आवळ्याचे लोणचे

आवळ्याचं लोणचं चे फायदे ; १] आवळ्याचे लोणचे हे रोज खान अत्यंत लाभदायक आहे कारण आवळ्याचे लोणचे हे पित्ताचा त्रास , वाताचा त्रास , अपचन साठी अत्यंत फायदेशीर आहे २] तसेच वारंवार ज्यांचे केस गळतात त्यांनी देखील आवळा च सेवन रोज केले पाहिजे नियमित सेवन केल्याने केस गळतीवर नियंत्रण राहते ३] आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते त्यामुळे आपली त्वचा , डोळे आपलं रक्तशुद्धीकरण हे व्यवस्थित राहते ४] मधुमेह साठी देखील आवळ्याचे मोठ्या प्रमाणावर योगदान आहे

0 13
आवळ्याचे लोणचे
आवळ्याचे लोणचे

आवळ्याचे लोणचे

आरोग्यदायी आवळ्याचे लोणचे कसे बनवायचे

 

साहित्य

६ ते ७ आवळे

२ चमचे लोणच्याचा मसाला [ तुम्ही जो वापरता तो तुम्ही घेऊ शकता , मी क्रेप मसाला वापरत आहे ]

१ चमचा लाल तिखट [ लाल तिखट गडद रंगाचा घ्या ]

१ वाटी तेल

१ छोटा मोहरी

अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा कमी  हिंग

अर्धा चमचा हळद 

१ चमचा मीठ

 

कृती

आवळे धुवून .स्वच्छ कोरडे करून घ्यावेत

आवळ्याचे उभे आडवे  असे प्रत्येक आवळ्याचे फोडी करून घ्यावेत [ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फोडी / काप करू शकता मोठी / लहान अश्या प्रकारे ]

आवळ्याचे फोडी करून झाल्या कि त्यात लोणचे मसाला , मीठ , लाल तिखट घालावे

व्यवस्थित रित्या ते मिश्रण एकत्र करावे

१ ते २ तास ते तसाच ठेवावं , चांगलं मुरून द्यावे

गॅस वर एक कढई ठेवावी त्यात तेल गरम करण्यास ठेवावे

तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी ची फोडणी द्यावी ,  मोहरी चांगली तडतडली कि त्यात हळद आणि हिंग घालावे

गॅस बंद करावा , आणि तेल थंड करण्यास ठेवावे

फोडणी थंड झाल्यावर ते आवळ्याच्या फोडींमध्ये मिक्स करावे

पूर्ण मिश्रण पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थितरीत्या एकत्रित करावे

एक काचेची बरणी  स्वच्छ कोरडी करून घ्यावी , त्यात हे मिश्रण टाकावे

अश्या प्रकारे स्वादिष्ट असे आरोग्यदायी आवळ्याचे लोणचे तयार आहे

 

टीप ;

आवळ्याचे लोणचे हे शक्यतो फ्रीझ मध्ये ठेवावे , कारण काही दिवसांनी त्याचा रंगामध्ये थोडा बदल होतो

लोणचं खराब होत नाही , चवीमध्ये बदल होत नाही

म्हणून शक्यतो आवळ्याचे लोणचं फ्रीझ मध्ये ठेवावं

 

आवळ्याचं लोणचं चे फायदे ;

१] आवळ्याचे लोणचे हे रोज खान अत्यंत लाभदायक आहे

कारण आवळ्याचे लोणचे हे पित्ताचा त्रास , वाताचा त्रास , अपचन साठी अत्यंत फायदेशीर आहे

२] तसेच  वारंवार ज्यांचे केस गळतात त्यांनी देखील आवळा च सेवन रोज केले पाहिजे

नियमित सेवन केल्याने केस गळतीवर नियंत्रण राहते

३] आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते त्यामुळे आपली त्वचा , डोळे आपलं रक्तशुद्धीकरण हे व्यवस्थित राहते

४] मधुमेह साठी देखील आवळ्याचे मोठ्या प्रमाणावर योगदान आहे

 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User