४० आठवड्यांच्या गर्भवती आहात आणि प्रसूतीची लक्षणे नाहीत – तुम्ही काळजी करावी का?

0 63
४० आठवड्यांच्या गर्भवती आहात आणि प्रसूतीची लक्षणे नाहीत – तुम्ही काळजी करावी का?

जेव्हा एखाद्या स्त्रीला आपण गर्भवती असल्याचे समजते तेव्हा ती उत्सुकतेने आपल्या बाळाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असते आणि गरोदरपणातील सर्व गुंतागुंत देखील सहन करण्यास तयार असतेजर तुम्ही ४० आठवड्यांच्या गर्भवती असाल तर तुम्ही ह्या जगात तुमच्या लहान बाळाचे स्वागत करण्यास तयार असणे आवश्यक आहेपरंतु४० व्या आठवड्यात सुद्धा तुम्हाला प्रसूतीची लक्षणे जाणवली नाहीत तर काय करावेते सामान्य आहे कागरोदरपणाच्या ४०व्या आठवड्याबद्दल आणि प्रसूतीची चिन्हे दिसत नसतील तर काय करावेह्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

४० आठवड्यांचे गरोदर असताना प्रसूतीची चिन्हे नसणे हे सामान्य आहे का?

तुम्ही गरोदरपणाच्या ४० व्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतर बाळाचा जन्म केव्हाही होऊ शकतो हे तुम्हाला समजतेत्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ होणे सामान्य आहे परंतु तुम्ही घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही४० आठवड्यांनंतर सुद्धा प्रसूतीची लक्षणे नसणे हे तुमच्या बाबतीत होत नाहीकारण फक्त १० टक्के बाळांचा जन्म ठरलेल्या प्रसूती तारखेला होतो.

बहुतेक बाळांचा जन्म गरोदरपणाच्या ३७ आणि ४१ व्या आठवड्यांच्या दरम्यान होतोतथापिजुळ्या किंवा एकाधिक बाळांचा जन्म सहसा ३७ व्या आठवड्यांपूर्वी होतोतसेचडॉक्टरांनी दिलेली प्रसूतीची तारीख ही अंदाजे तारीख असते आणि बाळाची वाढ आणि विकासानुसार ती बदलू शकतेकाही बाळांचा जन्म ४२ आठवड्यांनंतरही होतो आणि त्याची शक्यता फारच कमी असतेम्हणूनचजरी तुम्ही गरोदरपणाच्या ४० व्या आठवड्यात असाल आणि प्रसूतीची कोणतीही चिन्हे दिसत नसतील तर ती अगदी सामान्य गोष्ट आहे.

तुम्ही ह्याबद्दल काय करू शकता?

तुम्ही जर गरोदरपणाच्या ४० व्या आठवड्याच्या टप्प्यावर पोहोचला असाल आणि प्रसूतीची कोणतीही चिन्हे दिसत नसतील तर ताण घेऊ नका त्याने प्रसूती आणखी पुढे ढकलली जाईलत्याऐवजी खालील गोष्टी करा.

आराम करा

होयतुम्ही बराच काळ वाट पहिली आहे आणि हे २ आठवडे तुम्हाला अस्वस्थ करीत आहेत परंतु घाबरून जाण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाहीआराम करणे आणि संयम राखणे हे सर्वात चांगले उपाय तुम्ही करू शकताआपल्या मित्रमैत्रिणीसह किंवा कुटुंबातील सदस्यांसह वेळ घालवण्याचा प्रयत्न करात्यांच्याशी बोला आणि कौटुंबिक काळाचा आनंद घ्याप्रसूतीबद्दल विचार करून तुम्ही फक्त ताणात वाढ करीत आहात आणि ते चांगले नाहीप्रसूतीसाठी सज्ज होण्यासाठी तुम्ही शांत स्थितीत असणे जरुरीचे आहे कारण तुमची प्रसूती आता केव्हाही होऊ शकते.

ध्यान करा

ध्यान करणे हा आपले मन आणि शरीर शांत करण्याचा एक चांगला मार्ग आहेध्यान केल्याने आपणास तणाव व्यवस्थापित करण्यात मदत होतेमोकळ्या जागेत किंवा सभोवताली निसर्ग असेल अशा जागेत बसाडोळे बंद करामनातील सर्व विचार सोडून द्या आणि ध्यान कराध्यानामुळे तुम्हाला शांत वाटेल आणि तुमच्या बाळावरील ताण कमी होईल.

3. विश्रांती आणि झोप

आपल्या चिंता दूर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे झोप आणि विश्रांतीचांगली ८ तासांची झोप घेतल्याने तुम्हाला विश्रांती मिळेल आणि तुम्हाला पुन्हा उत्साही वाटेलजेव्हा तुमच्या बाळाचे आगमन होईलतेव्हा तुम्हाला विश्रांती किंवा झोपेसाठी वेळ मिळणार नाही म्हणून आता शक्य तितकी विश्रांती घेणे चांगले.

विश्रांती आणि झोप

तुमच्या छंदात गुंतून रहा

आता तुम्ही तुमच्या आवडत्या छंदात वेळ घालवू शकता कारण एकदा बाळाचे आगमन झाल्यावर आपल्याला त्याकरिता काहीच वेळ मिळणार नाहीछंदात मन गुंतवल्यामुळे नकारात्मक विचार आणि भावना ह्यापासून तुमचे लक्ष विचलित होईलम्हणूनचआपल्या आवडत्या छंदात गुंतण्याची ही एक चांगली वेळ चांगली असू शकतेम्हणून आपले आवडते संगीतचित्रकलागाणी ऐकणे ह्या छंदांची जोपासना करा.

पायर्‍या चढा

हे जरासे विचित्र वाटेलपरंतु गरोदरपणाच्या ४० व्या आठवड्यात पायऱ्या चढल्याने प्रसूतीस मदत होऊ शकतेपायऱ्या चढण्यामुळे ओटीपोटावर थोडा दबाव येऊ शकतो आणि प्रसूतीस मदत होऊ शकते.

एक्यूप्रेशर वापरुन पहा

ऍक्युप्रेशर ही एक जुनी थेरपी आहे ज्यामध्ये संपूर्ण शरीरावर असलेले वेगवेगळे प्रेशर पॉईंट्स दाबून एखादी व्यक्ती उपचार करू शकतेकाही प्रकरणांमध्येएक्यूप्रेशर प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करू शकतेएक्यूप्रेशर तज्ञांच्या मतेशरीरावर सहा मोठे अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट आहेत जे प्रसूतीस मदत करतातयोग्यरित्या दाबल्यासएक्यूप्रेशरच्या मालिशच्या १ ते ४ दिवसांच्या आत प्रसूती चिन्हे दिसणे सुरु होते.

एक्यूप्रेशर वापरुन पहा

लैंगिक संबंध ठेवा

होय हे खरे आहेआपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवा आणि लवकरच आपले बाळ आगमन करण्यास तयार होईलतुम्ही अनुभवलेल्या भावनोत्कटतेमुळे आकुंचन वाढण्यास मदत होते आणि वीर्यामध्ये मध्ये उपस्थित प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे देखील गरोदरपणाच्या नंतरच्या काळात प्रसूती होण्यास मदत होऊ शकते.

स्तनाग्रे उत्तेजित करून पहा

जरी हे थोडेसे अस्वस्थ करणारे असले तरीस्तनाग्रांना उत्तेजन देणे हा प्रसूतीची लक्षणे निर्माण करण्याचा एक मार्ग असू शकतोतुम्हाला वेदनादायक किंवा अस्वस्थ वाटत असल्यासतुम्ही ब्रेस्ट पंप वापरू शकतास्तनाग्रांना उत्तेजन देणे ऑक्सिटोसिन सोडण्यास मदत करतेहे संप्रेरक आकुंचनास मदत करते आणि म्हणूनच तुमची प्रसूती लवकर होऊ शकते.

आपल्या सर्वांना माहित आहे की सीसेक्शन हा गरोदरपणाच्या अनेक समस्यांवर उपाय आहेगरोदरपणाच्या ४० व्या आठवड्यात सुद्धा प्रसूतीची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत तर तुम्हाला सी– सेक्शनची आवश्यकता भासू शकते काचला तर मग आपण शोधून काढूया.

४० आठवडे आणि प्रसूतीची कोणतीही चिन्हे नसणे हे सी सेक्शनची गरज असल्याचे दर्शवते का?

जर तुम्ही गरोदरपणाच्या ४० व्या आठवड्यात असाल आणि तुम्हाला गरोदरपणाची कुठलीही लक्षणे दिसत नसतील तर काळजी वाटणे स्वाभाविक आहेपरंतु गरोदरपणाच्या इतर समस्या आणि गुंतागुंतीच्या वेळी सुद्धा सी– सेक्शन करण्याची गरज भासू शकतेजर तुम्ही ४१ आठवड्यांच्या गर्भवती असाल आणि कळा येणे किंवा गर्भाशयाचे मुख उघडणे ह्यासारखी प्रसूतीची कुठलीही लक्षणे दिसत नसतील तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सी– सेक्शन करण्यास सांगू शकतात.

गरोदर स्त्रियांच्या बाबतीत गरोदरपणाच्या ४० व्या आठवड्यात काही गुंतागुंत निर्माण होऊ शकतात 

  • उशिरा प्रसूतीमुळे बाळाच्या आकारात वाढ होते त्यामुळे जन्म कालव्यातून बाळ जाताना समस्या निर्माण होऊ शकतेया स्थितीस मॅक्रोसोमिया देखील म्हणतात.
  • गर्भाला कमी ऑक्सिजन मिळाल्यामुळे होणारा त्रासगर्भजलामध्ये मेकॅनियम असणे इत्यादीमुळे गर्भाच्या हालचालीवर परिणाम होऊ शकतो.
  • बाळाला पोषणमूल्यांचा आणि ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा.
  • गर्भजलाच्या प्रमाणात घट.

आपली अपेक्षित प्रसूतीची तारीख (ईडीडीफक्त एक अनुमान आहे आणि प्रसूती कधी होईल हे कोणी सांगू शकत नाहीम्हणूनचगरोदरपणाच्या ४० आठवड्यांनंतर तुम्हाला प्रसूतीची कोणतीही चिन्हे न दिसल्यास काळजी करण्याची आवश्यकता नाहीतुम्ही फक्त तुमच्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यातुम्हाला असलेल्या कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक समस्यांविषयी चर्चा करा आणि बाळाचे ह्या जगात आगमन होईपर्यंत थांबा.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User