एमएचटी-सीईटी २०२१ करिता ऑनलाईन अर्ज नोंदणीस मुदत वाढ स्वेरी मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध !

0 18
एमएचटी-सीईटी २०२१ करिता ऑनलाईन अर्ज नोंदणीस मुदत वाढ  स्वेरी मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध !

पंढरपूर ‘शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी / तंत्रज्ञानऔषध निर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी 'एमएचटी-सीईटी-२०२१ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदरील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा असून या प्रक्रियेला गुरुवार दि. १५ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.’ अशी सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्यमुंबईचे आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी यांनी संकेतस्थळावरुन कळविले आहे.

              शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी २०२१ ही प्रवेश परीक्षा देणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नव्याने दिलेल्या माहितीनुसार नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता मंगळवारदि. ०८ जून २०२१ ते दि.१५ जुलै २०२१ (रात्री ११.५९) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. पूर्वी ही मुदत ७ जुलै२०२१ पर्यंत होती. सदरील परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहितीपुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधित विद्यार्थी आणि पालक यांनी नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांकडून या प्रवेश परिक्षेचे अर्ज भरण्यात बऱ्याचदा चूका होत असतात आणि धावपळ ही होत असते ही बाब लक्षात घेवून स्वेरी अभियांत्रिकी च्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागामध्ये एमएचटी-सीईटी २०२१ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रेओळखपत्र/आधार कार्डफोटो आणि अर्जाचे शुल्क भरण्यासाठी एटीएम सोबत आणणे आवश्यक आहे. एमएचटी-सीईटी २०२१’ संदर्भात व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रीये संदर्भात अधिक माहितीसाठी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी (मोबा.क्र.९८६०१६०४३१) तसेच प्रा. उत्तम अनुसे (मोबा.क्र.९१६८६५५३६५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले आहे.

 छायाचित्र-स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगेस्वेरी चिन्ह व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी.

Downloads (1)

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User