अंडा बिर्यानी

सगळ्यात सोपं , स्वादिष्ट म्हणजे अंडा घालून बनवलेली अंडा बिर्याणी हि पौष्टिक पाककृती आहे अंडी हि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे , ह्यामध्ये असलेल्या प्रथिनांमुळे भरपूर पोषण मिळत बरेचदा उकडलेल्या अंड्याचा उपयोग हा healthy नाश्त्यासाठी म्हणून केला जातो , कारण त्यानंतर लवकर जेवण केलं नाही तरी आपण पोटभर तसेच healthy असा नाश्ता केला आहे ह्याच समाधान असत बरेच अभिनेता / अभिनेत्री हे अंड्याचा समावेश आपल्या आहारामध्ये करतात , कारण हे विशेषकरून वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करत अंडी आपली त्वचा आणि केसांच्या समस्या दूर करतात कच्चे अंडे केसांमध्ये लावल्याने कोंडा , केस गळण्याची समस्या दूर होते , आणि केस मजबूत होतात

0 13
अंडा बिर्यानी
अंडा बिर्यानी

2]

अंडा बिर्यानी कशी बनवायची

अंडी हे सुपरफूड म्हणून मानले जाते

साहित्य :

२ वाटी बासमती तांदूळ भिजवलेले

५ उकडलेली अंडी [ साले काढून घेणे ]

१ वाटी तेल [ लागेल तस ]

२ मध्यम आकाराचे लालसर टमाटो  [ बारीक चिरलेले ]

२ मध्यम कांदे [ उभे पातळ चिरून घेणे ]

१ चमचा आलं लसूण पेस्ट

अर्धी वाटी कोथिंबीर आणि पुदिना [ बारीक चिरलेली ]

१ चमचा लाल तिखट [ आपल्याला  हवं तस  चवीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता ]

१ चमचा गरम मसाला

अर्धा चमचा हळद

२ वेलची

२ लवंग

१ ते २ मिरी

छोटासा दालचिनी चा तुकडा

१ चमचा दही

४ ते ५ काजू बी

१ चमचा तूप

चवीप्रमाणे मीठ

 

कृती :

 

उकडलेल्या अंड्यानं सुरीने चिरा पाडून घेणे , त्याला हळद , लाल तिखट , गरम मसाला पावडर थोडं मीठ आणि  दही चांगलं सर्व बाजूनी लावून बाजूला ठेवून द्यावे

कढईत तेल गरम करून घेणे , त्यात थोडा कांदा उभा चिरलेला तळून घ्यावा तळून झाला कि बाजूला काढून ठेवावा

त्याच कढईत सर्व गरम मसाले वेलची , दालचिनी , मिरी , लवंग , आणि कांदा एकत्र करून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावे

आता त्याच आलं लसूण पेस्ट टाकून २ ते ३ मिनिट परतून घ्यावे आणि लगेच त्यात बारीक चिरलेला टमाटो घालून ३ ते ४ मिनिट शिजू द्यावे

त्यात आता कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरलेला टाकून द्यावा

२ ते ३ मिनिट नंतर त्यामध्ये लाल तिखट आणि हळद घालावे , सर्व मिश्रण थोडा वेळ परतून घ्यावे आणि त्यात लागेल तेवढे पाणी आणि चवीपुरते मीठ घालावे

पाण्याला उकळी आली कि त्यामध्ये तूप आणि बासमती तांदूळ घालावे , सर्व जिन्नस चांगले एकत्रित करावे

आता तांदूळ मध्ये , मसाला लावून ठेवलेली अंडी घालून १५ ते २० मिनिट मंद गॅस वर भात  शिजू द्यावा

२० मिनिट नंतर , भात शिजला का ते तपासून बघावे , भात शिजून झाल्यावर हलक्या हाताने हलवावं [ भाताची शीत हे मोकळे असावे ह्याची काळजी घ्यावी ]

तळेलेले  कांद्याचे काप आणि बारीक चिरलेली   कोथिंबीर वरून टाकून सजावट करावी  [ तुम्ही तळेलेले काजू देखील वरून टाकू शकता ]

अश्या प्रकारे  अंडा बिर्याणी तयार आहे

रायता सोबत हि अंडा बिर्याणी सर्व्ह करा

हि पौष्टिक अंडा बिर्याणी तुमचं आरोग्य  चांगलं ठेवेल आणि तुम्ही उत्साही राहाल

टीप : अंडा बिर्याणी मध्ये बिर्याणी मसाला किंवा मटण मसाला घातल्याने अंडा बिर्याणीची चव अजून स्वादिष्ट होते

 

अंड्याचे अनेक फायदे आहेत

सगळ्यात सोपं , स्वादिष्ट म्हणजे अंडा घालून बनवलेली अंडा बिर्याणी हि पौष्टिक पाककृती आहे

अंडी हि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे , ह्यामध्ये असलेल्या प्रथिनांमुळे भरपूर पोषण मिळत

बरेचदा उकडलेल्या अंड्याचा उपयोग हा healthy  नाश्त्यासाठी म्हणून केला जातो , कारण त्यानंतर लवकर जेवण केलं नाही तरी आपण पोटभर तसेच healthy  असा नाश्ता केला आहे ह्याच समाधान असत

बरेच अभिनेता / अभिनेत्री हे अंड्याचा समावेश आपल्या आहारामध्ये करतात , कारण हे विशेषकरून वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करत

अंडी आपली त्वचा आणि केसांच्या समस्या दूर करतात

कच्चे अंडे केसांमध्ये लावल्याने कोंडा , केस गळण्याची  समस्या दूर होते , आणि केस मजबूत होतात

 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User