या प्रकारे हनुमानाने सुदर्शन चक्राचा, वाहन गरूडाचा जिरवला होता ”माज”…पण यानंतर श्री कृष्ण आणि हनुमान यांच्यात जे काही झाले…

0 14
या प्रकारे हनुमानाने सुदर्शन चक्राचा, वाहन गरूडाचा जिरवला होता ”माज”…पण यानंतर श्री कृष्ण आणि हनुमान यांच्यात जे काही झाले…

नमस्कार मित्रांनो, प्रभू श्रीराम यांचे भक्त, ब लशाली पवनपुत्र हनुमान यांच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत. पवनपुत्र हे बलशाली तर होतेच पण बुद्धिमान ही होते. पण त्यांनी आपल्या पराक्रमाचा कधीच ग र्व केला नाही त्यामुळे प्रभू रामाच्या प्रिय भक्तांमध्ये हनुमान सर्वात वरच्या क्रमांकावर होते.

तेत्रायुग सं पले आणि द्वापार युग सुरू झाले तेव्हा श्रीविष्णूंनी कृष्ण अवतार धारण केले. श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रासोबतच्या अनेक गोष्टी आपल्याला पुराणांमध्ये मिळतात. सुदर्शन चक्र धा र्मिक पुराणानुसार सर्वात वि नाशकारी ह त्यारांपैकी एक आहे. सुदर्शन चक्र पहिला भगवान विष्णूंकडे होते. आपल्याला तर माहीतच आहे की श्रीकृष्ण भगवान विष्णू यांचे आठवे अवतार आहेत.

भगवान विष्णुकडूनच हे चक्र श्रीकृष्ण यांच्याकडे पोहोचले होते. सुदर्शन चक्रबद्दल भागवत पुराणामध्ये वर्णन आहे की, हे चक्र कोणतीही वस्तू शोधून आणण्यासाठी सक्षम होते. आणि सर्वात जास्त वि ध्वंसक म्हणून ही सुदर्शन चक्र ओळखले जात होते. याचा वापर श्रीकृष्ण क्रो धीत झाले की दुर्जनांचा सं हार करण्यासाठी केला जात होता.

एकदा श्रीकृष्ण आपल्या द्वारकेमध्ये राणी सत्यभामा सोबत सिंहासनावर विराजमान होते आणि त्यांच्याजवळ गरुड व सुदर्शन हे देखील तेथे विराजमान होते त्यांच्या गप्पा, गोष्टी, विनोद हे चालले होते. बोलता बोलता सत्यभामा राणीने उपहासाने श्रीकृष्णाला विचारले की, हे प्रभू तुम्ही तेत्रा युगात राम अवतार धारण केला होता आणि तुमची पत्नी माता सीता होती. तर मला खरं सांगा की ती माझ्यापेक्षा सूंदर दिसत होती का?

श्रीकृष्ण या प्रश्नाचं उत्तर देणार एवढ्यात गरुड बोलला, भगवान दुनियेमध्ये माझ्यापेक्षाही जास्त वेगवान कोण उडू शकते का? तेव्हा या दोघांचे ऐकून सुदर्शनलाही रहावले नाही आणि तोही बोलला, भगवान मी तुम्हाला मोठमोठ्या युद्धात यश मिळवून दिले आहे तर या संसारामध्ये माझ्यापेक्षाही शक्तिशाली कोणी आहे का? द्वारकादिश यांना समजले होते की या तिघांनाही त्यांच्या अस्तित्वाचा गर्व आला आहे.

पण श्रीकृष्ण मनातल्या मनात हसत विचार करू लागले की या तिघांचा ग र्व कसा घालवायचा? तेव्हा त्यांना एक युक्ती सुचली आणि श्रीकृष्णाने निर्णय घेतला. त्यांनी गरुडाला आपल्या जवळ बोलवले आणि संगीतले की, गरुड! तू बजरंगबली हनुमानाकडे जा आणि त्याला सांग की की प्रभू राम हे माता सीता सोबत महालामध्ये तुझी प्रतीक्षा करत आहेत.

गरुड श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन हनुमानाला बोलावण्यासाठी उडाले. आणि इकडे श्रीकृष्णाने सत्यभामाला सांगितले की देवी तुम्ही माता सीता सारखे तयार व्हा आणि श्रीकृष्णाने प्रभू रामाचा अवतार घेतला आणि सुदर्शन चक्राला महालाच्या मुख्य दरवाजावर पहारा देण्यास सांगितले आणि माझ्या आज्ञेशिवाय महल मध्ये कोणालाही प्रवेश द्यायचे नाही असे सांगितले.

आणि ही आज्ञा घेऊन सुदर्शन चक्र महालाच्या दरवाज्यावर पहारा देण्यास उभारले. तेव्हा गरुड हनुमानजवळ गेले आणि त्यांना सांगितले की हे हनुमान प्रभू राम माता सीता सोबत द्वारकेमध्ये तुमची प्रतीक्षा करत आहेत, तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जाईन. हनुमान त्यांना म्हणाला, तुम्ही पुढे व्हा मी मागे येईन.

गरुडाला मनातल्या मनात वाटले की हे लवकर कसे येतील पण जेव्हा गरुड महालात पोहोचले तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही कारण हनुमान आधीच महालात विराजमान होते ते त्यांच्या आधी तेथे पोहोचले होते. तेव्हा हे पाहून गरूडाची मान लज्जेने झुकली. त्यानंतर राम रूपातील श्रीकृष्णाने हनुमानाला विचारले की तू विना आज्ञा महलमध्ये प्रवेश कसा केलास? तुला कोणी प्रवेशद्वारावर रोखले नाही का?

हनुमानाने खाली मान झुकवून दोन्ही हात जोडून सुदर्शन चक्राला आपल्या तोंडातून बाहेर काढले व त्यांच्यासमोर ठेवले. आणि म्हणाला प्रभू मला तुम्हाला भेटण्यापासून कोण रोखू शकतं का. या चक्राने खुप प्रयत्न केला पण मी याला तोंडात ठेवले आणि तुम्हाला भेटण्यास आलो मला क्षमा करा. यावर भगवान मनातल्या मनात हसु लागले.

नंतर हनुमानाने हात जोडून प्रश्न केला हे प्रभू, मला माहित आहे की तुम्हीच श्रीकृष्ण रूपातील माझे राम आहात पण आज तुम्ही माता सीताच्या स्थानी कोणत्या दासीला एवढा मान दिला आहे की तुमच्यासोबत सिंहासनावर विराजमान आहेत. आणि राणी सत्यभामाचा अहंकार चुर चुर झाला.

राणी सत्यभामा, गरुड आणि सुदर्शन चक्राचा अहंकार चुर चुर झाला होता. तिघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते भगवान श्रीकृष्णच्या चरणात झुकले. श्रीकृष्णाने आपल्या भक्तांचा अहंकार अशा प्रकारे हनुमान द्वारे दूर केला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User