जाणून घ्या पांडवांच्या जन्माचे विचित्र असे रहस्य..का आणि कोणत्या चुकीमुळे पांडव जन्माला आले होते..बघा त्यावेळी असे काय घडले होते..पाहून

0 57
जाणून घ्या पांडवांच्या जन्माचे विचित्र असे रहस्य..का आणि कोणत्या चुकीमुळे पांडव जन्माला आले होते..बघा त्यावेळी असे काय घडले होते..पाहून

नमस्कार मित्रांनो, आपण लहानपणापासूनच महाभारताचे दोन पक्ष पांडव आणि कौरवांच्या विषयी खूप काही ऐकले आहे. धृतराष्ट्र आणि पांडू हे दोघे भाऊ होते तर कौरव हे धृतराष्ट्रचे आणि पांडव हे पांडू पुत्र होते. पण पांडवांचा जन्म कसा झाला होता याविषयी आपण माहिती घेऊया.

पांडवांचा जन्म हा पांडूच्या वी र्य पासून झाला नव्हता. पांडू चे पाच पुत्र म्हणजेच पाच पांडव भाऊ हे विभिन्न देवतांपासून उत्पन्न झाले होते. पण हे का झाले यामागचे कारण जाणून घेऊया. एकदा राजा पांडू हा आपल्या दोन्ही राण्यांसोबत कुंती आणि माद्री सोबत वनात फिरायला गेले होते, तिथे त्यांनी दोन हरणांना प्र णय करताना पाहिले आणि पांडूने त्याचवेळी त्या हरणाला बाण मा रला.

तेव्हा त्या हरणाने पांडुला दुःखी होऊन श्राप दिला की, राजा तू मला मै थुन करताना बाण मारला आहेस. तुझ्यासारखा क्रूर व्यक्ती कोणीच नसेल. तुझ्यामुळे माझा मै थुन करताना मृ त्यू होत आहे त्यामुळे तू जेव्हा कधी मै थुन म्हणजेच काम क्रीडा करशील त्याचवेळी तुझा मृ त्यु होईल. हा श्राप ऐकल्यावर पांडूला असे वाटले की आपण खुप मोठे पाप केले आहे.

पांडू खूप दुःखी झाला आणि त्याने आपल्या दोन्ही राण्यांना संगीतले की मी आता वा सनेचा त्याग करून याच जंगलात आपले जी वन व्यतीत करेन, तुम्ही दोघी हस्तिनापूरला परत जा. हे ऐकून दोन्ही राण्या दुःखी झाल्या आणि त्या पांडूला म्हणाल्या की हे महाराज तुमच्याशिवाय जी वन व्यतीत करणे आम्हाला खूप कठीण आहे त्यामुळे आम्हाला पण तुमच्यासोबत वनात रहाण्याची परवानगी द्या.

ही विनंती पांडू ने मान्य केली आणि हे तिघे वनात राहू लागले. वनात रहात असताना पांडूने एकदा तीन ऋषींना ब्रह्मलोक जाताना पाहिले. हे सर्व ब्रह्माजीच्या दर्शनासाठी जात होते. पांडूनेही त्यांच्याकडे ब्रह्मलोक जाण्याचा आग्रह केला तेव्हा त्या ऋषींनी सांगितले की हे राजा कोणत्याही निसं तान पुरुषाला ब्रह्मलोकला जाण्याची परवानगी नाही, त्यामुळे क्षमा करा मी तुम्हाला आमच्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही.

राजा पांडूला हे ऐकून खूप वाईट वाटले. आणि त्यांनी राणी कुंतीला पुत्र प्राप्तीसाठी मदत करण्यास संगीतले. पांडू म्हणाला माझा जन्मच व्यर्थ आहे. एक सं तान हीन व्यक्ती देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण आणि मनुष्य ऋण पासून मुक्ती मिळवू शकत नाही. तेव्हा कुंती म्हणाली हे राजन मला ऋषी दुर्वासा कडून एक असा मंत्र मिळाला आहे ज्याद्वारे मी कोणत्याही देवाला आव्हान करून कोणतीही वस्तू प्राप्त करू शकते.

तेव्हा ती पांडूला म्हणाली तुम्हीच सांगा मी कोणत्या दैवताला आव्हान करू. तेव्हा पांडूने ध र्मराज ला आव्हान करण्यास सांगितले, तेव्हा त्यांना एक पुत्र प्राप्ती झाली आणि त्याचे नाव युधिष्ठिर ठेवण्यात आले. काही वेळानंतर पांडूने कुंतीला वायूदेव आणि इंद्रदेवाला आव्हान करण्यास सांगितले तेव्हा वायूदेव कडून भीम आणि इंद्रदेवाकडून अर्जुन या दोन पुत्रांची प्राप्ती झाली.

यानंतर पांडूने कुंतीला ऋषी दुर्वासा कडुन मिळालेला मंत्र माद्रीला सुद्धा देण्यास आज्ञा केली. माद्रीने दीक्षा प्राप्त केल्यानंतर अश्विन कुमार याना आव्हान केले आणि तिला दोन पुत्र प्राप्त झाले ते म्हणजे नकुल आणि सहदेव. पुत्र प्राप्ती नंतर एकदा राजा पांडू आणि राणी माद्री सोबत वनात भ्रमण करत होते, वातावरण खूपच रमणीय छान होते.

आणि अगदी शीतल वारा चालला होता अशा वातावरणात पांडूच्या मनात वा सना उत्पन्न झाली आणि ते राणी माद्री सोबत मै थुन करण्यात मग्न झाले आणि हरणाच्या श्रापामुळे पांडुचा त्याचवेळी मृ त्यू झाला आणि राणी माद्री सुद्धा त्यांच्यासोबत सती गेली आणि राणी कुंती आपल्या पाच पुत्रांना घेऊन हस्तिनापूरला परत आली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User