शेंगदाण्याची हिरव्या मिरचीत सुकी चटणी

• जेवण झाल्यानंतर 50 किंवा 100 ग्रॅम शेंगदाणे दररोज खाल्ल्यास तब्येत चांगली बनते, अन्न पचते आणि रक्ताची कमतरता भासत नाही. • आठवड्यातून ५ दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी राहतो. • शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉलची मात्रा 7.4 टक्क्यांनी घटते. • शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येते. यामुळे याच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण दिसते. • शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात. • दररोज थोडेसे शेंगदाणे खाल्ल्यास महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचे संतुलन कायम राहते.

0 11
शेंगदाण्याची हिरव्या मिरचीत सुकी चटणी
शेंगदाण्याची हिरव्या मिरचीत सुकी चटणी

 

शेंगदाण्याची हिरव्या मिरचीत सुकी चटणी

शेंगदाण्याची गावरान सुकी चटणी कशी बनवायची

 

साहित्य

1 वाटी शेंगदाणे

६ ते ७ हिरव्या मिरच्या [ तिखट हवं असेल / कमी हवं असेल कमी जास्त करू शकता ]

१० ते १२ लसूण पाकळ्या

चवीप्रमाणे मीठ

 

कृती

शेंगदाणे कढईत मंद आचेवर खमंग भाजून घ्यावेत

शेंगदाण्याची साले आवडत असल्यास ठेवावीत , आवडत नसल्यास काढून टाकावी

मिक्सर च्या भांड्यात , मिरची , लसूण आणि मीठ बारीक करून घ्यावे

नंतर त्यात शेंगदाणे थंड झाल्यावर ओबड धोबड बारीक करून घ्यावे

आणि पुन्हा हे सर्व तव्यावर थोडं तेल टाकून मंद आचेवर हि मिश्रण खरपूस भाजून घ्यावे

अश्या प्रकारे हिरव्या मिरचीतील सुकी शेंगदाण्याची चटणी तयार आहे  

 

 

 

शेंगदाण्याचे फायदे

·        जेवण झाल्यानंतर 50 किंवा 100 ग्रॅम शेंगदाणे दररोज खाल्ल्यास तब्येत चांगली बनते, अन्न पचते आणि रक्ताची कमतरता भासत नाही.

·        आठवड्यातून ५ दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी राहतो.

·        शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉलची मात्रा 7.4 टक्क्यांनी घटते.

·        शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येते. यामुळे याच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण दिसते.

·        शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात.

·         दररोज थोडेसे शेंगदाणे खाल्ल्यास महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचे संतुलन कायम राहते.

 

 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User