जातनिहाय जनगणना करुन आरक्षणाचा मार्ग निकाली काढावा –आ. अभिजित पाटील

माढा प्रतिनिधी

0 7
जातनिहाय जनगणना करुन आरक्षणाचा मार्ग निकाली काढावा –आ. अभिजित पाटील

विधानसभा मतदारसंघांमध्ये , मागील ३०वर्षाची सत्ता उलटून टाकत मतदार संघात परिवर्तन घडवले आहे. आमदार अभिजीत पाटील यांना आमदार केल्याची कसर न राखण्यासाठीच आ.पाटील यांनीही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आक्रमकपणे विविध प्रश्न मांडत त्याची सोडवणूक होण्याच्या दृष्ठीने तयारी ठेवली आहे.

माढा पंढरपूर विधानसभा मतदार संघातून विकासाचे व्हिजन असणारे लोकप्रतिनिधी पाठविण्याचे काम विधानसभा निवडणुकीत मतदारांनी केले आहे. त्यामुळेच आमदार अभिजीत पाटील यांनी केवळ विकास आणि विकास यासाठीच आपली आमदारकी पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी झालेल्या नागपूर येथील पहिल्याच भाषणात अगदी मुद्देसूरपणे आपल्या मतदार संघातील विकासासह राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत, महादेव कोळी, मुस्लिम या विविध जातीच्या आरक्षण संदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.

मराठा आरक्षण प्रश्नाचे मागील अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे. आगामी २५ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. परंतु या आंदोलनाच्या इशाराकडे सरकारने गांभीर्याने पहिले नसून अभिभाषणात त्याबाबतीत कसलीही भूमिका मांडली नसल्याने आ. अभिजीत पाटील यांनी सरकारवर थेट नाराजी व्यक्त केली आहे. यामुळेच आ. अभिजीत पाटील यांच्यामुळे सरकारला आरक्षण प्रश्नातील होणाऱ्या आंदोलन प्रश्नांची आठवण करून देण्याचे काम खुद्द आ. अभिजीत पाटील यांनी केले आहे. यामुळेच मराठा समाजाला दिलेल्या शब्द पाळण्यासाठी आ. अभिजीत पाटील यांचा पहिल्यापासूनच पाठपुरावा सुरु झाला असल्याचे स्पष्ट दिसले आहे.

माढा मतदार संघातील माढा शहरमध्ये दहा दिवसातून पाणी मिळते. याबाबत उजनी धरण या माढा तालुक्यात असूनही अशी वाईट अवस्था का? असा प्रश्न मांडत हा पाणी प्रश्न सोंडविण्याबाबत मागणी केली आहे. सरकारने शहरा बरोबरच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी पावले उचलली पाहिजे. याकरिता आपल्या मतदारसंघात असलेल्या मेंढापूर आणि मोडनिंब येथील एमआयडीसीला लवकरात लवकर मान्यता दिल्यास या भागाचा मोठा विकास होईल असेही सांगितले. यासह विविध प्रश्नावर आ. अभिजीत पाटील यांनी आवाज उठवीत आपण माढा मतदार संघाला विकासाच्या दिशेने घेवून जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे

एम एस पी वाढविण्यासाठी पाठपुरावा व्हावा

आपल्या महाराष्ट्र राज्यात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. याच उद्योगावर राज्यातील मोठं आर्थिक गणित अवलंबून आहे. यासाठी हा साखर उद्योग चालविणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकरी यांना लाभ होण्यासाठी साखरेचे भाव वाढविणे आवश्यक आहेत. तरच उसाला भाव वाढ देणे शक्य असते. यासाठी आपल्या राज्य सरकारकडून केंद्र सरकारला एम एस पी वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याची मागणी माढाचे नूतन आमदार अभिजीत पाटील यांनी अधिवेशनात केली आहे.

पहिल्या दिवशी सदनाच्या पायऱ्यांवर मी डोके टेकवले. कारण पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना ज्या पवित्र भावना मनात येतात त्याच भावना त्या वेळी आल्या. इथे आपण कशासाठी आलो आहोत ही जाणीव कायम माझ्या मनात आहे.. जी कदाचित आपल्या मनात देखील राहील.. तुकोबांच्या शब्दात सांगायचे झाले तर…

उजळावया आलों वाटा ।
खरा खोटा निवाडा ॥१॥
बोलविले बोलें बोल ।
धनी विठ्ठल सन्निध ॥ध्रु.॥

मी भविष्याकडे जाणारे मार्ग उजळविण्यासाठी येथे आलो आहे. सत्य असत्य सांगून महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये माझा वाटा उचलण्यासाठी आलो आहे. येथे बोलणारा प्रत्येक बोल विठ्ठलाच्या आणि मतदारसंघातील मायबाप जनतेच्या मनातील असेल अशी ग्वाही या वेळी मी देतो आणि सरकारनेही ती दिली पाहिजे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User