मिरचीचे लोणचे
लोणचे खाण्याचे फायदे काय आहेत ? १] चवीमध्ये वाढ करणे , त्यात स्वादिष्ट पणा आणणे हा तर मूळ गुणधर्म , फायदा आहे लोणच्याचा २] असं ऐकलं मी कि गरोदर पणात महिलेला अचानक आंबट पदार्थ खावा वाटलं कि लोणचं केव्हाही चांगलं ३] लोणचं खाल्ल्याने पचन क्रिया हि व्यवस्थित रित्या होण्यास मदत होते ४] संशोधनानुसार लोणचे हे मधुमेह वर नियंत्रण आणते [ विशेतः ते आवळ्याचे लोणचे असावे ] ते मर्यादित प्रमाणात खावे
लोणचे :
लोणचे बद्दल थोडेसे :
मला तरी वाटत जेवणाच्या ताटातील लोणचे हा अविभाज्य घटक आहे लोणचं नसलं तर जेवणात काय मजा
जेवताना चपाती भाजी सोबत एक आंबट गोड तिखट चवीमध्ये बदल आणणारा पदार्थ म्हणजे लोणचे
आरोग्याच्या गोष्टीने सुद्धा लोणचे खाण्याचे फायदे आहेत
लोणचे हे बरेच प्रकारचे असतात जसे कि कैरी , लिंबू , मिरची , लसूण , गाजर , करवंद , ओली हळद इत्यादी
मी तर असे बरेच लोणचे प्रकार ऐकले आहेत , खाल्ले काही त्यातील क्ववचितच
लोणचे खाण्याचे फायदे काय आहेत ?
१] चवीमध्ये वाढ करणे , त्यात स्वादिष्ट पणा आणणे हा तर मूळ गुणधर्म , फायदा आहे लोणच्याचा
२] असं ऐकलं मी कि गरोदर पणात महिलेला अचानक आंबट पदार्थ खावा वाटलं कि लोणचं केव्हाही चांगलं
३] लोणचं खाल्ल्याने पचन क्रिया हि व्यवस्थित रित्या होण्यास मदत होते
४] संशोधनानुसार लोणचे हे मधुमेह वर नियंत्रण आणते [ विशेतः ते आवळ्याचे लोणचे असावे ] ते मर्यादित प्रमाणात खावे
घातक:
ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी लोणच्याचा सेवन करू नये
मिरचीचे लोणचे कसे बनवायचे
सोप्या पद्धतीने मिरचीचे लोणचे कसे बनवायचे
साहित्य
अर्धा किलो हिरवी मिरची
१ वाटी मोहरी डाळ
१ चमचा मेथी दाणे
1 मोठा चमचा हळद
१ चमचा हिंग
१ मोठा चमचा जाड मीठ
५ ते ६ लिंब [ रस ]
१ वाटी तेल
साहित्य
सर्व प्रथम एका पसरट भांड्यात / ताटात मोहरी चे दाणे , मेथीचे दाणे , हळद आणि मीठ घ्या , ते सर्व जिन्नस एकत्र करा
कढईत तेल गरम करायला ठेवा
तेल गरम झाल्यावर त्या जिन्नस मध्ये एकत्र करावे , ते जिन्नस सर्व मोठ्या चमच्याने एकत्रित करावे
एकत्र करून झाल्यानंतर ते थोडं थंड होऊ द्यावे
मिरच्या स्वच्छ धुवून ,पूर्ण कोरड्या कराव्यात
आणि त्याचे बारीक तुकडे करावेत थोडं मीठ मिरच्यांना लावून तसेच ठेवून द्यावे
एक स्वच्छ , कोरडी काचेची बरणी घ्यावी त्यात सर्व जिन्नस घालावे आणि मिरच्या टाकाव्यात
सर्व मिश्रण एकत्रित हलवून घ्यावे आणि बरणी घट्ट बंद करून ठेवावी
दुसऱ्या दिवशी आपण जी लिंबे घेतली होती त्या लिंबाचा रस बरणीत टाकावा
लिंबाच्या रसाने मिरचीच्या लोणच्याला एक वेगळाच आंबट पणा येतो , ह्यामुळे मिरचीच्या लोणच्याची चव जास्त स्वादिष्ट होते
अश्या प्रकारे आपलं स्वादिष्ट हिरव्या मिरचीचं लोणचं तयार आहे
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)