ओल्या हळदीचं लोणचं
ओल्या हळदीचं लोणचं विशेषतः ओळ हळद हि हिवाळ्यामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात दिसून येते ओली हळद हि मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक आहे रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास , पचन क्रिया , रक्ताचे शुद्धीकरण तसेच त्वचेसाठी हळद खूप फायदेशीर आहे ओल्या हळदीचे लोणचे चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे
ओल्या हळदीचं लोणचं
विशेषतः ओळ हळद हि हिवाळ्यामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात दिसून येते
ओली हळद हि मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक आहे रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास , पचन क्रिया , रक्ताचे शुद्धीकरण तसेच त्वचेसाठी हळद खूप फायदेशीर आहे
ओल्या हळदीचे लोणचे चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे
ओल्या हळदीचं लोणचं कसे बनवायचे
आंबट गोड तिखट ओल्या हळदीचं लोणचं कसे बनवायचे
साहित्य
१ वाटी भरून ओली हळद [ उभी बारीक चिरलेली ]
१ वाटी आलं [ उभं बारीक चिरलेले ]
४ ते ५ हिरव्या मिरच्या [ उभ्या बारीक चिरलेल्या ]
जाड मीठ [ चवीपुरते ]
१ मोठा चमचा मोहरी
१ चमचा मेथी दाणे
अर्धा चमचा हिंग
१ वाटी तेल
एक छोटा चमचा साखर
कृती
ओली हळद , आलं , आणि मिरची स्वछ धुवून घ्यावेत , कोरडे करून उभं बारीक चिरून त्याचे काप करावेत आणि थोडे मीठ त्याला लावून ठेवावे
[ आलं आणि हळदीचे वरचे साल काढून घ्यावेत ]
सर्व जिन्नस एकत्र एक भांड्यात ठेवावे
मेथी दाणे आणि मीठ तव्यावर हलके खरपूस भाजून घ्यावे , असं केल्याने एक विशिष्ट भाजकी चव आणि सुवास येतो
गॅस वर एका कढईत तेल गरम करण्यास ठेवणे त्यात मोहरी टाकावी , मोहरी चांगली तडतडली कि गॅस बंद करावा
आता हे तेल वरील मिश्रणात घालावे आणि बाकी हिंग, साखर उरलेले मीठ सर्व चांगलं एकत्र करावे
एक काचेची बरणी घ्यावी ती स्वच्छ आणि कोरडी करावी , त्यात हे सर्व मिश्रण टाकावे
तुम्ही ह्यात लसूण च्या पाकळ्या सुद्धा टाकू शकता त्याचप्रमाणे १ ते २ दिवसानंतर लिंबू चा २ ते३ चमचे रस पण टाकू शकता
नाहीतर अश्या पद्धतीने कमी वेळात कमी साहित्यात देखील हे लोणचे तयार होते
हि बरणी कोरड्या जागी ठेवावी , त्याला थोडे उन्हात देखील ठेवावी आणि रोज हि बरणी हलवावी जेणेकरून बरणीतील तेल सर्व जिन्नस ला राहील आणि तो लोणच्यात ओलावा टिकून राहील
६ ते ७ दिवसात हे लोणचे चांगले मुरून खाण्यास स्वादिष्ट आणि आरोग्यदायी ओल्या हळदीचे लोणचे तयार आहे
ओल्या हळदीच्या लोणच्याचे फायदे
१] तोंडाला चव नसेल तर किंवा साधं वरण भातासोबत , चपाती सोबत हे लोणचं खूप लाभदायक आहे
२] ओल्या हळदीच्या लोणच्यामुळे पचन क्रिया व्यवस्थितरीत्या होते
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
1
Sad
0
Angry
0

Comments (0)