मूगडाळ तडका
मूग पचायला हलका असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे आपण आपल्या रोजच्या आहारात मूगडाळीचा उपयोग करायला हवा. मूग भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. यामुळे वजन घटवण्याचा प्रयत्न करणार्यांनी मधल्या वेळेत लागणार्या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग खाणं फायदेशीर आहे. तसेच मूग खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रासही आटोक्यात राहतो. यामुळे रक्तातील मॅग्नेशियमचा प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मूगडाळ तडका
साहित्य :
अर्धा कप मूगडाळ ,
१ चिरलेला टोमॅटो ,
बारीक चिरून कोथिंबीर पाने ,
१ चमचा तूप ,
२-३ चिरलेल्या मिरच्या ,
चवीनुसार मीठ ,
१ चमचा लसूण पेस्ट ,
८-१० कढीपत्ता पाने ,
पाव चमचा हळद ,
पाव चमचा हिंग ,
अर्धा चमचा मोहरी ,
कृती :
२-३ वेळा पाण्यात मूगडाळ चांगली धुवा . डाळ प्रेशर कुकरच्या डब्यामध्ये घ्या . त्यात पाणी , टोमॅटो , हळद घालून मिक्स करा . झाकण ठेवून मध्यम आचेवर ३ ४ शिट्ट्या करून शिजू द्या . झाकण काढा आणि डाळ चांगल्या तऱ्हेने मॅश करा . डाळ एका पॅनमध्ये काढा . एकजीवपणा येण्यासाठी पाणी घाला . जसा वेळ जातो तशी मूगडाळ घट्ट होत जाते . त्यामुळे त्यानुसार पाणी कमी - जास्त करा . गॅस चालू करा . पॅनमध्ये डाळ घेऊन त्यात चवीपुरते मीठ घाला . चांगले मिक्स करा आणि उकळी आणा . तापलेल्या तडका पॅनमध्ये तूप गरम करून घ्या . त्यात मोहरी घाला आणि ती तडतडू द्या . त्यात जिरे घालून ते चांगले तडतडू द्या . आता त्यात हिंग , लसूण पेस्ट व तळलेला लसूण घालून मिक्स करा . जेव्हा लसणाला छान तांबूस रंग येतो तेव्हा त्यात कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घाला . चांगले मिक्स करा . उकळत्या डाळीवर हा तडका घालून गॅस बंद करा . कोथिंबीर घाला .
टीप : हे तुम्ही सूप म्हणूनही खाऊ शकता . तुम्ही चपाती , नान , फुलका याबरोबरही सर्व्ह करू शकता . साध्या भाताबरोबरही छान लागते .
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)