शिवपार्वती नगर, टाकळी रोड परिसरातील खुल्या जागेत वृक्षारोपणाचा उपक्रम

स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय सणाला केवळ उत्सवाचे स्वरूप न देता वृक्षारोपणाच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.

0 49
शिवपार्वती नगर, टाकळी रोड परिसरातील खुल्या जागेत वृक्षारोपणाचा उपक्रम
शिवपार्वती नगर, टाकळी रोड परिसरातील खुल्या जागेत वृक्षारोपणाचा उपक्रम
शिवपार्वती नगर, टाकळी रोड परिसरातील खुल्या जागेत वृक्षारोपणाचा उपक्रम
शिवपार्वती नगर, टाकळी रोड परिसरातील खुल्या जागेत वृक्षारोपणाचा उपक्रम

पंढरपूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पंढरपूर येथील शिवपार्वती नगर, टाकळी रोड परिसरातील खुल्या जागेत वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. रोटरी क्लब, पंढरपूर यांच्या सौजन्याने या उपक्रमासाठी विविध प्रकारची १५ वृक्षरोपे उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी टाकळीचे सरपंच श्री.औदुंबर ढोणे, उपसरपंच श्री. समाधान देठे, पोलीस उपनिरीक्षक श्री. संतोष जगताप, रोटरीचे श्री. आराध्ये पाटील श्री. केसकर,  वृक्षप्रेमी मंडळ पंढरपूरचे सतीश खडके व स्वप्नील मोरे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सागर कारंडे उपस्थित होते. 

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या उपक्रमात शिवपार्वती नगरमधील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. परिसर अधिक हरित, सुंदर व पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने खुल्या जागेत वृक्षांची लागवड करण्यात आली. वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी रहिवाशांनी केला. 

रोटरी क्लब, पंढरपूरच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून शिवपार्वती नगरमधील खुल्या जागेसाठी १५ वृक्षरोपे देण्यात आली. रोटरी क्लबच्या या पर्यावरणपूरक योगदानाबद्दल शिवपार्वती नगरमधील नागरिकांनी क्लबचे अध्यक्ष व सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी नागरिकांनी शिवपार्वती नगरमधील खुल्या जागेचा नियोजनबद्ध विकास करून ती हरित उद्यान, ओपन जिम तसेच लहान मुलांसाठी खेळाच्या सुविधांनी युक्त आदर्श सामुदायिक जागा म्हणून विकसित करण्याचा मानस व्यक्त केला.

स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय सणाला केवळ उत्सवाचे स्वरूप न देता वृक्षारोपणाच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.

या वृक्षारोपण उपक्रमाबद्दल समस्त शिवपार्वती नगर रहिवाशांनी रोटरी क्लब, पंढरपूर तसेच ग्रामपंचायत टाकळी यांचे विशेष आभार व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. शामसुंदर तापडिया, उप अभियंता श्री. करीम शेख, श्री. बाळ कुंभार, श्री. कांतीलाल नकाते, श्री. सुशांत मोहिते, श्री. साजिद शेख, श्री. रोपळकर, श्री. अडसूळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सागर वाघमारे यांनी केले. अल्पोपहाराची व्यवस्था रसोई हॉटेल च्या सर्वेसर्वा सौ. मंजुषा पवार मॅडम यांनी केली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User