कैरीचे चटपटीत लोणचे

कैरीच्या लोणच्याचे फायदे १] कैरी मध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळत ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते २] कैरी मूळे पचन क्रिया व्यवस्थित रित्या होण्यास मदत होते ३] दातांचे किंवा हिरडीच्या समस्या असल्यास कैरी खाणे / कैरीचे लोणचे खाणे फायदेशीर आहे ४] कैरीमुळे शुगर लेव्हल हे कंट्रोल मध्ये राहते , त्यामुळे डायबेटिक व्यक्तीने रोज चवीपुरते लोणचे जेवणात घेणे फायद्याचे आहे ५] केसांसाठी सुद्धा कैरी हि फायदेशीर आहे कारण ह्यात व्हिटॅमिन सी चा समावेश आहे

0 8
कैरीचे चटपटीत लोणचे
कैरीचे चटपटीत लोणचे

लोणचे :

लोणचे बद्दल थोडेसे :

मला तरी वाटत जेवणाच्या ताटातील लोणचे हा अविभाज्य घटक आहे लोणचं नसलं तर जेवणात काय मजा

जेवताना चपाती भाजी सोबत एक आंबट गोड तिखट चवीमध्ये बदल आणणारा पदार्थ म्हणजे लोणचे

आरोग्याच्या गोष्टीने सुद्धा लोणचे खाण्याचे फायदे आहेत

लोणचे हे बरेच प्रकारचे असतात जसे कि कैरी , लिंबू , मिरची , लसूण , गाजर , करवंद , ओली हळद इत्यादी

मी तर असे बरेच लोणचे प्रकार ऐकले आहेत , खाल्ले काही त्यातील क्ववचितच

 

लोणचे खाण्याचे फायदे काय आहेत ?

१] चवीमध्ये वाढ करणे , त्यात स्वादिष्ट पणा आणणे हा तर मूळ गुणधर्म , फायदा आहे लोणच्याचा

२] असं ऐकलं मी कि गरोदर पणात महिलेला अचानक आंबट पदार्थ खावा वाटलं कि लोणचं केव्हाही चांगलं

३] लोणचं खाल्ल्याने पचन क्रिया हि व्यवस्थित रित्या होण्यास मदत होते

४] संशोधनानुसार लोणचे हे मधुमेह वर नियंत्रण आणते [ विशेतः ते आवळ्याचे लोणचे असावे ] ते मर्यादित प्रमाणात खावे

 

 

 

लोणचे प्रकार

कैरीचे चटपटीत लोणचे कसे बनवायचे

 

साहित्य

कैरी [ मध्यम आकाराचे , कडक , अर्धा किलो ]

तेल १ वाटी [ जे तुम्ही वापरत असाल रेगुलर ]

अर्धी वाटी मोहरी

अर्धी वाटी लाल तिखट

अर्धी वाटी मीठ [ जाड मीठ असेल असेल तर पाऊण किंवा पाव वाटी घ्या ]

१ चमचा मेथी दाणे [ मेथी दाणे आयुर्वेदिक आहेत , आरोग्यासाठी चांगले आहे , तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता ]

१ चमचा  बडीशेप

पाव वाटी हळद

१ चमचा हिंग

 

कृती :

कढईत तेल गरम करण्यास ठेवावे  

तेल गरम करून झालं कि , गॅस बंद करावा

त्यात मोहरी घालावी , ती चांगली तडतडू द्यावी

नंतर त्यात हिंग , हळद , मेथी दाणे , बडीशेप आणि मीठ घालून सर्व जिन्नस चांगले मिक्स करावे

तेल थोडं थंड झालं कि त्यात लाल तिखट घालावे , हे सर्व जिन्नस करपणार नाही ना ह्याची काळजी घ्यावी

सर्व मिश्रण चांगलं थंड होऊन , मसाला पूर्ण थंड झाल्यावर तुम्हाला हव्या त्या आकारात कैरीच्या फोडी करून घ्याव्या

आणि त्या ह्या मिश्रणात घालाव्या

आता हे सर्व चांगलं एकत्रित करून , स्वछ कोरड्या काचेच्या बरणीत लोणचं भरून घ्यावे , ते रोज बरणी एक दोन वेळा हलवून घ्यावी

असं केल्याने तेल सर्व कैरीच्या फोडीनं लागेल आणि तो ओलावा लोणच्या मध्ये राहील

अश्या प्रकारे आपले कैरीचे चटपटीत झटपट लोणचे तयार आहे

 

टीप :

बडीशेप , मीठ हे ओबडधोबड तव्यावर भाजून घेणे असे केल्याने लोणच्याची चव हि जास्त चविष्ट होते

लाल तिखट चा रंग हा गडद लाल रंगाचा असावा , म्हणजे आपल्या लोणच्याचा रंग सुद्धा खुलून येतो 

 

कैरीच्या लोणच्याचे फायदे

१] कैरी मध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळत ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते

२] कैरी मूळे पचन क्रिया व्यवस्थित रित्या होण्यास मदत होते

३] दातांचे किंवा  हिरडीच्या समस्या असल्यास कैरी खाणे / कैरीचे लोणचे खाणे फायदेशीर आहे

४] कैरीमुळे शुगर लेव्हल हे कंट्रोल मध्ये राहते , त्यामुळे डायबेटिक व्यक्तीने रोज चवीपुरते लोणचे जेवणात घेणे फायद्याचे आहे

५] केसांसाठी सुद्धा कैरी हि फायदेशीर आहे कारण ह्यात व्हिटॅमिन सी चा समावेश आहे

 

घातक:

ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी लोणच्याचा सेवन करू नये

 

 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User