टमाटोची कोशिंबीर
टमाटो हि आपल्या स्वयंपाक मधील एक महत्वाचा घटक आहे , ज्याच्याविना आपला स्वयंपाक हा अपूर्णच आहे असं म्हणू शकतो आपण टमाटो खाण्याचे अनेक फायदे आहेत टमाटो हे डोळ्यांसाठी , रक्त वाढीसाठी खूप आवश्यक आहे टमाटो चा आपण भाजी म्हणून , कच्चं सलाड म्हणून उपयोग करू शकतो
टमाटोची कोशिंबीर
साहित्य :
लाल अर्ध कच्च ,पिकलेले टमाटो घ्या
१ वाटी दही
चिमूटभर पिठी साखर
चवी पुरते मीठ
काळी मिरी पावडर
भाजलेल्या खरपूस शेंगदाण्याचा कूट [ आवडत असल्यास ]
कृती :
लाल टमाटो स्वछ धुवून घ्या
ते हव्या त्या आकाराचे चिरून घ्या
त्यात सर्व जिन्नस ,दही ,मीठ , पिठी साखर , काळी मिरी पावडर एकत्र करून घ्या
अश्या प्रकारे टमाटोची कोशिंबीर तयार आहे
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)