गरोदरपणात गुदाशयातून रक्तस्त्राव होणे: कारणे, उपाय आणि प्रतिबंध

गरोदरपणात गुदाशयातून रक्तस्त्राव होणे: कारणे, उपाय आणि प्रतिबंध
गरोदरपणात गरोदर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यातील एक बदल म्हणजे गरोदरपणात संप्रेरकांची पातळी सतत वर खाली असते, त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य बिघडते आणि त्याचाच परिणाम म्हणजे बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध होऊ शकतो. आणि गुदद्वाराजवळील भागातील रक्तवाहिन्यांना सूज येऊन रक्तस्त्राव होऊ शकतो.
हा रक्तस्त्राव होण्याची नेमकी कारणे काय आहेत आणि त्यावर कुठले उपाय तुम्ही करू शकता ह्याविषयीची सगळी माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.

गरोदरपणात गुदाशयातून रक्तस्त्राव होतो म्हणजे नक्की काय होते?

गुदाशय रक्तस्त्राव हा सहसा गुदद्वाराला चिरा (फिशर) पडल्यामुळे होतो. गुदद्वाराजवळील ऊतक फाटतात. गरोदरपणात आणि बाळाच्या जन्मानंतर शौचास घट्ट झाल्यावर बऱ्याच वेळा रक्तस्त्राव झालेला आढळतो. फिशर मुळे रक्तस्त्राव होतो तसेच शौचास झाल्यानंतर त्या भागात जळजळ सुद्धा होते.

लक्षणे

गरोदरपणात गुदाशय रक्तस्त्राव होण्याची अनेक लक्षणे आहेत, त्यापैकी काही खाली सूचीबद्ध आहेत:

  • ताप
  • पोटदुखी
  • मळमळ
  • उलट्या होणे
  • शौचास जाण्याच्या सवयीमध्ये बदल
  • प्रदीर्घ किंवा तीव्र अतिसार
  • शौचाच्या अनियमित वेळा (शौचास पातळ होणे ह्यास इंग्रजीमध्ये पेंसिलस्टूलम्हणतात)

आपत्कालीन वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे दर्शविणारी इतर लक्षणे खालीलप्रमाणे आहेत

  • काळ्या किंवा किरमिजी रंगाचा मल
  • मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होणे
  • गुद्द्वार आघात तसेच श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे

गर्भवती महिलांमध्ये गुदाशय रक्तस्त्राव होण्याचे कारणे

गुदाशय रक्तस्त्राव बहुतेक वेळा फिशर म्हणजेच गुद्द्वाराकडील भागाला चिरा पडल्याने उद्भवतो. गर्भवती स्त्रियांना बर्‍याचदा बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांना शौचास घट्ट होते. त्यामुळे शौचाच्या वेळेला गुदद्वारावर ताण येतो. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन औषधे घेतल्यास स्त्रियांना बद्धकोष्ठता होते आणि शौचास सुद्धा अनियमित होते. आहारात तंतुमय पदार्थांच्या अभावामुळे शौचास होताना समस्या उद्भवू शकते आणि गुदाशय रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते.

गुदाशय रक्तस्त्राव होण्याची असामान्य कारणे

  • कर्करोग
  • मोठ्या आतड्याचा कर्करोग
  • कोलन पॉलीप्स (अशी स्थिती जिथे कोलनच्या म्हणजेच मोठ्या आतड्यात अस्तरांवर पेशींचा गठ्ठा तयार होतो,)
  • गुदाशय जळजळ
  • डायव्हर्टिकुलोसिस (अशी स्थिती जिथे मोठ्या आतड्याच्या भिंतीमध्ये पाउच तयार होतात)
  • क्रोहन रोग (एक दाहक आतडी रोग)
  • अतिसार
  • गुदाशय कर्करोग
  • अल्सरेटिव्ह कोलायटिस (अशी स्थिती ज्यामुळे मोठ्या आतड्यात जळजळ होते आणि फोड येतात.)

गुदाशय रक्तस्रावाचे निदान

गुदाशयातील रक्तस्रावावर उपचार करण्यासाठी आणि ते कशामुळे होते आहे ह्याचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी केली जाते. कमी रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढलेले असल्यास ही लक्षणे जास्त प्रमाणात गुदाशय रक्तस्त्राव झाल्याची आहेत आणि अशा वेळी तातडीची वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असते. रक्तस्त्राव कशामुळे होतो आहे हे तपासण्यासाठी एक रोगनिदान चाचणी केली जाते आणि त्यासाठी पोटात लवचिक ट्यूब घातली जाते. गुद्द्वारावर काही आघात तर झाला नाही ना ह्याची तपासणी केली जाते. तसेच शौचाची सुद्धा तपासणी केली जाते. ते मऊ आहे का किंवा त्यामध्ये गाठी आहेत का हे बोटानी तपासून पहिले जाते. रक्तस्त्राव किती प्रमाणात झाला हे तपासण्यासाठी रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात. तिथे रक्तातील रक्त गोठवणाऱ्या घटकांचे परीक्षण केले जाते आणि संसर्गाची चिन्हे तपासली जातात.

गुदाशय रक्तस्रावाचे निदान

इतर सामान्य डायग्नोस्टिक चाचण्यांमध्ये अनोस्कोपी, फ्लेक्सिबल सिग्मोइडोस्कोपी, बेरियम एनिमा एक्सरे, सीटी स्कॅन आणि एंजियोग्राफी ह्यांचा समावेश होतो. कोलोनोस्कोपी गुदाशयच्या आतील बाजूस तपासण्यासाठी वापरली जाऊ शकते. या निदानात्मक चाचण्यांमध्ये गुद्द्वार मधील ट्यूमर तपासणे आणि खूप जास्त होणारा / सक्रिय रक्तस्त्राव तपासण्यासाठी कोलनच्या खालच्या बाजूची तपासणी करणे इत्यादी तपासण्या समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, न्यूक्लिअर मेडिसिन अभ्यासाचा उपयोग लाल रक्तपेशी आणि मोठ्या आतड्यामध्ये जिथे अगदी कमी रक्तस्त्राव होतो ती ठिकाणे शोधण्यासाठी होतो.

गरोदरपणातील गुद्द्वार रक्तस्त्राव: उपचार आणि उपाय

किरकोळ रक्तस्रावावर घरगुती उपायांसह उपचार केला जाऊ शकतो तर गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णालयात वैद्यकीय उपचार केले जातात. गरोदरपणात गुदाशय रक्तस्त्राव होण्याचे सर्वात सामान्य उपायः

  • बद्धकोष्ठता कमी होण्यासाठी बीन्स,स्क्वाश, पृन्स, फिग्स आणि पोषक आहार आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिड्ससह प्रोबियॉटिक्स घेणे चांगले. गरम मटणाचा रस्सा आणि हर्बल टी घेतल्याने सुद्धा उपयोग होतो. मद्यपान आणि मसालेदार पदार्थ टाळा.
  • दिवसभरात पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे
  • लसीका प्रणाली मोकळी होण्यासाठी पुरेसा व्यायाम केल्यास किंवा ट्रॅम्पोलिनवर उड्या मारल्यास त्याचा फायदा होतो. जॉगिंग, पोहणे, योग आणि हलके व्यायाम केल्यास हळूवारपणे आतड्यांसंबंधी हालचाली नियमित होतात आणि आतड्यांसंबंधी कार्य सुरळीत होते.
  • एखाद्याच्या दैनंदिन जीवनात ताणतणाव कमी करण्याचे तंत्र आणि दिनक्रम आरामदायक असल्यास ते देखील उपयुक्त आहे. ताण कमी केल्याने गुदाशय बरे होण्यास मदत होते आणि शरीराला नैसर्गिकरित्या सुधारण्याची अनुमती मिळते. त्यामुळे सूज कमी होते आणि पुढील गुंतागुंत होण्याची शक्यता कमी होते.

टीपः गरोदरपणात कोणतेही नवीन पदार्थ किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

प्रतिबंध

गरोदरपणात गुदाशय रक्तस्त्राव रोखण्याचे सर्वात सामान्य मार्गः

  • आवेग येतो तेव्हा लगेच शौचास जा, शौचास जाण्याचे टाळू नका
  • तुमचा आहारात तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे आणि आवश्यक फॅटी ऍसिड्स असल्याची खात्री करा. हे गुदाशय रक्तस्त्राव रोखण्यास मदत करू शकते
  • नियमित व्यायाम आणि विश्रांती घ्या
  • सजलीत रहा आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी तुम्ही दररोज द्रवपदार्थ घेत रहा
  • जास्त प्रमाणात लोहयुक्त औषधे टाळा कारण त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. तुमच्या डॉक्टरांना त्याऐवजी तंतुमय पदार्थ पूरक आहार देण्यास सांगा

हा रक्तस्त्राव आपल्या बाळाला हानी पोहचवेल?

नाही. गुद्द्वार रक्तस्त्राव बाळाच्या जन्मानंतर काही आठवड्यांनंतरसुद्धा होऊ शकतो. ह्या मुळे गरोदरपणात किंवा बाळाच्या जन्मादरम्यान कोणत्याही प्रकारे बाळाचे नुकसान होत नाही.

डॉक्टरांना कधी फोन करावा?

डॉक्टरांना कधी फोन करावा?

आपल्याला खालील लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांना फोन करावा. या लक्षणांचे मूल्यांकन डॉक्टरांनी केले पाहिजे.

  • योनीतून रक्तस्त्राव
  • कमी रक्तदाब
  • वाढलेले हृदयाचे ठोके
  • घरगुती उपचार केल्यानंतर सुद्धा गुदाशयातून रक्तस्रावाचा अनुभव येणे
  • पाठदुखीसह रक्तस्त्राव होण्याची चिन्हे
  • ओटीपोटात वेदना

तुम्हाला गरोदरपणात रेचक लिहून दिले जाऊ शकते. गुदाशयातील रक्तस्त्रावामुळे होणारी अस्वस्थता नेहमीचे पारंपरिक शौचालय वापरण्याऐवजी सुगंध मुक्त आणि अल्कोहोलमुक्त पेपरने गुदाशयाजवळील भाग हळुवारपणे पुसल्याने कमी होऊ शकते.

गर्भधारणेनंतर आपोआप फिशर बरे होतात. मूळव्याधीचा अनुभव घेणे हे गरोदरपणात सामान्य आहे, त्यामुळे गुदाशय क्षेत्रावर दबाव वाढतो आणि जळजळ होते. अनेक वेळा शौचास जाऊन आल्यानंतर वेदना कायम राहिल्यास पॅरासिटॅमॉल घेण्याचा विचार करा.

गरोदरपणानंतर शरीर स्वतःला बरे करते आणि फिशर व त्यामुळे होणारा रक्तस्त्राव आपोआप बंद होतो. रक्तस्त्राव नक्की कुठून (गुदाशय की योनीमार्ग) होत आहे ह्याबाबत तुम्हाला खात्री नसल्यास तुम्ही डॉक्टरांना कॉल करू शकता.

गुदाशयातील रक्तस्त्राव सहसा गंभीर चिंतेचे कारण नसले तरी आवश्यक खबरदारी घेणे नेहमीच चांगले असते. तसेच, सतत तीव्र लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या.