दही वडा

दही वडा हे उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय असे स्ट्रेट फूड आहेत. अनेकदा आपण वेगवेगळ्या कार्यक्रमात याचा आस्वाद घेता येतो. दही वडा खास प्रसंगी आणि उत्सवांसाठी बनविला जातो. पण आज आपण घरच्याघरी दही वडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत.

दही  वडा
दहीवडा

दहीवडा

 

दहिवडा कसा बनवायचा

झटपट दहिवडा  नाश्त्यासाठी

 

Dahivada In Marathi

 

साहित्य :

 दिड वड्यांसाठी - पाउण कप उडदाची डाळ

१/४ कप ओल्या खोबर्याचे पातळ तुकडे

४-५ मिरं

चवीपुरते मिठ

२ कप पातळ ताक

तळण्यासाठी तेल

दही बनवण्यासाठी कप दही

 ५-६ टेस्पून साखर

१ टिस्पून मिठ

वरून भुरभूरवण्यासाठी - · मिरपूड लाल तिखट चाट मसाला

कृती :

 उडीद डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी . पाणी काढून टाकावे . अगदी थोडेसेच पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी . वाटलेले मिश्रण आपल्याला दाटसरच हवे आहे . इडलीच्या पिठापेक्षाही घट्ट असावे . वाटलेले मिश्रण हाताने किंवा हँड मिक्सरने फेटावे ज्यामुळे मिश्रणात हवेचे लहान बुडबुडे तयार होतात आणि वडे हलके व्हायला मदत होते . नंतर त्यात मिठ , ठेचलेले मिरं , आणि खोबर्याचे पातळ काप घालावेत . वडे मध्यम आचेवर गोल आकारात किंवा मेदूवड्याच्या आकारात तळून घ्यावे . वड्यांचा आकार खुप मोठा ठेवू नये . काहीवेळेस वडे आतून कच्चे राहू शकतात . पातळ ताकात थोडी साखर आणि किंचीत मिठ घालावे . यामध्ये तळलेले वडे साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवावे . तोवर वरून घालायचे दही तयार करून घ्यावे . वाडग्यात दही घ्यावे , रवीने नुसतेच घुसळून घ्यावे . मग किंचीत पाणी घालून आवश्यक तेवढा पातळपणा द्यावा . त्यात चवीनुसार साखर आणि मिठ घालावे . ढवळून घ्यावे . आणि थोडावेळ फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवावे . सर्व्ह करताना ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घालावेत . त्यावर दही घालून वरती चाट मसाला , मिरपूड , आणि लाल तिखट घालावे .