सरसोची भाजी

सरसोच्या भाजीचे / मोहरीच्या भाजीचे फायदे : 1. मोहरीच्या भाजीत फायबरचं प्रमाण भरपूर असतं. शिवाय या भाजीत उष्मांकाचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे वजन कमी करण्यसाठी ही भाजी खाणं फायदेशी मानलं जातं. शिवाय ही भाजी खाल्ल्याने चयापचय क्रिया सुधारते. त्याचाही फायदा वजन कमी होण्यासाठी होतो. 2. मोहरीची भाजी खाल्ल्यानं शरीरात फोलेट निर्माण होण्यास चालना मिळते. कोलेस्टेराॅलचं प्रमाणही ही भाजी खाल्ल्याने नियंत्रित राहातं. म्हणूनच हदयाच्या आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही भाजी उपयुक्त मानली जाते.

0 19
सरसोची भाजी
सरसोची भाजी

सरसोची भाजी

सरसोची भाजी कशी बनवायची

Easy Tasty Homemade Sarasochi bhaji

SARSOCHI BHAJI IN NARATHI

 

साहित्य :

 ५०० ग्रा . सरसो १५० ग्रा . पालक ५० ग्रा . पीठ २ लाल मिरच्या १ तुकडा कापलेले आले २ कापलेल्या हिरव्या मिरच्या १ कपलेला कांदा १/२ चमचा गरम मसाला ४ पाकळी लसूण १ चमचा लिंबाचा रस १/२ कप ताजे क्रीम ३ मोठे चमचे तूप चवीनुसार मीठ

कृती : . सरसो व पालक धुवून बारीक कापावे . २ कप पाण्याबरोबर कूकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे . गव्हाच्या पिठास  थोड्या पाण्यात मिळवून मीठ , तिखट , गरम मसाला , आले आणि क्रीम मिळवावे . एक चमचा तुपातं पीठाच्या मिश्रणास सोनेरी भाजून उतरवून घ्यावे . एका दुसर्या कढईत उरलेले तूप गरम करून जीर , कांदा , लसूण , हिरव्या मिरच्या , लाल मिरच्या तोडुन टाकावी व फ्राय झाल्यावर पिठाच्या मिश्रणास मिळवावे . २ मिनीटानंतर सरसो व पालक टाकुन चांगल्या तर्हेने घोटावे . पाच - सात मिनीट शिजवून उतरवून घ्यावे वरून लोणी टाकावे आणि मक्याच्या चपातीबरोबर वाढावे .

 

 

Ø मोहरीची भाजी घरी करुन खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

Ø ॲनेमियाचा धोका टाळण्यासाठी हिवाळ्यात ही भाजी अवश्य खावी.

Ø मोहरीची भाजी खाऊन डोळ्यांचं आणि हदयाचं आरोग्य जपलं जातं. 

 

सरसोच्या भाजीचे / मोहरीच्या भाजीचे फायदे :

1. मोहरीच्या भाजीत फायबरचं प्रमाण भरपूर असतं. शिवाय या भाजीत उष्मांकाचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे वजन कमी करण्यसाठी ही भाजी खाणं फायदेशी मानलं जातं. शिवाय ही भाजी खाल्ल्याने चयापचय क्रिया सुधारते. त्याचाही फायदा वजन कमी होण्यासाठी होतो.

2.  मोहरीची भाजी खाल्ल्यानं शरीरात फोलेट निर्माण होण्यास चालना मिळते. कोलेस्टेराॅलचं प्रमाणही ही भाजी खाल्ल्याने नियंत्रित राहातं. म्हणूनच हदयाच्या आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही भाजी उपयुक्त मानली जाते. 

3. मोहरीची भाजी करतना त्यात पालकाची भाजीही घातली जाते. त्यामुळे मोहरीच्या भाजीतील पौष्टिकता आणखीनच वाढते. मोहरी आणि पालक यांच्या एकत्रित सेवनामुळे सोडियम, प्रथिनं, ॲण्टिऑक्सिडण्टस, , , के ही महत्त्वाची जीवनसत्त्वं मिळतात. या भाजीत लोहाचं प्रमाणही भरपूर असतं.

 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User