१ वर्षाच्या बाळासाठी १५ स्वादिष्ट भारतीय पाककृती

१ वर्षाच्या बाळासाठी १५ स्वादिष्ट भारतीय पाककृती

जेवण हा एकआनंददायी अनुभव आहे आणि जेव्हा तुमच्या बाळाचे वय १२ महिन्यांचे होते तेव्हा तुमच्या बाळाची अन्नपदार्थांच्या वेगवेगळ्या स्वाद आणि पोतांविषयी वाढलेली उत्सुकता तुमच्या लक्षात येईलह्या वयाच्या बाळांना साध्या प्युरीच्या व्यतिरिक्त इतर पदार्थांची सुद्धा चव घ्यावीशी वाटतेपरंतु अवघड भारतीय पाककृती मध्ये त्यांच्या पचनसंस्थेस अनुकूल होईल असा बदल कसा करावा जेणेकरून सोप्या पद्धतीने भारतीय अन्नपदार्थांची बाळास ओळख होईल हे ह्या लेखात दिले आहे.

१२ महिने वयाच्या बाळासाठी भारतीय अन्नपदार्थांच्या पाककृती

१ वर्षाच्या बाळाच्या पोटासाठी अनुकूल अशा काही पाककृती आम्ही इथे देत आहोतत्यातील काही भारतीय बाळांसाठी नाश्त्याच्या पाककृती आहेत तर काही १ वर्षीय दक्षिण भारतीय बाळांसाठी सोप्या पाककृती दिल्या आहेतज्यामुळे त्यांना भारतीय आहाराचा आनंद घेता येईल.

लक्षात ठेवा

  • डेअरीस्तनपान किंवा फॉर्मुला दूध ह्यापैकी कुठलेही दूध घेऊ शकतास्तनपान गरम करण्याआधी दक्षता घ्या.
  • शक्य असेल तर सगळे साहित्य घरी तयार कराहवाबंद डब्यातील उत्पादने टाळा.
  • जर बाळ अजून १ वर्षांचे झाले नसेल तर गोडी वाढवण्यासाठी मध वापरू नका.

लापशी

लापशीपातळसर आणि मऊ केल्यास लहान मुलांच्या आवडीचा हा खाद्यपदार्थ आहे.


नाचणीची लापशी

ह्या मध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात आणि हाडांची घनता वाढण्यासाठी आणि स्नायू बळकट होण्यासाठी त्याची मदत होते.

साहित्य

  • नाचणी ३४ टेबल स्पून
  • पाणी
  • दूध गूळ किंवा दही +मीठ

कृती

  • नाचणी चांगली धुवून घ्या आणि रात्रभर भिजत ठेवा
  • थोडे पाणी घालून मिक्सर मध्ये चांगली पेस्ट करून घ्या
  • पाणी घालून उकळा
  • घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि थोडे दूध आणि गोडीसाठी गुळ घाला
  • किंवा दुसरी पद्धत म्हणजे थंड झाल्यावर दही आणि मीठ घाला

रव्याची लापशी

दुसऱ्या लापशीचा कंटाळा आल्यास हा एक चांगला पर्याय आहेही लापशी गोड आणि पचायला हलकी असते.

साहित्य

  • रवा२ टेबल स्पून
  • पाणी/२ कप
  • तूप१ किंवा २ टेबल स्पून
  • गूळचवीपुरता
  • दूध

कृती

  • मंद आचेवर तुपावर रवा भाजून घ्यातपकिरी रंगाचा करू नकाखमंग वास येऊ लागल्यावर गॅस बंद करून बाजूला ठेवा.
  • पाणी उकळा आणि त्यामध्ये भाजलेला रवा हळूहळू घालामिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करासगळे पाणी शोषले जाईल.
  • घट्ट उपम्यामध्ये १० मिनिटांनंतर गूळ आणि दूध घाला जेणेकरून ते लापशी सारखे सरसरीत होईल.

भात

भातकुठलाही घटक घालून आपण भात करू शकतो आणि तो पचायला सोपा असतो

केळ्याचा भात

गिळण्यासाठी हा एक सोपा अन्नपदार्थ आहे आणि तुमच्या लक्षात येईल तुमचं बाळ किती पटपट हा भात खाईल.

साहित्य

  • तांदूळ१ कप
  • नारळाचे दूध (पाणी घातलेले): २ कप
  • गुळ१ टेबल स्पून
  • केळ२ विलायती केळी किंवा छोटी केळी
  • घट्ट नारळाचे दूध२ टेबल स्पून

कृती

  • पातळ केलेल्या नारळाच्या दुधात रात्रभर तांदूळ भिजत घाला.
  • जास्त पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवा.
  • घट्ट नारळाचे दूध गरम करून त्यामध्ये गुळ आणि तांदूळ घाला.
  • केळ कुस्करून त्यात हा गोड भात घाला.

कारा पोंगल

तुमच्या बाळाच्या आहारात समावेश करण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे

साहित्य

  • तांदूळ१ कप
  • मूग डाळ/२ कप
  • जिरे१ टेबल स्पून
  • तूप१ टेबल स्पून
  • कढीपत्ताकाही पाने
  • आलेचिमूटभर
  • मिरेचवीसाठी (हवे असेल तर)
  • मीठ

कृती

  • तांदूळ आणि मूग डाळ चांगली धुवून अर्ध्या तासासाठी भिजत घाला
  • कुकर मध्ये तूप गरम करून घ्या आणि जिरे घाला
  • आले आणि कढीपत्ता काही मिनिटांसाठी चांगले परतून घ्या
  • आता डाळ तांदूळ घालून त्यात ५ कप पाणी घाला
  • मिरे आणि मीठ घाला

कढीपत्ता काढून बाळाला देण्याआधी चांगले मॅश करून घ्या

सूप

सूप

ही डिश आजारपणात किंवा दोन जेवणांच्या मधल्या काळात बाळाला देऊ शकता

टोमॅटो आणि गाजर सूप

ही डिश व्हिटॅमिन्स ने समृद्ध आहे

साहित्य

  • गाजर
  • टोमॅटो
  • कांदे२ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
  • लसूण१ छोटी पाकळी (बारीक तुकडे करून)
  • बटर१ टी स्पून
  • जिरे/४ चमचा
  • मिरपूडएक चिमूट
  • पाणी.५ कप
  • मीठ

कृती

  • भाज्या चांगल्या स्वच्छ करून घ्या आणि त्यांचे छोटे तुकडे करा
  • प्रेशर कुकर मध्ये बटर गरम करा आणि त्यामध्ये जिरे घाला
  • कांदा आणि लसूण पाकळ्या तांबूस होईपर्यंत परतून घ्या
  • त्यामध्ये गाजर आणि टोमॅटो तसेच पुरेसे पाणी घालातसेच त्यामध्ये मीठ आणि मिरे घाला
  • थोडी उकळी येऊ द्या
  • मध्यम आचेवर कुकर ठेऊन ३ शिट्ट्या करा
  • मिक्सर मध्ये बारीक करून घ्या
  • तुम्हाला गाळून घ्यायचे नसेल तर टोमॅटो उकडून त्यांचे साल काढून घ्या
  • गरम गरम खायला द्या

चिकन सूप

विशेषकरून जेव्हा मुले सर्दीने आजारी असतात

साहित्य

  • चिकनएका चिकन ब्रेस्टचे तुकडे
  • कांदे१ छोटा (बारीक केलेला)
  • भाज्या (गाजरबटाटा): २ टेबलस्पून (चिरलेला)
  • चिकनचे पाणी१ कप
  • बटर२ टी स्पून
  • मीठ

कृती

  • प्रेशर कुकर मध्ये बटर घालून कांदा चांगला परतून घ्या
  • त्यामध्ये चिकन भाज्या आणि पाणी घाला
  • प्रेशर कुकर मध्ये २ शिट्ट्या करा
  • शिजवलेले मिश्रण मिक्सर मध्ये बारीक करून गरम खायला द्या

आमटी

आमटीवेगवेगळ्या चवीची आमटी करता येतेपोळी किंवा भातासोबत देता येऊ शकते.

माशांची आमटी

बाळांना मासे आणि मसाल्यांची ओळख करून देण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे.

साहित्य

  • नारळाचे तेल१ टी स्पून
  • मोठा कांदा१ बारीक चिरलेला
  • लसूण पाकळी१ बारीक चिरलेली
  • आले१ टी स्पून बारीक चिरून
  • टोमॅटो२ बारीक चिरलेले
  • वरील त्वचेचे आवरण काढलेले पांढरे मांस असलेले मासे (बारीक काटे असलेले मासे टाळा): १२५ ग्रॅम्स
  • दही३० मिली
  • गरम मसाला१ टी स्पून
  • चवीसाठी लाल तिखट किंवा मिरपूड (खूप तिखट करू नका)
  • पाणी२०० मिली

कृती

  • कांदा परतून घ्या आणि त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्या
  • मिरपूड किंवा लालतिखट घाला
  • पाणी आणि टोमॅटो घालून चांगली उकळी येऊ द्या
  • थोडा वेळ उकळत राहू द्या
  • मासे घालून झाकून ठेवा आणि २ मिनिटांसाठी शिजू द्यादही आणि कोथिंबीर घालून २ मिनिटांसाठी शिजू द्या
  • भात शिजवा आणि माशांच्या आमटीसोबत खायला द्या
  • चवीसाठी थोडा गरम मसाला घालायला हरकत नाही
  • टोमॅटोकांदा आणि कोथिंबीरीसोबत खायला द्या

डाळीची आमटी

डाळ हे कर्बोदके आणि प्रथिनांचे चांगले मिश्रण आहे

साहित्य

  • मूग डाळ/२ कप
  • तूर डाळ/२ कप
  • हळद१ टी स्पून
  • तूप२ टी स्पून
  • जिरे१ टी स्पून
  • पाणी३ कप

कृती

  • डाळ चांगली धुवून घ्या आणि त्यात हळद आणि मीठ घाला
  • ३ कप पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या
  • डाळीला तूप जिऱ्याची फोडणी द्या

अंड्यांचे काही पदार्थ

अंड्यांचे काही पदार्थ

जटिल अन्नपदार्थांची ओळख करून देण्यासाठी अंडे हा एक चांगला पर्याय आहे

अंड्याची भुर्जी

हा एक चांगला नाश्ता आहे आणि भाताबरोबर आपण देऊ शकता

साहित्य

  • अंडी
  • मिरपूडएक चिमूट
  • दूध३ टी स्पून (उकळलेले)
  • चीझ१ टी स्पून किसलेले
  • बटर/२ टी स्पून
  • मीठ

कृती

  • दूध घालून अंडे फेटून घ्या
  • थोडे बटर गरम करून त्यात फेटलेले अंडे घालाअंड्याची चांगली भुर्जी होईपर्यंत पर्यंत परतून घ्या
  • त्यामध्ये चीझमिरपूड आणि मीठ घाला
  • गॅस बंद करण्याआधी चांगले मिक्स करून घ्या

अंडे आणि ब्रेड

अंड्याच्या मऊपणामुळे ब्रेडचा कोरडेपणा कमी होईल

साहित्य

  • अंडी (फेटलेली)
  • मिरपूडएक चिमूट हवे असल्यास)
  • ब्रेड२ स्लाईस
  • बटर१ टी स्पून

कृती

  • ब्रेडच्या कडा काढून घ्या
  • फेटलेल्या अंड्यावर मिरपूड आणि मीठ घाला
  • एका भांड्यात बटर गरम करून घ्या
  • ब्रेड अंड्यामध्ये बुडवून घ्यादोन्ही बाजूला अंड्याचे आवरण येईलआता ते पॅन मध्ये घाला
  • दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्या
  • हीच प्रक्रिया दुसऱ्या ब्रेडवर करा

झटपट डोसा

झटपट डोसा

दक्षिण भारतात नाश्त्यासाठी डोसा हे प्रमुख अन्न आहे.

रवा डोसा

ह्या डोशामध्ये आंबवण्याची प्रक्रिया होत नाही तुम्ही बाळाला सवय होण्यासाठी त्यामध्ये भाज्या घालू शकता.

साहित्य

  • रवा/२ कप
  • दही/२ कप
  • तांदळाचे पीठ/२ कप
  • पाणी४ कप
  • जिरे१ टी स्पून
  • मीठ
  • तूप

कृती

  • रवातांदळाचे पीठमीठ आणि जिरे मिक्स करा
  • त्यामध्ये काळजीपूर्वक दही घाला तसेच थोड्या प्रमाणात पाणी घालागाठी होऊ देऊ नका
  • मिश्रणाचा पोत ताकासारखा ठेवाखूप घट्ट नको किंवा खूप पातळ सुद्धा नको
  • तवा चांगला गरम करून घ्या आणि डोस्याचे पीठ बाहेरून आत वर्तुळाकारात पसरवा
  • डोश्याला चांगली जाळी पडेलझाकण ठेवण्याआधी एक टीस्पून तूप घाला
  • कुरकुरीत झाल्यावर डोसा काढून घ्या

गव्हाचा डोसा

तुमच्या बाळाच्या आहारात गव्हाचा समावेश करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे

साहित्य

  • गव्हाचे पीठ२ कप
  • तांदळाचे पीठ/४ कप
  • कांदाबारीक चिरलेला कांदा
  • आले१ टी स्पून बारीक चिरलेले
  • जिरे/२ टी स्पून
  • पाणी४ कप
  • मीठ
  • तूप

कृती

  • गव्हाचे पीठतांदळाचे पीठजिरेचिरलेला कांदाआले आणि मीठ चांगले मिक्स करा
  • थोडे पाणी घालून चांगले मिक्स करारव्याच्या डोश्यासारखेच बॅटर करा
  • नॉनस्टिक तवा गरम करा आणि डोसा पीठ बाहेरून आत वर्तुळाकारात पसरवा
  • उलटण्याआधी लालसर होईपर्यंत भाजा

गोड पदार्थ

गोड पदार्थ

गोड पदार्थांमध्ये साखर जास्त असल्याने मूड सुधारतो

गोड पोंगल

प्रत्येक सणाला हा पदार्थ दक्षिण भारतीयांमध्ये केला जातो

साहित्य

  • तांदूळ – /२ कप
  • मूग डाळ – १ ते १५ टी स्पून
  • गुळ/२ कप
  • मीठचिमूटभर
  • पाणी५ कप
  • वेलची पावडर/४ टी स्पून
  • तूप४ टी स्पून
  • दूध

कृती

  • /२ कप पाणी घालून गुळ उकळून घ्या आणि संपूर्णपणे तो विरघळू द्यापाणी काढून बाजूला ठेवा
  • कुकरमध्ये तूप गरम करून घ्या आणि मुगाची डाळ त्यावर ३ मिनिटांसाठी भाजून घ्याधुतलेला तांदूळ आणि पाणी घाला.
  • कुकरच्या ४ शिट्ट्या करा
  • कुकरमधील वाफ गेल्यावर मिश्रणामध्ये गुळाचे पाणी घाला तसेच त्यात तूपमीठ आणि वेलची पूड घाला मिश्रण घट्ट झाल्यास त्यात अर्धा कप दूध घाला
  • काही मिनिटांसाठी शिजवा आणि नियमीत ढवळत रहा

नारळ पायसम

उन्हाळ्यात हा गोड पदार्थ चांगला असतो

साहित्य

  • नारळाचे पाणी१ कप
  • नारळाचा किस१ कप
  • दूध२ कप
  • गुळ/४ कप
  • वेलची पूड/२ टी स्पून

कृती

  • नारळाच्या किसामध्ये थंड पाणी घाला आणि फ्रिज मध्ये ठेवा
  • दूध उकळून त्यात गुळ घालून घट्ट करा आणि त्यात वेलची पूड घाला
  • आता नारळाच्या किसामध्ये दूध घाला आणि थंड होऊ द्या

आरारूट पुडिंग

बद्धकोष्ठता टाळण्यासाठी हा एक गोड‘ उपाय आहे

साहित्य

  • आरारूट पावडर/२ कप
  • गूळ२ मध्यम आकाराचे तुकडे
  • वेलची पूड/४ टी स्पून

कृती

  • १० मिनिटांसाठी आरारूट पावडर भिजत घाला आणि वरचे पाणी निवळून काढा
  • त्यामध्ये पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा
  • नारळाचे पाणीवेलची पूड आणि गुळ एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या
  • पॅन मध्ये उकळून घ्यासतत ढवळत रहा आणि त्यामध्ये आरारूट पावडर टाका
  • जो पर्यंत कस्टर्ड सारखे होत नाही तोपर्यंत सतत ढवळत रहा
  • एका खोलगट ताटात हे मिश्रण ओता
  • थंड होऊ द्या

तुम्ही तुम्हाला लागणारे किंवा बाळाला आवडणाऱ्या चवीप्रमाणे घटक ह्यामध्ये घालू शकता किंवा कमी करू शकताकारण आपल्याला हवा तसा बदल आपण अन्नपदार्थांमध्ये करू शकतोआणि सर्वात महत्वाचेताण घेऊन बाळासाठी कुठलाही पदार्थ करू नकाबाळासाठी अगदी प्रेमानेआनंदाने आणि सकारात्मक दृष्टीने अन्न तयार करा कारण बाळांना ते लगेच लक्षात येते.

तुमच्या १ वर्षाच्या बाळाला भरवण्यासाठी काही टिप्स

तुमच्या बाळाला जबरदस्तीने भरवू नका

ह्या वयाची बाळांच्या एखाद्या पदार्थांविषयी च्या संवेदना म्हणजेच त्यांना एखादा पदार्थ आवडतो आहे किंवा नाही विकसित होत असताततुमच्या मुलाला खाण्यासाठी प्रोत्साहित करा परंतु त्यांना आवडत नसलेले पदार्थ जबरदस्तीने भरवू नका ते कितीही पोषक असले तरीसुद्धाप्रयत्न करा आणि दुसरा पर्यायी पदार्थ शोधा किंवा दुसऱ्या पदार्थात न आवडणारा पदार्थ घालून भरवा.

अन्नपदार्थ खाण्यासाठी सोपे असले पाहिजेत

तुमच्या १ वर्षाच्या बाळाच्या घशात अन्नाचे मोठे घास अडकण्याची शक्यता असते त्यामुळे अन्न मऊ असुद्यात्याचे छोटे घास करा आणि बाळाला ते नीट चावता येतील असे पहा.

बाळाला देण्याआधी अन्न थंड करून घ्या

बाळाला भरवण्याआधी अन्नपदार्थ गार आहे की गरम हे तपासून पहा कारण बाळ लगेच खाण्यास सुरुवात करेल.

खूप जास्त मीठचरबीमसाले आणि साखर वापरू नका

भविष्यात अन्नपदार्थांमधील ह्या घटकांमुळे समस्या निर्माण होऊ शकतातत्यामुळे ह्या अन्नपदार्थांचा लागेल तेवढाच वापर करातुम्ही जेवढे मसालेदार पदार्थ खाऊ शकता तेवढे तुमचे बाळ खाऊ शकत नाही त्यामुळे बाळासाठी जेवण तयार करताना हा मुद्दा लक्षात घ्या.

खाताना तुमच्या बाळावर लक्ष ठेवा

या वयात मुले स्वतःहून खाण्याचा आग्रह धरू शकतातपरंतु त्यांच्या हातात चमचा देऊन स्वतःची कामे करू नकाबाळ स्वतःच्या हाताने खात असेल तेव्हा तुम्ही बाळासोबत आहेत ना ह्याची खात्री करा जेणेकरून जर घास बाळाच्या घशात अडकल्यास तुम्हाला त्वरित मदत करू शकाल.