दाल फ्राय

दाल फ्राय
दाल फ्राय

दाल फ्राय

 साहित्य :

१ कप तूरडाळ ,                

पाव चमचा हळद ,

चिमूटभर हिंग ,

३ चमचे बटर ,

मोहरी ,

जिरे ,

 कढीपत्ता ,

खूप सारा कांदा ,

२ हिरव्या मिरच्या ,

दीड चमचे धनेपूड ,

१ चमचा लाल तिखट ,

१ चमचा गरम मसाला ,

लसणाच्या १०-१२ पाकळ्या ,

आवडत असल्यास १ चमचा कसुरी मेथी ,

चवीपुरते मीठ ,

कृती :

तुरडाळ पाणी घालून स्वच्छ धुऊन घ्या प्रेशर कुकरमध्ये काढून घ्या . यामध्ये दोन कप पाणी घाला . हळद व हिंग घाला . झाकण लावा आणि मध्यम आचेवर चार शिट्ट्या काढून घ्या . पॅनमध्ये बटर घाला . थोडेसं गरम झालं की यामध्ये फोडणी घाला . मोहरी घाला . मोहरी तडतडल्यावर जिरे घाला , कढीपत्ता घाला आणि कांदा घाला . तांबूस रंग आला की , खूप सारा टोमॅटो घाला . टोमॅटोमध्ये थोडासा आंबटपणा असतो तो आवडत नसेल तर थोडी साखर घाला . आता यामध्ये हिरवी मिरची , धनेपूड , लाल तिखट , किचन किंग गरम मसाला , लसणाच्या पाकळ्या ओबडधोबड बारीक करून मिक्स करा . झाकण ठेवा . टोमॅटो शिजेपर्यंत शिजवा . डाळ चांगली एकजीव करून घ्या . घोटलेली डाळ यात घाला . थोडंसं पाणी घाला . ढवळून घ्या . यामध्ये चवीपुरतं मीठ घाला . आवडत असल्यास एक चमचा कसुरी मेथी घाला . पाच ते सात मिनिटे उकळी काढून घ्या . हा झाला दाल फ्राय तयार . तडका हवा असल्यास तेलात ठेचलेला लसूण घाला . सोनेरी रंग आल्यावर त्यात सुकलेली लाल मिरची घाला . छान परतून घ्या . दणदणीत तडका या दाल फ्रायवर द्या . जिराराईस बरोबर खूप छान लागतो .