गरोदरपणात शरीराला येणारा दर्प: कारणे आणि उपाय

0 21
गरोदरपणात शरीराला येणारा दर्प: कारणे आणि उपाय

गरोदरपणात संप्रेरकांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात बदल होतो आणि ही संप्रेरके आपली संवेदनात्मक कार्ये आणि भावनांवर परिणाम करतातपायाभूत चयापचय दरात बदल होतो आणि आपल्या शरीराच्या सर्व भागांमध्ये म्हणजेच अंडर आर्म्स योनीगर्भाशय आणि शरीराच्या सर्व भागात रक्तप्रवाह वाढतोअचानक तुम्हाला नेहमीसारखे उत्साही वाटेनासे होतेगरोदरपणात तुमची वासाची संवेदना अधिक तीव्र होते आणि तुमच्या शरीरातून येणार उग्र दर्प तुम्हाला नको वाटतोगरोदरपणात येणाऱ्या ह्या शरीराच्या दर्पामुळे तुम्हाला ओशाळल्यासारखे वाटू शकतेस्तनपान सुरु झाल्यानंतर सुद्धा संप्रेरकांच्या पातळीत खूप बदल होतात आणि त्यामुळे शरीराला वास येतोहा वास विशेषतजननेंद्रिय आणि काखेकडील भागात जास्त जाणवतोपरंतुगरोदर स्त्रियांमध्ये शरीराला दर्प येणे ही खूप सामान्य गोष्ट आहे.

गरोदरपणात शरीराला दर्प कशामुळे येतो?

एस्ट्रॅडिओल एक संप्रेरक आहेह्या संप्रेरकाची पातळी गरोदरपणात वाढतेत्यामुळे वास तीव्र होतोबाहेरच्या गंधांना तोंड देणे सोपे आहेपरंतु आपल्या स्वतच्या शरीराचा येणारा वास सहन होत नाहीदुर्गंधीयुक्त वासाची मूलभूत कारणं समजून घेतल्यास त्यांचा सामना करण्यात मदत होऊ शकतेगरोदरपणातील शरीराचा दर्प वाढण्यामागील प्राथमिक कारणे शोधण्यासाठी हा लेख वाचा.

संप्रेरकांमधील बदल

शरीरातील हार्मोनल पातळीत तीव्र बदल झाल्यानेविशेषतएस्ट्रॅडिओलच्या वाढलेल्या पातळीमुळे आपल्या शरीरात तीव्र वास तयार होतोहार्मोन्स हे तीव्र गंधाचे मुख्य कारण आहेसंप्रेरकांना प्रभावित करणारे मुख्य भाग जननेंद्रिय आणि काखेचा भाग ही आहेतम्हणूनच गरोदरपणात काखेमधून वास येणे गर्भवती मातांमध्ये सर्वात सामान्य आहे.

अत्यधिक घाम येणे

गरोदरपणातशरीराचे तापमान वाढते आणि गर्भवती स्त्रिया ह्या वाढलेल्या तापमानाप्रती कमी सहनशील असतातआपल्या वाढलेल्या अतिरिक्त वजनामुळे थंड दिवसातही अधिक घाम येतोगर्भवती महिलांमध्ये घाम ग्रंथी अतिसक्रिय होतात आणि शरीराचा गंध तीव्र करतातघाम गंधरहित असतोतथापिगरोदरपणात जेव्हा तो त्वचेवर राहतोतेव्हा जिवाणू वाढतात आणि त्यामुळे शरीराला येणारा वास वाढतो.

अत्यधिक घाम येणे

वाढलेली संवेदनशीलता

हार्मोन्सच्या पातळीत वाढ झाल्यानेगर्भवती महिलांमध्ये वेगवेगळ्या लालसा आणि संवेदना अनुभवल्या जाताततुमची वासाची भावना तीव्र होईल आणि तुम्हाला अगदी थोड्याश्या वासामुळे सुद्धा मळमळ होईल आणि काही वेळेला उलटीची भावना देखील तीव्र होईलबहुधा आपल्या आसपासच्या लोकांना कदाचित हा वास येणार नाही परंतु तुम्हाला मात्र तो येईलहे तुमच्या वाढलेल्या संवेदनशीलतेमुळे होते.

स्तनपान करवण्याची तयारी

तुम्ही गर्भवती असतानाशरीर स्तनपान करवण्याच्या तयारीत असतेलक्षात ठेवा की आपल्या लहान मुलास योग्य श्रवण आणि दृष्टी विकसित होण्यास थोडा वेळ लागेल आणि तोपर्यंतत्यांच्याकडे गंधाची तीव्र भावना असते ज्यामुळे त्यांना गोष्टी ओळखण्यास मदत होतेतुमच्या शरीराला येणाऱ्या गंधामुळे तुमचे बाळ तुम्हाला ओळखेलआणि हे स्वाभाविक आहे की हा गंध तीव्र असल्यास बाळ तुमच्या अधिक जवळ येईलआपल्या दुर्गंधीयुक्त काखांमुळे बाळ स्तनपानाच्या वेळी त्याचे तोंड स्तनांच्या दिशेने नेऊ शकेल जेणेकरून बाळाचे पोषण नैसर्गिक रित्या होईल.

आहारात बदल

पोषक अन्न हा गरोदरपणाचा अविभाज्य भाग आहे आणि बहुतेक गर्भवती माता विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ खातातठराविक अन्नामुळे शरीराच्या गंधात बदल होतोरेड मीटमध्ये अमीनो ऍसिड्स असतातज्यामुळे घाम काही तास किंवा काही दिवसांपर्यंत येतो आणि त्यामुळे शरीराला दर्प येतोसीफूडमुळे केवळ घामाचा वास येत नाही तर योनिमार्गाचा स्त्राव देखील होतोब्रोकोलीकोबी आणि फुलकोबीसारख्या भाज्यांमध्ये सल्फर असते जे रक्तप्रवाहामध्ये शोषले जातेत्यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर घाम येतोतसेच जिवाणूंच्या वाढीला पोषक असे वातावरण तयार होते आणि वास येतोआपण घेत असलेली काही औषधे देखील शरीराच्या गंधात बदल घडवून आणू शकतात.

बहुतेकदाकेवळ आपल्याच वासाची संवेदना वाढल्यामुळे आपल्याला ह्या गंधाची भावना येतेइतरांच्या प्रतिक्रियांबद्दल काळजी करू नकातथापितुम्हाला विचित्र रंग किंवा गंध असलेल्या योनिमार्गाच्या स्राव जाणवत असल्यासडॉक्टरांशी संपर्क साधा.

गरोदरपणात येणाऱ्या ह्या तीव्र गंधापासून सुटका होण्यासाठी काही टिप्स

  • कमीतकमी दररोज दोनदा स्नान करादिवसातून किमान दोनदा स्नान करादुर्गंधी निर्माण करणारे जिवाणू नष्ट करण्यासाठी अँटीबॅक्टेरियल साबण वापरुन पहास्वतःला कोरडे पुसण्यासाठी स्वच्छ टॉवेल्स वापरा.
  • आपली त्वचाफ्रेश ठेवाशॉवर घेत असतानाघरगुती उपचारांचा वापर करून पहाथोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये लिंबू पिळाह्या पाण्याने धुवून झाल्यावर मध घातलेल्या पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवाह्यामुळे त्वचा गुळगुळीत होते आणि बराच काळ त्वचा फ्रेश राहतेजर तुम्ही अंघोळ करीत असाल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी पुदिन्याची पाने घाला त्यामुळे उत्साही वाटण्यास मदत होईल.
  • नियमितपणे शाम्पू कराआठवड्यातून कमीत कमी तीन वेळा केस धुवातुमच्या कांगाव्यावर किंवा केसांच्या ब्रशवर परफ्युम फवारात्यामुळे जेव्हा तुम्ही हा कंगवा वापराल तेव्हा केसांना सुगंध येईलआपला कंगवा नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवा.
  • सुव्यवस्थित रहाजननेंद्रिय आणि अंडरआर्म्समधील केस त्वचेवर घाम आणि जिवाणू जमा करतातते सुव्यवस्थित ठेवा जेणेकरून घाम निर्माण होणार नाही आणि दुर्गंधी येणार नाही.

  • डीओडोरंटअँटीपर्स्पिरंट किंवा पावडर वापराताजा सुगंध येण्यासाठी आपल्या अंडरआर्मवर डीओडोरंट किंवा टॅल्कम पावडर लावाजर तुम्हाला खूप घाम येत असेल तर अँटीपर्सपिरंट वापरा कारण ते अधिक प्रभावी होईलतुम्ही जिथे जाल तिथे ते आपल्याबरोबर घेऊन जाडीओडोरंट्स आपल्याला घाम येणे थांबवित नाहीतआपल्याला फक्त छान सुगंध देण्याचे कार्य ते करीत असतात.
  • सैल कपडे घालालिनन किंवा कॉटनचे कपडे घालाह्या कपड्यांमध्ये हवा खेळती राहतेतेच तेच कपडे घालणे टाळा आणि एका वापरानंतर ते धुवाआपल्या वॉशिंग मशीन मध्ये एक कप पांढरे व्हिनेगर घालाआपण आपले कपडे स्वतंत्रपणे धुवावेत आणि त्यासाठी तुम्ही फॅब्रिक कंडीशनर वापरू शकता जेणेकरून त्यांना सुगंध येईलजर आपल्या अंडरगारमेंट्समध्ये दुर्गंधी येत असेल तरते धुण्याआधी त्यांना १/४ कप व्हाईट व्हिनेगर आणि १ कप पाणी ह्या मिश्रणात १५ मिनिटे भिजवून ठेवा.
  • सजलीत रहाशरीराचा दर्प नियंत्रित करण्यासाठी भरपूर द्रवपदार्थ घ्याकारण पाण्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि तुमची प्रणाली स्वच्छ राहते.
  • योग्य खाणेजास्त प्रमाणात कांदेलसूण आणि लाल मांस खाणे टाळाफळे आणि हिरव्या भाज्या खाल्ल्यास शरीराची गंध कमी होईल आणि ते गर्भासाठीही फायदेशीर ठरेल.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

वैयक्तिक स्वच्छतेचा एक दर्जा कायम ठेवल्यानंतर आणि खाणे अगदी योग्य असूनसुद्धा तुम्हाला शरीराचा तीव्र गंध जाणवू शकतोअशा परिस्थितीतआपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यातुमचे डॉक्टर काही औषधी साबण सुचवू शकतात किंवा आपण घेत असलेल्या औषधांमध्ये काही बदल करु शकतातलक्षात ठेवा की आपल्या शरीराला येणारा वास कधीही आपल्या बाळाला इजा करणार नाही आणि बर्‍याच वेळा तर हा वासफक्त तुम्हाला येत असतोशरीराच्या गंधापासून मुक्त होण्याचा आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे वर नमूद केलेल्या पद्धती आहेततर हे उपाय वापरून पहाआणि शरीराला येणाऱ्या वासाचा खूप जास्त त्रास करून घेऊ नका कारण तो सुद्धा एक अनुभव आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User