पनीर मखनी
पनीर खाण्याचे फायदे 1. काही शाकाहारी लोक मांस खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते. 2. पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते
पनीर मखनी
पनीर मखनी कशी बनवायची
EASY FAST AND TASTY PANEER MAKHANI
PANEER MAKHANI IN MARATHI
साहित्य :
• २५० ग्राम पनीर
• १/४ कप कांद्याची पेस्ट
• अर्धा ते पाऊण कप टोमॅटो प्युरी
• १ टिस्पून आलेलसूण पेस्ट
• १ टेस्पून काजूची पेस्ट
• अख्खा गरम मसाला –
४ मिरीदाणे ,
१ तमाल पत्र ,
१ वेलची ,
२ लवंगा ,
१ लहान दालचिनीचा तुकडा
• २ चिमटी कसूरी मेथी
• १ टिस्पून धणेजिरेपूड
• १/२ टिस्पून गरम मसाला
• १ टिस्पून लाल तिखट
• ३ टेस्पून बटर
• ३ टेस्पून क्रिम
• चवीपुरते मिठ •
कृती :
पनीरचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे किंवा २ इंचाचे लांबडे तुकडे करा . तेलामध्ये डिपफ्राय किंवा शालोफ्राय करून घ्या . • अख्खा गरम मसाल्याचे जे जिन्नस आहेत ते अगदी हलके , कोरडेच भाजून घ्यावे . खलबत्त्यात हे सर्व मसाले एकत्र कुटून घ्यावे . • पॅनमध्ये २ टेस्पून बटर गरम करावे . त्यात कुटलेला मसाला घालून काही सेकंद परतावे . • त्यात कांद्याची पेस्ट आणि आलेलसूण पेस्ट घालावी . मध्यम आचेवर कांदा शिजेस्तोवर परतावे . ( साधारण ४ ते ५ मिनीटे ) • कांदा शिजला आणि थोडा रंग बदलला कि टोमॅटो प्युरी घालून मध्यम आचेवर काही मिनीटे शिजवावे . • टोमॅटो प्युरी शिजल्यावर त्यात कसूरी मेथी , धणेजिरेपूड , गरम मसाला पावडर , लाल तिखट आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे . आच एकदम मंद करावी . काजू पेस्ट आणि क्रिम घालून जोरजोरात ढवळावे म्हणजे क्रिम फुटणार नाही . थोडे बटर घाला . • एकदा क्रिम निट मिक्स झाले कि तळलेले पनीर घालावे . साधारण ३० सेकंद मंद आचेवर गरम करावे . सर्डिंग प्लेटमध्ये भाजी वाढून त्यावर थोडे क्रिम घालून सजवावे . • पोळी किंवा नान बरोबर सर्व्ह करावे .
पनीर खाण्याचे फायदे
1. काही शाकाहारी लोक मांस खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
2. पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते
3. पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.
4. कच्चे पनीरही चवीला स्वादिष्ट असते. त्यावर काळी मिरी आणि मीठ भुरभुरून खाल्यास चव चांगली येते. मात्र तुम्हांला पनीर मसाला किंवा पनीरचा कोणताही पदार्थ करायचा असेल तर त्यासाठी पनीर तळून घेऊ नका.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)