लसूण लोणचे
लसूण च्या लोणच्याचे फायदे : १] लसूण खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते २] थंडीच्या दिवसात लसूण चा वापर प्रत्येक पदार्थामध्ये करावा , आरोग्यासाठी लाभदायक आहे ३] लसूणच्या लोणच्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो ४] हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी देखील लसूणच्या लोणच्या खूप फायदा आहे
लसूण लोणचे
लसूण चे लोणचे कसे बनवायचे
स्वादिष्ट गोड तिखट लसूण चे लोणचे कसे बनवायचे
बाजारातून लोणचे विकत आणण्यापेक्षा घरच्याघरी कमी साहित्यात स्वादिष्ट असे लसूण चे लोणचे बनवा
जे चवीला गोड तिखट आणि मसालेदार होईल
खूप कमी वेळात हे लोणचे तयार होते
साहित्य :
२५० ग्राम लसूण च्या पाकळ्या
१ चमचा लिंबाचा रस
छोटा चमचा मेथी दाणे
चवीपुरते जाड मीठ
१ छोटा चमचा साखर
१ चमचा हळद
१ मोठा चमचा लाल तिखट [ लाल तिखट गडद रंगाचे असावे ]
१ चमचा मोहरी
१ चमचा बडीशेप
छोटा चमचा हिंग
कृती
गॅस वर तवा ठेवावा , तवा गरम झाल्यावर त्यावर मीठ , मेथी दाणे आणि बडीशेप खरपूस भाजून घेणे
एक कढई घ्यावी त्यात तेल गरम करण्यास ठेवावे , तेल गरम झाल्यावर मोहरी टाका , मोहरी चांगली तडतडली कि गॅस बंद करा
एका भांड्यात सर्व लसूण पाकळ्या घ्या , त्यात हिंग , मेथी दाणे , मीठ , हळद , लाल तिखट घेऊन सर्व जिन्नस चांगलं एकत्र करा
आणि नंतर त्यात वरून तेल टाका
सर्व मिश्रण चांगलं एकत्रित करा
एक स्वच्छ कोरडी काचेची बरणी घ्या त्यात सर्व मिश्रण टाका आणि वरून लिंबाचा रस पिळा आणि साखर टाका पुन्हा एकदा चमच्याने ते एकत्र करा अश्या प्रकारे आपलं
आंबट गोड तिखट लसूनच लोणचं तयार आहे
लसूण च्या लोणच्याचे फायदे :
१] लसूण खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते
२] थंडीच्या दिवसात लसूण चा वापर प्रत्येक पदार्थामध्ये करावा , आरोग्यासाठी लाभदायक आहे
३] लसूणच्या लोणच्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो
४] हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी देखील लसूणच्या लोणच्या खूप फायदा आहे
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)