उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन

** आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दर्शन व्यवस्थेची पाहणी; मंदिर जतन कामाचा आढावा **

0 9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन

पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज) आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले. भाविकांची दर्शन रांगेत मोठी गर्दी असून त्यांना सुलभ व जलद दर्शन व्हावे, कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः मुखदर्शन घेऊन व्यवस्थेची पाहणी केली.  

यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले.  

सत्कार व कामांचा आढावा:  
मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. गृहराज्यमंत्री योगेश कदम व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचाही मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सत्कार केला.  

यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून, झालेल्या कामांची तसेच प्रस्तावित नवीन दर्शन मंडपाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर जतन, संवर्धन व नवीन दर्शन मंडपाच्या कामाबाबतची सविस्तर माहिती दिली.  

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉर बाबत नागरिकांशी चर्चा केली. व  विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

याप्रसंगी आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, नगराध्यक्षा प्रणिती भालके, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम आदी उपस्थित होते.

जयकुमार भगवानराव गोरे हे एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रमुख नेते आहेत. ते ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री, सोलापूरचे पालकमंत्री आहेत आणि सातारा जिल्ह्यातील मान-खटाव मतदारसंघाचे तीन वेळा आमदार आहेत.

ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. भाजपमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) प्रतिनिधित्व केले होते आणि अपक्ष आमदार म्हणूनही काम केले होते

ते महाराष्ट्रातील माण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

तीन वेळा आमदार असण्याव्यतिरिक्त, ते ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही कार्यरत आहेत

होय, सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात, सर्व भाविकांना २४ तास अखंड दर्शन मिळावे यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन पास बंद करण्यात आले होते

अधिक माहिती आणि सामाजिक कल्याणकारी उपक्रमांसाठीतुम्ही त्यांच्या अधिकृत जयकुमार गोरे वेबसाइटला भेट देऊ शकता.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User