गुळाचा चहा
गुळामध्ये इतर पोषकमुल्यांसोबत झिंक आणि सेलेनियमही भरपूर असते. ज्यामुळे तुमचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. आजकाल प्रतिकार शक्ती मजबूत करण्याची खूप गरज आहे. कारण बाहेरील वातावरण चिंताजनक आणि निराशाजनक झालेले आहे. अशा काळात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उत्तम उपाय म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवणारे पदार्थ आहारात वाढवणे. गुळामुळे प्रतिकार शक्ती वाढत असल्यामुळे तुम्ही नियमित गुळाचा चहा यासाठी नक्कीच पिऊ शकता.
गुळाचा चहा
साहित्य :
अर्धा कप पाणी ,
१ चमचा चहापावडर ,
पाव चमचा किसलेलं आलं ,
१ कप दूध ,
आवडीप्रमाणे : गूळ .
कृती :
पातेल्यात पाणी उकळायला ठेवा . त्यात चहापावडर आणि किसलेलं आलं घाला . हे उकळून घ्या . उकळत आल्यावर दूध घाला . दुधाला छान उकळी काढून घ्या . गॅस बारीक करा आणि मग त्यात आवडीप्रमाणे गूळ घाला . गूळ घातल्यावर दूध फाटण्याची शक्यता असते . त्यामुळे शक्यतो गूळ उकळत्या दुधात घालायचा नाही . गॅस लो हिटवर करा मग गूळ घालून मिक्स करा . गूळ विरघळल्यावर गरमागरम चहा सर्व्ह करा .
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)