Vegetable Pulao

रोज रोजचे जेवण खाऊन कंटाळा आला असेल तर आपल्याला काही नवीन खायची इच्छा होत असते.अशा वेळी व्हेजिटेबल पुलाव हा एक चांगला पर्याय आहे. आज मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने व्हेजिटेबल पुलाव करायला शिकवणार आहे जो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडेल आणि ज्यामध्ये आपल्याला मसालेही फारसे लागणार नाहीत व मुलांच्या पोटात सर्व भाज्याही जातील.

0 9
Vegetable Pulao

व्हेजिटेबल पुलाव:

रोज रोजचे जेवण खाऊन कंटाळा आला असेल तर आपल्याला काही नवीन खायची इच्छा होत असते.अशा वेळी व्हेजिटेबल पुलाव हा एक चांगला पर्याय आहे. आज मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने व्हेजिटेबल पुलाव करायला शिकवणार आहे जो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडेल आणि ज्यामध्ये आपल्याला मसालेही फारसे लागणार नाहीत व मुलांच्या पोटात सर्व भाज्याही जातील.

साहित्य :

  • बासमती तांदूळ-४ कप
  • तेल-२ चमचे
  • काजू-८ ते १० तुकडे
  • जिरे-१ चमचा
  • तेजपत्ता-२ पाने
  • दालचिनी-१ तुकडा 
  • लवंग-३ ते ४
  • स्टार अ‍ॅनिस-१
  • काळी  वेलची-१
  • हिरवी वेलची-३
  • सुक्या मिरच्या-३
  • कांदा -१
  • मीठ-१ चमचा
  • आले-लसूण पेस्ट -१ चमचा
  • हिरव्या मिरच्या- २ ते ३
  • टोमॅटो-१
  • बटाटे-३
  • फरसबी-१ वाटी
  • गाजर-१वाटी
  • मटार- १ वाटी
  • मॅगी मसाला-१ चमचा
  • पाणी-४ कप
  • कोथिंबीर

कृती:

सर्वात प्रथम आपण ४ वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर तो अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजवून ठेवावा. अर्धा तास पाण्यात भिजवल्यामुळे पुलाव मोकळा होतो.

पुलाव बनविण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत २ चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवावे. तेल गरम झाल्यावर त्यात काजूचे तुकडे टाकावेत. काजू थोडेसे फ्राय करून घ्यावे. त्यानंतर त्यात थोडेसे जिरे टाकावे. नंतर २ पाने तेजपत्ता,१ दालचिनी,३ लवंग,१ दालचिनी,१ काळी वेलची,३ हिरव्या वेलच्या,१ स्टार अ‍ॅनिस,३ लाल सुक्या मिरच्या हे सर्व क्रमाक्रमाने टाकावे आणि थोडेसे मंद गॅसवर परतून घ्यावे. त्यानंतर एका कांद्याचे तुकडे करून तो टाकून परतून घ्यावा. कांदा  ब्रॉउनीश होईपर्यंत परतावा. त्यानंतर त्यात १ चमचा  मीठ टाकावे. नंतर यात १ चमचा आले-लसूण पेस्ट टाकावी. आले लसूण पेस्ट टाकल्यावर १ मिनिट परतून घ्यावी. नंतर ३ ते ४ हिरव्या मिरच्या टाकाव्यात. नंतर १ टोमॅटो टाकावा आणि गॅस १  घ्यावा. नंतर क्रमाक्रमाने १-१ करून सर्व भाज्या टाकाव्यात. सर्वात प्रथम १ वाटी बटाटे घालावेत आणि २ मिनिटे परतून घ्यावे. नंतर त्यात चिरलेली फरसबी घालावी आणि २ मिनिटे परतून घ्यावी. नंतर त्यात गाजराचे तुकडे घालावेत आणि २ मिनिटे परंतु घ्यावे. नंतर गॅस बारीक करावा आणि या सर्व भाज्या मिक्स करून झाकण लावावे. पाच मिनिटांपर्यंत झाकण ठेवावे ज्यामुळे सर्व भाज्या व्यवस्थित शिजतील आणि त्यांना एक छानसा फ्लेवर येईल. नंतर त्यात १ वाटी मटार घालावेत मटार घातल्यावर २ मिनिटे पुन्हा परतून घ्यावे. नंतर १ चमचा मॅगी मॅजिक मसाला घालावा. या मसाल्यामुळे  तुमच्या पुलावला एक वेगळीच चव येईल जी सर्वांनाच  आवडेल. त्यानंतर आपण जे तांदूळ भिजवले होते ते एका चाळणीमध्ये घालून व्यवस्थित निथळून द्यावेत. तांदूळ व्यवस्थित निथळल्यानंतर ते सर्व भाज्यांमध्ये मिक्स करावेत आणि गॅसचा फ्लेम मोठा करून हे सर्व व्यवस्थित मिक्स करावे. नंतर त्यात ४ कप पाणी घालावे कारण आपण ४ कप तांदूळ घेतले होते. नंतर मध्यम फ्लेम करून झाकण लावावे. ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्यावे. त्यानंतर झाकण काढून एकदा चेक करावे की पाणी व्यवस्थित शोषले गेले आहे की नाही जर पाणी असेल तर अजून ३ ते ४ मिनिटे झाकण ठेवावे. नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर टाकावी.अशाप्रकारे आपला व्हेजिटेबल पुलाव तयार.

महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)

१)तांदूळ घेतांना बासमतीच घ्यावा का?

आपण कोणताही तांदूळ घेऊ शकतो. परंतु जर बासमती तांदूळ घेतला तर त्याला एक छान वास येतो. म्हणून शक्यतो बासमती तांदुळाचा घ्यावा.

 

२)जर आपण तांदूळ न भिजवता डायरेक्ट घेतले तर चालेल का?

जर आपण डायरेक्ट तांदूळ घेतले तर आपला पुलाव मोकळा होणार नाही म्हणून तांदूळ घेतांना अर्धा तास भिजवून घ्यावेत. 

 

तर आज मी तुम्हाला कमीत कमी मसाले वापरून व्हेजिटेबल पुलाव कसा करता येतील ते सांगितले (Kothimbir vadi recipe in marathi )मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Mayuri

माझे नाव मयुरी वैद्य-परांजपे आहे आणि मी ठाणे येथे राहते.मी SNDT University मधून MCA (Master of Computer Application )केले आहे. मला लेखन आणि वाचन याची विशेष आवड आहे. तसेच मला नवीन नवीन ठिकाणी फिरायला जायला देखील आवडते.

Comments (0)

User