लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी
सोलापूर
महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारला घवघवीत यश आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आनंदाचा वातावरण आहे. महायुतीमधील घटक पक्षांत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अधिकृतरित्या अजूनही शिक्कामोर्तब झाले नाही. सोलापुरातील अजित दादांच्या शिलेदाराने जाहीरपणे सांगितले आहे, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणण्यात अजित पवारांची भूमिका महत्वाची आहे. अर्थमंत्री अजित पवार होते, म्हणूनच लाडकी बहीण योजना यशस्वी झाली. अन्यथा हे काम कुणालाही जमले नसते. राज्यातील कोणत्याही विकास कामांवर कसलाही परिणाम होऊ दिला नाही. लाडक्या बहिणीचे खरे शिल्पकार अजित दादा आहेत, त्यांना मुख्यमंत्री करा. पाहिले अडीच वर्षे अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षातील अल्पसंख्याक पदाधिकारी वसीम बुऱ्हाण यांनी केली आहे.
मुस्लिम लाडक्या बहिणींचा महायुतीला पाठिंबा -
अजित पवारांनी सर्वच समाजातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली होती. मुस्लिम महिलांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ झाला. राज्यातील मुस्लिम महिलांनी महायुतीला मोठ्या संख्येने पाठिंबा दिला. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल पहिला असता, महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मतदानादिवशीचं चित्र आठवलं तर, मुस्लिम महिलांच्या रांगा मोठ्या होत्या. अल्पसंख्याक समाजातील लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते वसीम बुऱ्हाण यांनी दिली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)