दही भेंडी

0 6
दही भेंडी
दही भेंडी

दही भेंडी

दही भेंडी कशी बनवायची

Dahi Bhendi Kashi Banvaychi

 

 

 साहित्य :

 

 भेंडी पाव किलो 

घट्ट दही दोन वाट्या 

बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी 

धन्या - जीऱ्याची पूड तीन - चार चमचे

 • मीठ , तिखट आवडत असल्यास

 • पण न घातल्यास भाजी छान दिसते 

तेल तीन मोठे चमचे 

फोडणीचं 

 

   कृती   :

 भेंडी व्यवस्थित धुवून पुसून घ्यावी . भेंडी जास्त मोठी असल्यास दोन तुकडे करावेत . लहान असल्यास देठ आणि टोकाकडील भाग काढून टाकावा . भेंडीला उभी चीर देऊन त्यामध्ये धन्या - जीऱ्याची पूड , मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर , आवडत असल्यास तिखट यांचं मिश्रण भरावं . पसरट भांड्यात तीन चमचे तेलावर हिंगाची फोडणी करावी . फोडणीत हळद न घातल्यास भाजीची रंगसंगती छान दिसते . भरलेली भेंडी तेलावर व्यास्थित शिजवून घ्यावी , शिजवताना ती हलवू नये . चीर दिलेला भाग वरती ठेवावा . म्हणजे मसाला बाहेर येणार नाही . पाच - सहा मिनिटांनी भाजी उतरवावी व गार होऊ द्यावी . वाढताना दोन वाट्या दही बाऊलमध्ये काढून त्यात चवीपुरतं मीठ , साखर आवडत असल्यास चवीपुरती घालून दही व्यवस्थित फेटून घ्यावं . भरलेली भेंडी या दह्यात घालावी . वरून कोथिंबीर पेरावी . पांढरं दही व हिरव्या भेंडया या रंगसंगतीमुळ पानाची शोभा वाढतेच .

 

 

 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User