पंढरपूर सिंहगड मध्ये "किंपीग अप वीथ पेस ऑफ लाईफ" या विषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी १ ऑगस्ट २०२१ रोजी ऑनलाईन पध्दतीने "किंपीग अप वीथ पेस ऑफ लाईफ" या विषयावर एक्सेंचर सोल्युशन्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या साॅफ्टवेअर इंजिनिअर ऐश्वर्या बडवे यांचे व्याख्यान मोठ्यात उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यालय व सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाच्या सुरुवातीस सावित्रीबाई गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे यांनी ऑनलाईन सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत केले.
व्याख्यान सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंजिनिअर ऐश्वर्या बडवे म्हणाल्या, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शांत राहिले पाहिजे, सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे, संभाषण कौशल्य हे इंग्लिश मधुन ठेवणे आवश्यक आहे, अभ्यासाबरोबरच इतर विविध स्पर्धेत सहभाग घेणे खुप महत्वाचे असल्याचे मत इंजिनिअर ऐश्वर्या बडवे यांनी व्याख्यान बोलताना म्हटले आहे.
या दरम्यान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या ऑनलाईन व्याख्यानाचे सुञसंचलन अश्विनी बोक्से तर आभार प्रदर्शन शिवानी मेहेरकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुधा सुरवसे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)