लिंबाचे लोणचे कसे बनवायचे
लिंबाच्या लोणच्याचे फायदे : १] रोगप्रतिकारक शक्ती वाढते : लिंबू मध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते , म्हणूनच लिंबाच्या लोणच्याचा समावेश जेवणात रोज करावा ज्यामुळे viral आजार झाल्यास आपली प्रतिकारक शक्ती हि वाढते २] चक्कर किंवा थकवा आल्यास लिंबू पाणी पिणे अत्यंत फायदेशीर आहे , ह्यामुळे लगेच तरतरी येते ३] अपचन किंवा पोटात मळमळ झाल्यास लिंबू पाणी पिणे , ह्यामुळे पचन क्रिया व्यवस्थित रीत्या होते ४] लिंबू हे प्रत्येक पदार्थामध्ये चव वाढविण्याचे काम करतो ५] लिंबूच्या लोणच्या मध्ये लोह , पोटॅशियम आणि कॅलशियम मोठ्या प्रमाणात आढळत जे रक्तदाब नियंत्रित ठेवत
लोणचे :
आपण आता विविध प्रकारचे लोणचे , त्याची कृती , साहित्य आणि फायदे बघूया
लोणचे बद्दल थोडेसे :
मला तरी वाटत जेवणाच्या ताटातील लोणचे हा अविभाज्य घटक आहे लोणचं नसलं तर जेवणात काय मजा
जेवताना चपाती भाजी सोबत एक आंबट गोड तिखट चवीमध्ये बदल आणणारा पदार्थ म्हणजे लोणचे
आरोग्याच्या गोष्टीने सुद्धा लोणचे खाण्याचे फायदे आहेत
लोणचे हे बरेच प्रकारचे असतात जसे कि कैरी , लिंबू , मिरची , लसूण , गाजर , करवंद , ओली हळद इत्यादी
मी तर असे बरेच लोणचे प्रकार ऐकले आहेत , खाल्ले काही त्यातील क्ववचितच
लोणचे खाण्याचे फायदे काय आहेत ?
१] चवीमध्ये वाढ करणे , त्यात स्वादिष्ट पणा आणणे हा तर मूळ गुणधर्म , फायदा आहे लोणच्याचा
२] असं ऐकलं मी कि गरोदर पणात महिलेला अचानक आंबट पदार्थ खावा वाटलं कि लोणचं केव्हाही चांगलं
३] लोणचं खाल्ल्याने पचन क्रिया हि व्यवस्थित रित्या होण्यास मदत होते
४] संशोधनानुसार लोणचे हे मधुमेह वर नियंत्रण आणते [ विशेतः ते आवळ्याचे लोणचे असावे ] ते मर्यादित प्रमाणात खावे
घातक:
ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी लोणच्याचा सेवन करू नये
लिंबाचे लोणचे कसे बनवायचे
आंबट गोड लिंबाचे लोणचं कसे बनवायचे
साहित्य :
१० लिंबे [ लिंबे पिवळी असावीत आणि मध्यम आकाराची असावीत ]
१ चमचा हळद
अर्धा चमचा मेथी दाणे [ मला फार कडवटपणा आवडत नाही म्हणून मी अर्धा चमचा घेतलं आहे तुमची तुमच्या आवडीनुसार १ चमचा घेऊ शकता ]
२ चमचा लाल तिखट [ लाल तिखट हे गडद लाल रंगाचे असावे ]
१ चमचा हळद
४ चमचे जाड मीठ
२ चमचे मोहरी
१ वाटी तेल
१ मोठा चमचा साखर [ किंवा पिठी साखर सुद्धा चालेल ]
कृती :
जाड मीठ आणि मेथी दाणे हे गरम तव्यावर भाजून खरपूस घेणे
गॅस वर एका कढईत तेल गरम होण्यास ठेवणे त्यात मोहरी घालावी
मोहरी चांगली तडतडली कि गॅस बंद करावा
एक पसरत भांड / ताट घ्यावे त्यात हळद , मीठ [ थोडे ] , मेथी दाणे , लाल तिखट सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावे
त्यात तेल घालावे ,चांगले ते मिश्रण एकत्रित करावे आणि थोडावेळ ते मिश्रण थंड होण्यास ठेवावे
दुसऱ्या भांड्यात लिंबू स्वच्छ धुवून , कोरड्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावे आणि त्याचे बारीक [ हव्या त्या आकाराचे ] तुकडे करून घ्यावे
उरलेले मीठ आणि साखर त्या लिंबाच्या फोडीनं चांगलं चोळून घेणे
व थंड झालेले वरील जिन्नस लिंबाच्या फोडींवर टाकणे
चांगले एकत्रित करावे
एक काचेची कोरडी बरणी घ्यावी , त्यात हे सर्व मिश्रण घालावे
अश्या प्रकारे आपले आंबट गोड लोणचे तयार आहे
……………………………………………………….
लिंबाच्या लोणच्याचे फायदे :
१] रोगप्रतिकारक शक्ती वाढते :
लिंबू मध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते , म्हणूनच लिंबाच्या लोणच्याचा समावेश जेवणात रोज करावा
ज्यामुळे viral आजार झाल्यास आपली प्रतिकारक शक्ती हि वाढते
२] चक्कर किंवा थकवा आल्यास लिंबू पाणी पिणे अत्यंत फायदेशीर आहे , ह्यामुळे लगेच तरतरी येते
३] अपचन किंवा पोटात मळमळ झाल्यास लिंबू पाणी पिणे , ह्यामुळे पचन क्रिया व्यवस्थित रीत्या होते
४] लिंबू हे प्रत्येक पदार्थामध्ये चव वाढविण्याचे काम करतो
५] लिंबूच्या लोणच्या मध्ये लोह , पोटॅशियम आणि कॅलशियम मोठ्या प्रमाणात आढळत जे रक्तदाब नियंत्रित ठेवत
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)