कर्मयोगी इंजीनीरिंग च्या राष्ट्रीय परिषदेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
समाजोपयोगी संशोधनाची गरज : श्री. रोहन परिचारक
कर्मयोगी इंजीनीरिंग कॉलेज शेळवे, पंढरपूर येथे रविवार दिनांक 25 जुलै 2021 रोजी “रिलीव्हंस ऑफ इंजीनीरिंग अँड सायन्स फॉर एनव्हायरमेंट अँड सोसायटी 2021” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व ही राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली, अशी माहिती श्री.पांडुरंग प्रतिष्ठान चे ट्रस्टी श्री. रोहन परिचारक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी दिली, तसेच समाजाला उपयोगी होईल अश्या संशोधनाची सध्या समाजाला खूप गरज आहे असे मत ही श्री. रोहन परिचारक यांनी व्यक्त केले. कोरोंना च्या महामारीमुळे सदर ची परिषद ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. सदर च्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे श्री. रोहन परिचारक व डॉ. ए बी कणसे यांचा सत्कार प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील व संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर च्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉंजीकल यूनीवर्सिटी, लोनेरे येथील डॉ. एस बी देवोसरकर तर समारोपाला आयआयटी, गुवाहाटी येथील डॉ. एस एन जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून परिषदेची सुरुवात झाली. या राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक व संशोधन अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात यांनी परिषद घेण्यामागचा उद्देश सांगितला. कर्मयोगी इंजीनीरिंग कॉलेज चे उपप्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्री.पांडुरंग प्रतिष्ठान चे ट्रस्टी श्री. रोहन परिचारक व प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी परिषदेला शुभेच्या दिल्या, त्यानंतर डॉ. एस बी देवोसरकर यांनी परिषदेला मोलाचे मार्गदर्शन केले.
या राष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक अश्या विविध राज्याच्या नामांकित कॉलेज मधून सुमारे शंभरहून अधिक शोधनिबंध सादर करण्यात आले. सहभागी झालेल्या संशोधकांनी पैकी श्री अमर जाधव, श्री. नितीन चौधरी, श्री. अविनाश पारखे, शिल्पा जगताप, निशा परिचारक, श्री. एस.वी.जाधव यांनी राष्ट्रीय परिषदेच्या नेटक्या नियोजनाबद्दल कौतुक व्यक्त केले व आभार मानले. या परिषदेच्या सांगता समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. एस एन जोशी यांचा परिचय इलेक्ट्रॉनिक्स टेलीकॉम चे विभाग प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे यांनी करून दिला. त्यानंतर डॉ. एस एन जोशी यांनी परिषदेला मोलाचे मार्गदर्शन केले.
या राष्ट्रीय परिषदेसाठी प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, राजगड इंजीनीरिंग कॉलेज पुणे, डॉ. एस. बी. पडवळ पुणे, डॉक्टर स्वप्नील निनावे अॅकडमिक ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंग्लंड व डॉ. संदीप वांगीकर स्वेरी पंढरपूर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी चार उत्कृष्ट शोधनिबंधकांची नावे जाहीर केली. या मध्ये अविनाश पारखे व ग्रुप स्वेरी पंढरपूर, श्री. सतीश मुत्तलवाड व ग्रुप डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनीरिंग पुणे व श्री. पी. एस कांबळे व ग्रुप जयवंतराव भोसले कॉलेज ऑफ इंजीनीरिंग वाळवा, श्री. स्वप्नील भुईटे व ग्रुप कर्मयोगी इंजीनीरिंग कॉलेज शेळवे यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाची उत्कृष्ट शोधनिबंध म्हणून निवड करण्यात आली. सदर च्या परिषदेसाठी समन्वयक म्हणून डॉ. अभय उत्पात यांनी तर सह-समन्वयक म्हणून प्रा. प्राजक्ता जाधव व प्रा. जयमाला हिप्परकर यांनी काम पाहिले.
राष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. जी. डी. वाळके, विभाग प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. सारंग कुलकर्णी, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. नागेश तिवारी, आय टी प्रमुख प्रा. दीपक भोसले आणी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले. तसेच या संपूर्ण परिषदेचे सूत्र संचालन प्रा. सुशील कुलकर्णी यांनी केले. समन्वयक डॉ. अभय उत्पात यांनी आभार व्यक्त करून राष्ट्रीय परिषदेची सांगता केली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)