ब्रेड पकोडा
टीप : १ ) उरलेल्या पिठात थोडी जिरपूड , लाल तिखट , आमचूर किंवा चाट मसाला घालून मिक्स करावे ब्रेडच्या उरलेल्या कडा या पिठात घोळवून भजीप्रमाणेच तळाव्यात . २ ) दुकानात किंवा गाडीवर त्रिकोणी तुकडे मिळतात . मी शक्यतो ४ तुकडे करते म्हणजे खायला सोपे पडते

ब्रेड पकोडा
झटपट नाश्त्यासाठी ब्रेड पकोडा कसा बनवायचा
लहान मुलांसाठी नाश्ता
Bread Pakoda In marathi
ब्रेड पकोडा
• ८ ब्रेड स्लाईस
• दिड कप बटाट्याची तिखट भाजी ( + मध्यम बटाटे )
• १ कप बेसन
• २ टेस्पून तांदूळ पिठ
पाणी
• १/४ टिस्पून हळद
• १/२ टिस्पून जिरे
• चिमुटभर खायचा सोडा
• चवीपुरते मिठ • तळण्यासाठी तेल
• कृती :
• बटाटे शिजवल्यावर लगेचच भाजी बनवावी म्हणजे बटाटे चांगल्याप्रकारे मॅश होतात आणि गुठळ्या राहात नाही . बटाट्याची भाजी जरा तिखट असावी नाहीतर भजी तळल्यावर तिखटपणा कमी लागतो . • वाडग्यात बेसन आणि तांदूळ पिठ एकत्र मिक्स करावे त्यात पाणी घालून पिठ भिजवावे . हे पिठ पातळही नसावे आणि एकदम घट्ट सुद्धा नसावे . त्यात हळद , खायचा सोडा आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे . • ब्रेड स्लाईसच्या कडा काढून टाकाव्यात ( टीप १ ) एक ब्रेडचा स्लाईस घेऊन त्यावर २ ते ३ चमचे भाजी एकसमान पसरवावी . त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवावा . सुरीने आवडीनुसार कापून तुकडे करावेत . ( टीप २ ) • प्रत्येक तुकड्यावर पावाच्या दोन्ही बाजूंवर ३ ते ४ थेंब पाणी शिंपडून हलकेच प्रेस करावे . ( टीप ३ ) • तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे . बटाटा भाजी घातलेले पावाचे तुकडे भिजवलेल्या पिठात घोळवून मिडीयम हाय गॅसवर गोल्डन रंगावर तळून घ्यावेत . • सर्व्ह करताना पुदीना चटणी , चिंचेची चटणी , किंवा टोमॅटो केचपबरोबर द्यावे . ज्यांना एक्स्ट्रा स्पाईसी • खायला आवडत असेल त्यांनी शेजवान सॉसबरोबर हे पकोडे ट्राय करून पाहावेत .
टीप : १ ) उरलेल्या पिठात थोडी जिरपूड , लाल तिखट , आमचूर किंवा चाट मसाला घालून मिक्स करावे ब्रेडच्या उरलेल्या कडा या पिठात घोळवून भजीप्रमाणेच तळाव्यात . २ ) दुकानात किंवा गाडीवर त्रिकोणी तुकडे मिळतात . मी शक्यतो ४ तुकडे करते म्हणजे खायला सोपे पडते . ३ ) ब्रेडचा कोरडा तुकडा पिठात घोळवल्यावर , तो पिठ आत शोषून घेतो आणि मग आतपर्यंत गेलेले पिठ निट न शिजल्याने भजी कच्ची राहते म्हणून ब्रेडवर थोडे पाणी शिंपडल्याने , पिठ आतपर्यंत शोषले जात नाही आणि भजी छान तळली जाते . ४ ) जर प्लेन पकोडे बनवायचे असतील तर बटाट्याची भाजी करू नये फक्त ब्रेडचे कापलेले तुकडे भिजवलेल्या पिठात बुडवून नेहमीसारखे तळावे .