घरगुती व्हेज बर्गर
शनिवार रविवार असेल , किंवा एखादा सुट्टीचा दिवस , कोणी येणार असेल घरी , वाढदिवस असेल तर काही वेगळं बनवायचा झालं तर झटपट असे घरगुती बर्गर हे खूप सोपे आणि चव वाढविणारा पदार्थ आहे घरच्या घरी बनवल्या मुळे तो मुलांनी जास्त प्रमाणात खाल्ला तरी आरोग्याची चिंता नसते बर्गर हि डिश आहे कि ह्या डिश ला कोणीही नाही म्हणू शकत नाही बर्गर हि अशी डिश आहे जी मॅकडोनाल्ड'स पासून ते स्ट्रीट style मध्ये देखील विविध प्रकारे बनविले जातात आपण सुद्धा घरच्या घरी झटपट आणि सोप्या पद्धतीने बर्गर हा बनवूं शकतो
घरगुती व्हेज बर्गर कसा बनवायचा
Veg Burger Recipe in Marathi
झटपट सोप्या पद्धतीने घरच्याघरी बर्गर कसा बनवायचा
घरगुती बर्गर कसा बनवायचा
Veg Burger Recipe in Marathi
Veg Burger Recepi Marathi madhe
शनिवार रविवार असेल , किंवा एखादा सुट्टीचा दिवस , कोणी येणार असेल घरी , वाढदिवस असेल तर काही वेगळं बनवायचा झालं तर झटपट असे घरगुती बर्गर हे खूप सोपे आणि चव वाढविणारा पदार्थ आहे
घरच्या घरी बनवल्या मुळे तो मुलांनी जास्त प्रमाणात खाल्ला तरी आरोग्याची चिंता नसते
बर्गर हि डिश आहे कि ह्या डिश ला कोणीही नाही म्हणू शकत नाही
बर्गर हि अशी डिश आहे जी मॅकडोनाल्ड'स पासून ते स्ट्रीट style मध्ये देखील विविध प्रकारे बनविले जातात
आपण सुद्धा घरच्या घरी झटपट आणि सोप्या पद्धतीने बर्गर हा बनवूं शकतो
तर आता आपण सोप्या पद्धतीने आणि झटपट होईल असा घरच्या घरी बर्गर कसा बनवायचा ते बघू
तयारी साठी लागणारा वेळ : १० ते १५ मिनिट
बनवण्यासाठी साठी लागणारा वेळ २० ते ३० मिनिट
असा हा झटपट घरच्या घरी बर्गर अवघ्या ४५ मिनिट मध्ये होतो
तर आपण आता त्यासाठी लागणारे साहित्य बघू
साहित्य :
पाव बन्स : २
टमाटो : १ मोठा
कांदा : १ मोठा
चीझ स्लाइस
टमाटो सॉस
चीडर चीझ
ब्रेड चा भुगा [ टिक्कीच्या कव्हरिंग साठी ]
टिक्की :
बटाटे : मोठे २
गाजर : छोटे १
वाटाणे / मटर : १ छोटी वाटी
शिमला मिरची : १ मोठी
आमचूर पावडर :एक चमचा
जिरे पावडर : एक चमचा
धने पावडर : एक चमचा
तेल : २ ते ३ चमचे
मीठ चवीप्रमाणे
कृती :
सर्वप्रथम टिक्की बनवून घ्यावी त्यासाठी बटाटे आणि मटार उकडून घ्यावेत
गाजर बारीक कापून किंवा किसले तरी चालेल [ गाजर हे ऑपशनल आहे , मला आवडत म्हणून मी टाकते ]
शिमला मिरची बारीक कापून घ्यावी
सर्व एकत्र स्मॅश करून घ्यावे
त्यात सर्व मसाले जिरे पावडर , आमचूर पावडर , मीठ , धने पावडर टाकून सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यावे
त्या मिश्रणाची टिक्की बनवून घ्यावी [ त्याचा लाडू सारखा आकार करून , त्याला अलगद थापून त्याला टिक्की चा आकार द्यावा ]
ती टिक्की बनवून झाली कि , ब्रेड चा चुरा मध्य त्याला ठेवावे
ब्रेड चा चुरा सर्व बाजूने लागू द्यावा
एक पॅन घ्यावा , पॅन गरम झाल्यावर त्यावर तेल टाकून
टिक्की पॅन वर ठेवावी
टिक्की चहुबाजूनी तपकिरी रंगाची होईपर्यंत फ्राय होऊ द्यावी
ती भाजून झाली कि आपली टिक्की तयार आहे
आता बर्गर चा बन्स पण एकदा गरम करून घ्यावा
त्यातल्या एका बन्स च्या आतल्या बाजूने टमाटो सॉस लावा
आणि एका बन्स च्या आतल्या बाजूने चीडर चीझ लावा
टमाटो आणि कांद्याचे गोलसर काप
ठेवून टिक्की ठेवावी
अश्या प्रकारे आपला घरगुती सोप्या पद्धतीने बर्गर तयार आहे
हा स्वादिस्ट आसा बर्गर मियॉनीज , चीझ सोबत सर्व्ह करा
आम्ही आशा करतो कि तुम्हाला हि झटपट बर्गर ची रेसिपी नक्की आवडली असेल आणि ती तुम्ही नक्की करून बघाल
रेसिपी आवडली असल्यास प्रतिक्रिया नक्की कळवा
धन्यवाद
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)