स्वेरी अभियांत्रिकी व एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस, मुंबई यांच्या संयुक्त डिझाईन पेटंटची नोंदणी

स्वेरी अभियांत्रिकी व एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस, मुंबई यांच्या संयुक्त डिझाईन पेटंटची नोंदणी

0 17
स्वेरी अभियांत्रिकी व एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस, मुंबई यांच्या संयुक्त डिझाईन पेटंटची नोंदणी

स्वेरीचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांची माहिती

पंढरपूर: स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगपंढरपूर व वैद्यकीय जैवतंत्रज्ञान विभागएमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेसकामोठेनवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या बायोमोल सेपरेटर (इलेक्ट्रोफोरेसीस) च्या डिझाईनच्या पेटंट ची नुकतीच नोंदणी करण्यात आली आहे.’ अशी महिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

            सन २०१६ साली गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगपंढरपूर व वैद्यकीय जैवतंत्रज्ञान विभागएमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेसकामोठेनवी मुंबई यांच्या सहयोगी कार्यातून या प्रकल्पाची सुरुवात झाली. २०१६ साली झालेल्या पहिल्या टेक्नो-सोसायटल’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेसचे सदस्य सहभागी झाले होते. या प्रकल्पाच्या यशामागील प्रेरक शक्ती म्हणजे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे आणि भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. व्ही.के. सुरी हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून पोर्टेबल लो कॉस्ट कस्टम बिल्ट बायोमोलसेपरेटर (इलेक्ट्रोफोरेसीस) सिस्टीम’ विकसित करण्यासाठी हा सहयोगी प्रकल्प सुरू करण्यात आला. आज या प्रकल्पाच्या डिझाईन पेटंट’ ची नोंदणी मंजूर करण्यात आली आहे. या प्रोटोटाइपची संकल्पना आणि बनावटीसाठी डॉ.व्ही.के.सुरीडॉ.मानसी  ठाकूर आणि स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश पाटील हे स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयपंढरपूरला वेळोवेळी भेटी देऊन या प्रकल्पावर कार्य करत होते. मे २०१९ मध्ये त्यांनी या प्रोटोटाइपच्या विकासासाठी व हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात कार्य केले. पुढे या विकसित केलेल्या प्रोटोटाइपची चाचणी एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेसकामोठे येथे झाली. स्वेरी आणि एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस या दोन्ही संस्थांच्या परस्पर संमतीनंतर संयुक्तपणे या डिझाइन पेटंटच्या नोंदणीचा अर्ज दाखल करण्यात आला. शेवटी १२ जून २०१९ च्या प्राथमिक तारखेसह जुलै २०२१ मध्ये  दोन्ही संस्थाना हे डिझाईन पेटंट मंजूर करण्यात आले. या पेटंटच्या प्रमाणपत्रावर डिझाईन अँड ट्रेड मार्क्सचे जनरल ऑफ पेटंट च्या नियंत्रकांची स्वाक्षरी आहे. स्वेरीचे हे रजिस्टर झालेले पहिलेच पेटंट असून यापूर्वी स्वेरीने एकूण १३ पेटंट्स फाईल केलेले आहेत. स्वेरीने सुरुवातीपासून संशोधनात प्रचंड मोठी झेप घेतली आहे. 'टेक्नो-सोसायटलच्या माध्यमातून स्वेरीने आजपर्यंत सुमारे ६०० पेक्षा जास्त रिसर्च पेपर्स प्रसिध्द केलेले असून त्यांना नुकताच 'स्कोपस'चा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. विविध संशोधनासाठी स्वेरीला विविध संस्थांकडून आजपर्यंत जवळपास रु. आठ कोटीपर्यंत संशोधन निधी प्राप्त झाला असून त्यातून संशोधनाची अनेक कामे वेगाने सुरू आहेत. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या सहकार्याने हे पेटंट रजिस्टर केले गेले आहे. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसलेस्वेरीचे इतर पदाधिकारी व विश्वस्तस्वेरी कॅम्पस इनचार्जसंस्थेअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियारडिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळडी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवेअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापकशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थ्यांनी व पालकांनी सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांचे अभिनंदन केले.

छायाचित्र: स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगेस्वेरी चिन्ह व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार.

Downloads (1)

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User