आवश्यक त्या प्रमाणात आहारातील फायबर मिळेल.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)