पनीर भुर्जी
पनीर भुर्जी हि सगळ्यात जास्त लवकर होणारी आणि स्वादिष्ट अशी डिश आहे , जिला आपण आवडीने चवीने पाव , चपाती , ब्रेड , रोटी सोबत खाऊ शकतो काही ठिकाणी पनीर भुर्जी चा उपयोग पनीर कुलच्या सोबत देखील केला जातो पनीर पासून बरेच पदार्थ बनवले जातात त्यातलाच पनीर भुर्जी हि प्रसिद्ध अशी डिश आहे अगदी हॉटेल मध्ये जशी बनवतात तशीच आपण घरच्याघरी पनीर ची भुर्जी बनवू शकतो
पनीर भुर्जी
घरच्या घरी झटपट पनीर भुर्जी कशी बनवायची
स्वादिष्ट आणि सोपी पनीर भुर्जी रेसिपी कशी बनवायची
पनीर भुर्जी हि सगळ्यात जास्त लवकर होणारी आणि स्वादिष्ट अशी डिश आहे , जिला आपण आवडीने चवीने पाव , चपाती , ब्रेड , रोटी सोबत खाऊ शकतो
काही ठिकाणी पनीर भुर्जी चा उपयोग पनीर कुलच्या सोबत देखील केला जातो
पनीर पासून बरेच पदार्थ बनवले जातात त्यातलाच पनीर भुर्जी हि प्रसिद्ध अशी डिश आहे
अगदी हॉटेल मध्ये जशी बनवतात तशीच आपण घरच्याघरी पनीर ची भुर्जी बनवू शकतो
चला तर आपण बघूया आता पनीर भुर्जी कशी बनवायची
पनीर भुर्जी मध्ये आपण बारीक चिरलेल्या कांदा , टमाटो टाकू शकतो किंवा त्याची पेस्ट / ग्रेव्ही सुद्धा टाकू शकतो आपल्या आवडीनुसार आपण त्याचा वापर करू शकतो
चला आपण बघूया पनीर भुर्जी कशी बनवायची ते
घरच्या घरी स्वादिष्ट पनीर भुर्जी साठी लागणारे साहित्य
१ मोठी वाटी बारीक केलेलं पनीर [ पाव ]
२ चमचे तेल
छोटा क्यूब अमूल बटर
अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा
पाऊण वाटी बारीक चिरलेला टमाटो [ मला टमाटो खूप आवडतो म्हणून मी पाऊण वाटी घेतलेला आहे , तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ]
१ छोटा चमचा पाव भाजी मसाला
१ चमचा लाल तिखट
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा जिरे
२ ते ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या [ तुम्हाला जस तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखट आणि हिरव्या मिरचीचा वापर करावा ]
१ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
पनीर भुर्जी कशी बनवायची त्याची कृती बघू
गॅस वर एक कढई ठेवा
कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा
तेल गरम झालं कि , त्यात फोडणीसाठी जिरे टाका
जिरे तडतडले कि त्यात बारीक चिरलेला कांदा टाका
कांदा मंद आचेवर परतून घ्या , २ ते ३ मिनिट कांदा परतून झाल्यावर त्यात टमाटो टाका
आणि थोडास २ चमचे पाणी टाका
कढई वर झाकण ठेवून १ ते २ मिनिट वाफ़ेवर पुन्हा परतून घ्या
झाकण काढून त्यात हळद , मिरची , लाल तिखट , मीठ टाकून एकदा सर्व मिश्रण एकत्रित करा
बारीक स्मॅश केलेलं पनीर टाका ,
पनीर टाकल्यानंतर त्यात पाव भाजी मसाला टाका
चांगले सर्व मिश्रण अलगद एकत्रित करा , जास्त पण मिक्स करू नका पनीर हे दिसून आलं पाहिजे , त्याचा लगदा होऊ देऊ नका
आता वरून कोथिंबीर आणि अमूल बटर च छोटा क्यूब टाकून सर्व्ह करा
अश्या प्रकारे आपली पनीर भुर्जी घरच्या घरी ती सुद्धा हॉटेल सारखी तयार आहे
सोबत सॅलड म्हणून कांदा लिंबू काकडी लॉन्च घेऊन तुम्ही ब्रेड , पाव , चपाती , फुलके सोबत पनीर भुर्जी खाऊ शकता
अगदी उत्तम स्वादिष्ट अशी हि गरमा गरम खाण्यास पनीर भुर्जी तयार आहे
तुम्हाला हि डिश आवडली असेल तर नक्की बनवून मला प्रतिक्रिया कळवा
तुम्ही कोणत्या पद्धतीने पनीर ची भुर्जी बनवता मला नक्की कमेंट मध्ये कळवा ,
काही ह्या डिश मध्ये बदल करायचा असल्यास मला नक्की सांगा
धन्यवाद
पनीर चे फायदे
पनीर मध्ये व्हिटॅमिन ए , फॉस्फरस , आणि कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते
पनीर नित्यनियमाने आपल्या आहारामध्ये असं अत्यंत गरजेचे आहे
वाढत्या वयामध्ये स्त्रियांची मासिक पाळी गेल्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर हाडांचे दुखते इत्यादी त्रास हे जाणवू लागतात म्हणून आपण वेळीच आपल्या आहाराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे
पनीर हा असा पदार्थ आहे ज्यापासून आपण कित्येक डिशेस / रेसिपी बनवू शकतो त्यामुळे पनीर चा वापर आपल्या आहारात नेहमी असला पाहिजे
ह्यामुळे हाडे ठिसूळ होणे , हाडे कमकुवत होणे ह्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकतो
त्याचप्रमाणे योग्य आहारासोबत , योग नित्यनियमाने व्यायाम करणे हे देखील तितकेच गरजेचे आहे
पनीर हे रबर सारखे असते म्हणून त्यात मुळातच चिकटपणा असतो
जे लोक शाखाहारी असतात , त्या लोकांनी आपल्या हाड आणि स्नानयूसाठी पनीर खाणे अत्यंत गरजेचे आहे
पनीर मध्ये कॅल्शियम हे असतेच त्याचबरोबर कॉन्जुगेट लिनोलिक ऍसिड नावाचे फॅटी ऍसिड असते जे आपल्या शरीरातील फॅट्स / चरबी कमी करण्यास मदत करते
म्हणूनच बरेच डॉक्टर , न्यूट्रिंशल वजन कमी करण्यासाठी पण त्याचप्रमाणे शरीराचे आरोग्य देखील तितकेच नियंत्रित राहण्यासाठी पनीर खाण्याचा सल्ला देतात
पनीर चे काही इतर फायदे
पनीर हे एक आपल्या शरीराला , स्नायूंना ऊर्जा देणारा पदार्थ आहे असं म्हणायला काही हरकत नाही
बरेच लोकांना नाश्ता हा हलका पण आरोग्यदायी हवा असतो
ते लोक पनीर खान पसंद करतात
पनीर हे हाडे , स्नायू सोबतच शरीरातील साखरेवर देखील नियंत्रण ठेवण्याचं काम करत
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)