भाताचा पराठा

भाताचा पराठा
साहित्य :
सारणासाठी : कणीक ,
१ ते दीड वाटी शिळा भात ,
बारीक चिरलेला कांदा ,
बारीक चिरलेली कोथिंबीर ,
बारीक चिरलेले हिरव्या मिरचीचे तुकडे ,
पातीचा कांदा , अर्धा चमचा लाल तिखट ,
१ चमचा चाट मसाला .
कृती :
बारीक बाऊलमध्ये उरलेला भात घ्या . भात थोडासा मॅश करून घ्या . त्यामध्ये चिरलेला कांदा , कोथिंबीर , हिरवी मिरची , लाल तिखट आणि चाट मसाला घालून सारण करून घ्या . त्यात बारीक चिरलेली कोथिंबीरही घाला . गव्हाच्या पिठाचा गोळा करून घ्या . त्याची पारी करून घ्या . भाताच्या सारणाचा गोळा करून तो पारीत भरा . पराठा लाटतो त्याप्रमाणे पराठा लाटून घ्या . तव्यावर घालून व्यवस्थित भाजून घ्या . भाजताना तूप किंवा तेल वापरा . खरपूस असा भाजून घ्या . दही किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करा .