कांद्याच्या पातीचा झुणका

कांद्याच्या पातीचे फायदे १. कांद्याच्या पातीचं सेवन केल्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. २. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

0 6
कांद्याच्या पातीचा झुणका
कांद्याच्या पातीचा झुणका

कांद्याच्या पातीचा झुणका

कांद्याच्या पातीचा झुणका कसा बनवायचा

Kandyachya Paticha Zunka Kasa Banvaycha

 

 

 साहित्य :

 • कांद्याची पात एक जुडी 

हरभरा डाळीचं पीठ एक वाटी

 • हळद अर्धा चमचा 

मिरची पावडर एक चमचा 

तेल पळीभर 

जिरं एक चमचा 

मोहरी 

पाणी

 • चवीनुसार मीठ 

कृती : 

कांद्याच्या पातीपासून कांदे वेगळे काढावेत . पात स्वच्छ धुवून चिरून घ्यावी . त्यामध्ये डाळीचं पीठ , तिखट , मीठ घालून एकत्र करावं . जिरं - मोहरीची फोडणी करावी . मग एक केलेलं पात आणि पीठ टाकावं . अर्धा कप पाण्याचा हबका मरवा . अलगद मिश्रण हलवावं .. झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ येऊ दयावी . मग परत हलवून पाच मिनिटं झाकण न ठेवता झुणका होऊ दयावा .

 

 

 

 

कांद्याच्या पातीचे फायदे 

 

१. कांद्याच्या पातीचं सेवन केल्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

२. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

३. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

४. हाडे मजबूत होतात.

५. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं.

६. व्हायरल तापापासून बचाव होतो.

 

 

 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User