पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा पालक मेळावा उत्साहात संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शुक्रवार दि. ९ जुलै २०२१ रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा ऑनलाईन मेळावा मोठ्यात उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षात अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी गुगल मिट व युट्यूब च्या द्वारे ऑनलाईन पालक मेळावा घेण्यात आला होता. या पालक मेळाव्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम सर यांनी पीपीटी द्वारे प्रेझेन्टेशन देऊन पालकांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. याशिवाय नुकताच प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा निकाल हा पंढरपूर सिंहगड चा उत्कृष्ट असल्याचे पालकांना सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यावेळी ऑनलाईन पालक मेळाव्यात बोलताना म्हणाले, सद्या सर्वञ कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव असल्याने महाविद्यालय बंद आहे. या बंद कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पंढरपूर सिंहगड महाविद्यालय हे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लेक्चर घेत आहे. या मध्ये विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील असुन पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकडे लक्ष देण्याची आवश्यक असल्याचे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी या दरम्यान बोलताना मत व्यक्त केले.
या मेळाव्यात २०० हून अधिक पालक सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या पालकांनी काॅलेज ऑफलाइन सुरू करण्याची मागणी केली असतानाच प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यापीठ नियम व शासन स्तरावरील निर्णय आल्यानंतर आपण नियमानुसार लवकरच ऑफलाइन काॅलेज सुरू करू असे सांगितले. याशिवाय इतर पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यात आली. दरम्यान सहभागी पालकांनी महाविद्यालयाच्या निकालाचे व ऑनलाईन शिक्षण प्रणालीचे अभिनंदन करून कौतुक केले. या मेळाव्याचे सुञसंचलन प्रा. सवासे यांनी केले तर ऑनलाईन सहभागी पालकांचे आभार प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी मानले.

What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)