तिळाची चटणी कशी बनवायची
तिळाचे फायदे : 1] तीळाच्या कुटाचा भाजीतदेखील वापर केला जातो. अनेक ठिकाणी दाण्याच्या कुटाला पर्याय म्हणून तीळाचा कुट वापरला जातो. 2] मासिक पाळीत ज्या महिलांना रक्तस्त्राव कमी होतो त्यांनी तीळाची चटणी खावी. 3] बाळंत स्त्रीला पुरेसं दूध येत नसेल तर तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे यामुळं पुरेसं दूध येण्यास उपयोग होतो. 4] ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनाही तीळ, दूध आणि खडीसाखऱ खाल्ल्यास मुत्राशय मोकळं होण्यास मदत होते. 5] दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठी तिळाचा चांगला उपयोग होतो. 6] केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणं चांगलं असतं.
तिळाची चटणी कशी बनवायची
तिळाची सुकी चटणी कशी बनवायची
साहित्य :
१ वाटी तीळ
१ चमचा लाल तिखट
१० ते १२ लसूण पाकळ्या
मीठ चवीप्रमाणे
कृती :
तीळ तव्यावर खमंग मंद गॅस वर भाजून घ्यावं ,
तव्यावर असताना वारंवार चमच्याने ते हलवत राहावे
करपून न द्यावे
तीळ थंड झाल्यावर मिक्सर मध्ये ओबड धोबड बारीक करून घ्यावे
नंतर त्यात मिरची , मीठ , लसूण पाकळ्या टाकून पुन्हा बारीक करून घ्यावे
अश्या प्रकारे तिळाची चटणी तयार आहे
तिळाचे फायदे :
1] तीळाच्या कुटाचा भाजीतदेखील वापर केला जातो. अनेक ठिकाणी दाण्याच्या कुटाला पर्याय म्हणून तीळाचा कुट वापरला जातो.
2] मासिक पाळीत ज्या महिलांना रक्तस्त्राव कमी होतो त्यांनी तीळाची चटणी खावी.
3] बाळंत स्त्रीला पुरेसं दूध येत नसेल तर तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे यामुळं पुरेसं दूध येण्यास उपयोग होतो.
4] ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनाही तीळ, दूध आणि खडीसाखऱ खाल्ल्यास मुत्राशय मोकळं होण्यास मदत होते.
5] दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठी तिळाचा चांगला उपयोग होतो.
6] केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणं चांगलं असतं.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)