सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 20 January | Gondavlekar Maharaj Pravachan

#gondavalekarmaharaj #dainikshodh #gondavalekar_maharaj_pravachan_today

0 8
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 20 January | Gondavlekar Maharaj Pravachan

जेथे नाम तेथे राम ।

नामाशिवाय जो जो विश्वास । ते ते अविश्वासाचे कारण आहे खास ॥ नामाविण मानी सत्य । नाही त्याने जोडला भगवंत ॥ नामाविण मानी जग । त्याचा होऊ देऊ नये विटाळ ॥ नामाची जेथे मस्ती । तेथे रामाची वस्ती ॥ याहून जे जे वाटले सुख । ते तेच दु:खाला कारण ॥ देवळे सभामंडपे न येत कामा । ज्याने नाही ठेविले हृदयी रामा ॥ राम करून घ्या आपुलासा । तोडा तोडा जन्ममरणाचा फासा ॥ राम एक दाता । त्याचेवाचून नाही कोणी देता ॥ नामाचे अनुसंधान । प्रपंचात सर्वांचे समाधान ॥ जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण । रामास व्हावे अर्पण ॥ मोह, ममता, देहाचा अभिमान । हा संसाराचा पसारा जाण। तेथे ठेवू नये मन ॥ नाही देहाला कष्ट देऊ । अनुसंधान न द्यावे बिघडू । नामात आहे समाधान । हा विश्वास ठेवावा पूर्ण ॥

मी मागतसे एक दान । ते द्यावे तुम्ही सर्वांनी ॥ नामापरते नका मानू सुख । रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण ॥ याहून नको मज काही । एवढी भीक घालावी सर्वांनी ॥ व्यवहार, लौकिक, विषयाची आवड । हेच परमार्थाला मुख्य येईल आड ॥ त्यांना सारावे बाजूस । एक भजावे भगवंतास ॥ नाही सत्य मानू जगी काही । रामाचा आसरा घ्यावा हृदयी ॥ जोपर्यंत देहाचा संबंध । तोपर्यंत लौकिकाची चाड ॥ देह जाईल उठाउठी । लौकिक कोठे राहील पाठी ? ॥ त्याची धरू नये चाड । नाही सोडू भगवंत जाण ॥ प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी । नाही अंतर देऊ जगजेठी। चार वेद सहा शास्त्रे । सर्व केल्या स्मृति पारायण । तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर। तोवर तेथे कोठे समाधान ? ॥ सर्व शास्त्रांचे सार । एक भजावा रघुवीर ॥ नामी ठेवावे लक्ष पूर्ण । तेणे होईल समाधान ॥ नामाची धरावी कास । देहादिक प्रपंचात न व्हावे उदास । हे सर्व साधे राखता अनुसंधान ॥ आता करण्याचे उरले काही । हे किंचितही न आणावे मनी ॥ मनाने व्हावे रामार्पण । सर्व सत्कर्म-साधनांचा कळस जाण ॥ चित्त ठेवावे रामापाशी । ध्यास असावा त्याचा अहर्निशी ॥ देहाने नाही करता आले । मन रामापायी गुंतवले । रामाने त्याचे कल्याण केले ॥ राम ठेवील त्यात समाधान । हेच खरे भक्तीचे लक्षण जाण ॥ गुरूकडून घेतलेेले नाम। पावन करील जगास । हाच ठेवावा विश्वास । राम कृपा करील खास ॥ देहाची स्थिति। कायम न राहे निश्चीत ॥ ते सांभाळणे आहे जरूर । न विसरता रघुवीर ॥ रामा, तुझ्याकरिता राहिलो । हा भाव ठेवावा निश्चीती । शक्य तो स्मरावा रघुपति ॥

२०. रामचरणी लावावे मन । इतुके करावे तुम्ही थोडेफार । नाही करू दुसरी यातायात जाण ॥

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User