भगीरथ भालके यांना काँग्रेस मधून उमेदवारी जाहीर

खासदार प्रणिती शिंदे यांनी भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळावी यासाठी दिल्ली दरबारी मोठे प्रयत्न केले

0 13
भगीरथ भालके यांना काँग्रेस मधून उमेदवारी जाहीर

काँग्रेसने आपली तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीमध्ये 14 उमेदवारांची नावे आहेत. मंगळवेढा-पंढरपूरमधून भागिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर झाली आहेत तर, अंमळनेरमधून अनिल शिंदे, पुणे कॅन्टोन्मेंटमधून रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनी भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळावी यासाठी दिल्ली दरबारी मोठे प्रयत्न केले आहेत.

सोलापुर दक्षिण विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झालं आहे. महाविकास आघाडीतून या आधीच ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती.अमर पाटील हे उद्या आपला अर्ज देखील जाहीर करणार आहेत, तत्पूर्वीच काँग्रेसने देखील आपला उमेदवार या मतदारसंघात जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण हा मोठा प्रश्न आहे.

सोलापुर दक्षिणमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात मैत्रीपूर्ण लढत होणार की ठाकरे गट उमेदवारी माघार घेणार हे पाहणे महत्वाचे महत्वाचे ठरणार आहे.आता काँग्रेसने 14 उमेदवारांची यादी जाहीर केली असून शिवसेनेकडून जाहीर झालेल्या सोलापूर दक्षिण मतदारसंघातून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तर, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून भगिरथ भालकेंना मैदानात उतरवण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे भगिरथ भालके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, आता काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने 4 थ्या यादीत अंधेरी पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या जागांवरील उमेदवारांची नावे बदलली आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User