शेंगदाण्याची सुकी चटणी कशी बनवायची
शेंगदाण्याचे फायदे • थंडी मध्ये भिजलेले शेंगदाणे आणि गुळ खाण्यामुळे सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्या दूर होतात. • लहान मुलांना सकाळी भिजलेले शेंगदाणे खायला दिल्यामुळे त्यांना विटामिन 6 मिळते ज्यामुळे डोळ्यांची नजर चांगली राहते आणि स्मरणशक्ती चांगली होते. • शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते. याच सोबत शरीराला उर्जा आणि स्फूर्ती मिळते. • शेंगादाण्यात असलेले तेल ओला खोकला आणि भूक न लागणे या समस्या दूर करते. • रोज मुठ भर शेंगदाणे खाण्यामुळे महिला कैंसर पासून दूर राहतात. कारण यामध्ये असलेले 1. एंटीऑक्सीडेंट, 2. आयरन, 3. नियासिन, 4. फोलेट, 5. कैल्शियम आणि जिंक शरीराला कैंसर सेल्स सोबत लढण्यास मदत करतात. • शेंगदाणे नियमित खाणे गर्भवती महिलांच्यासाठी पण चांगले असते. हे गर्भाच्या वाढीसाठी मदत करते.
शेंगदाण्याची सुकी चटणी कशी बनवायची
साहित्य
अर्धा कप शेंगदाणे [ भाजून घेणे , सालासकट ]
एक छोटा चमचा तीळ [ हलके खुरपूस भाजून घेणे , आवडत असल्यास ]
पाव कप खोबऱ्याचा किस
५ ते ६ पाकळ्या लाल सुक्या मिरच्या
१ चमचा तेल
चवीप्रमाणे मीठ
कृती
शेंगदाण्याची सुकी चटणी कशी
शेंगदाणे खमंग भाजावेत
भाजलेल्या शेंगदाण्याचा साल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या , आवडत नसल्यास साले काढून घ्या
लाल मिरच्या तुम्हाला जसे तिखट हवे आहे त्याप्रमाणे घ्या , कमी जास्त करू शकता
१ चमचा तेलात त्या सुक्या लाल मिरच्या थोड्या भाजून घ्या
खोबऱ्याचा किस सुद्धा त्या तेलात भाजून घ्या
सर्व जिन्नस थंड झाल्यावर एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या
हि शेंगदाण्याची सुकी चटणी केव्हाही भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर चपाती सोबत , वरण भात सोबत किंवा वडापाव सोबत वैगरे खूप चविष्ट लागते
मला विशेष हि चटणी ब्रेड बटर आणि त्यावर हि थोडी चटणी खूप जास्त आवडते , तुम्ही पण एकदा खाऊन बघा
आणि प्रतिक्रिया नक्की कळवा
शेंगदाण्याचे फायदे
· थंडी मध्ये भिजलेले शेंगदाणे आणि गुळ खाण्यामुळे सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्या दूर होतात.
· लहान मुलांना सकाळी भिजलेले शेंगदाणे खायला दिल्यामुळे त्यांना विटामिन 6 मिळते ज्यामुळे डोळ्यांची नजर चांगली राहते आणि स्मरणशक्ती चांगली होते.
· शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते. याच सोबत शरीराला उर्जा आणि स्फूर्ती मिळते.
· शेंगादाण्यात असलेले तेल ओला खोकला आणि भूक न लागणे या समस्या दूर करते.
· रोज मुठ भर शेंगदाणे खाण्यामुळे महिला कैंसर पासून दूर राहतात.
कारण यामध्ये असलेले
1. एंटीऑक्सीडेंट,
2. आयरन,
3. नियासिन,
4. फोलेट,
5. कैल्शियम आणि जिंक शरीराला कैंसर सेल्स सोबत लढण्यास मदत करतात.
· शेंगदाणे नियमित खाणे गर्भवती महिलांच्यासाठी पण चांगले असते.
हे गर्भाच्या वाढीसाठी मदत करते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)