गरोदरपणातील डोकेदुखीवर ११ परिणामकारक घरगुती उपाय

0 57
गरोदरपणातील डोकेदुखीवर ११ परिणामकारक घरगुती उपाय

गरोदरपणात स्त्री उत्साही तसेच चिंताग्रस्त असतेतिच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या छोट्या बाळाविषयी ती सतत विचार करत असतेगरोदरपणामुळे स्त्रीच्या शरीरात बरेच बदल घडतात तसेच डोकेदुखीमुळे अस्वस्थता येतेहोयगरोदरपणात डोकेदुखीचा अनुभव घेणे म्हणजे आजारपणमळमळ किंवा थकवा जाणवण्याइतकेच सामान्य आहेगरोदरपणात डोकेदुखी कोणत्याही वेळी उद्भवू शकते परंतु पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये ते अधिक सामान्य असतेतुम्ही गर्भवती असल्यास आणि हे लक्षण अनुभवत असल्यासतुम्ही अर्थातच एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता किंवा डोकेदुखीसाठी नैसर्गिक उपायांचा पर्याय निवडू शकता.

गरोदरपणात डोकेदुखीची सामान्य कारणे

गरोदरपणात,हॉर्मोन्स मध्ये होणारे बदल आणि रक्ताच्या प्रमाणात वाढ झाल्याने डोकेदुखी होऊ शकतेगरोदरपणात डोकेदुखीची ही सर्वात सामान्य कारणे आहेतपरंतु गर्भवती असताना डोकेदुखी होण्याची इतर सुद्धा काही कारणे आहेत.

  • ताण
  • पावित्रा चांगला नसणे
  • झोपेचा अभाव
  • रक्तातील कमी साखर
  • कॅफेन
  • निर्जलीकरण

गरोदरपणात डोकेदुखीवर नैसर्गिक उपचार

डोकेदुखीच्या समस्येवर उपाय म्हणून घरगुती उपचारांवर अवलंबून राहणे चांगले आहे कारण डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतरच औषधे घ्यावीतयाव्यतिरिक्तबाळांवर औषधांचे संभाव्य दुष्परिणाम आहेत त्याची काळजी घेणे आवश्यक आहेम्हणूनचखालील घरगुती उपचार करून पहा आणि आपण कोणतीही औषधे न घेतल्यास डोकेदुखीपासून मुक्त होऊ शकता.

भरपूर पाणी प्या

भरपूर पाणी प्या

 

हायड्रेटेड राहिल्यास गरोदरपणात डोकेदुखीपासून आराम मिळतोगरोदरपणात आपल्या शरीरास ऊर्जा मिळण्यासाठी आणि एंजाइम व प्रथिनांचे योग्य रक्ताभिसरण सुनिश्चित करण्यासाठी हायड्रेटेड रहाणे महत्वाचे आहेडोकेदुखी टाळण्यासाठी दररोज किमान ८ औंस पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

कोल्ड कॉम्प्रेस वापरा

गरोदरपणातडोक्यात वाढलेल्या रक्तवाहिन्यामुळे मायग्रेन होऊ शकतेकोल्ड कॉम्प्रेसमुळे रक्तवाहिन्या घट्ट होऊ शकतात आणि पेशी संकुचित होऊ शकतात आणि त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होतेआपल्याला आवडत असल्यास आपण कोल्ड कॉम्प्रेस विकत आणू शकता किंवा आपण घरी कोल्ड कॉम्प्रेस बनवू शकताह्यासाठी तुम्हाला फक्त स्वच्छ टॉवेल आणि एक वाटी थंड पाण्याची आवश्यकता असेलटॉवेल पाण्यात बुडवून घ्या आणि अतिरिक्त पाणी पिळून घ्याआरामदायी पृष्ठभागावर झोपा आणि टॉवेल आपल्या कपाळावर आणि डोळ्यावर ठेवा आणि हलकेच दाबाकोल्ड कॉम्प्रेस हे मायग्रेनसारख्या रक्तवहिन्यासंबंधी डोकेदुखीपासून मुक्तता मिळवण्यासाठीचा उपाय म्हणून ओळखले जाते.

हॉट कॉम्प्रेस वापरा

रक्तवाहिन्या संकुचित झाल्यामुळे रक्ताभिसरण कमी होऊ शकतेत्यामुळे गरोदरपणात डोकेदुखी होऊ शकतेकोल्ड कॉम्प्रेस प्रमाणेचशेकण्यामुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार आणि मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढवून वेदना कमी होण्यास मदत होतेतणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीमुळे चांगले उपचार केले जातातत्यासाठी तुम्हाला स्वच्छ टॉवेल आणि एक वाटी गरम पाण्याची आवश्यकता असेलटॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि जास्तीचे पाणी पिळून काढाकपाळ आणि मानेचा भाग शेका त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

थोडे आले चावून खा

मळमळण्यावर नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा वापर केला जातोमायग्रेनवर उपचार म्हणून आले वापरले जाते तसेच गरोदरपणात डोकेदुखीवर नैसर्गिक उपाय म्हणून देखील ते कार्य करतेआल्यामुळे प्रोस्टाग्लॅन्डिन्स अवरुद्ध होतातत्यामुळे ते स्नायूंचे आकुंचन उत्तेजित करतात आणि डोकेदुखी टाळण्यास मदत होतेतुम्ही कच्चे आले खाऊ इच्छित नसल्यास तुम्ही आल्याचा चहा देखील बनवू शकताआपण आल्याचा चहा कसा तयार करू शकता ते येथे दिलेले आहे.

साहित्य

  • १ इंच लांब आलं मूळ (किसलेले)
  • काही पेपरमिंट पाने (चिरलेली)
  • अर्धे लिंबू

पद्धत

मध्यम आचेवर दोन कप पाणी उकळवानंतर त्यात किसलेले आले आणि चिरलेली पेपरमिंटची पाने घालाआणखी पाच मिनिटे उकळी येऊ द्यागॅस बंद करा आणि एका कपमध्ये पाणी गाळून त्यात अर्धा लिंबू पिळून ढवळून घ्याआल्याच्या चहामुळे डोकेदुखीपासून तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

एक झोप घ्या किंवा योग करा

एक झोप घ्या किंवा योग करा

कधीकधी झोपेचा अभाव डोकेदुखी आणि मायग्रेनला कारणीभूत ठरू शकतोम्हणूनच जर आपल्याला असे वाटत असेल की झोप कमी झाल्यामुळे तुमचे डोके दुखत असेल तर एक झोप काढातुम्हाला बरे वाटेलजर तुम्हाला जास्त वेळ झोपायचे असेल तर तुम्हाला चांगले वाटेल अशा गोष्टी करा.
जर तुम्हाला खूप जास्त ताणतणाव जाणवत असेल तरयोगासने करणे चांगले आहे त्यामुळे तुम्हाला बरेच फायदे होतीलयोगामुळे तुमचा तणाव कमी होण्यास आणि तुम्हाला झोप येण्यास मदत होईलगरोदरपणात तुमच्या शरीराला योग्य व्यायाम मिळतो आहे ना हे देखील सुनिश्चित करा.

प्रसुतीपूर्व मसाज करून पहा

खांदामान आणि पाठीचा ताण कमी करण्यासाठी मसाज थेरपिस्टकडे जाजर थेरपिस्टकडे जाणे तुम्हाला शक्य नसेल तर काही मसाज असे आहेत जे घरी केले जाऊ शकतातआपल्या मानेच्या खाली आणि मनगटाजवळ हात चोळाट्रिगर पॉईंट्सबद्दल जागरूक रहाअंगठा आणि तर्जनी मधील बिंदू टाळात्यामुळे कळा प्रवृत्त होऊ शकतात.

पुदिना तेल वापरा

पुदिना तेलाचा त्वचेवर थंड प्रभाव पडतो आणि तणाव कमी होतोपुदिना तेलामुळे डोकेदुखीची संवेदनशीलता देखील कमी होतेआपल्या तळहातावर पुदिना तेलाचे काही थेंब घ्या आणि काही सेकंद आपल्या तळव्यांमध्ये ते चोळाआपल्या कपाळावर तेल लावा आणि एक मिनिट मालिश करासकारात्मक परिणामांसाठी झोपण्याआधी हे करा.

ओमेगा ३ तेल वापरा

आपल्या आहारात तेलाचा वापर केल्याने सूज कमी होण्यास मदत होतेओमेगा ३ फॅटी ऍसिड फॅटी फिशमध्ये आढळते आणि त्यामुळे डोकेदुखीची तीव्रता आणि कालावधी कमी होतोआहारात ऑलिव्ह ऑईल आणि कॅनोला तेलाचा समावेश केल्यास ओमेगा ३ तेलाचा वापर वाढू शकतोवैकल्पिकरित्याओमेगा ३ फॅटी ऍसिडच्या गोळ्या देखील घेतल्या जाऊ शकतात.

लिंबाचा रस प्या

लिंबाचा रस प्या

लिंबाच्या रसाचे असंख्य फायदे आहेत आणि डोकेदुखीशी लढणे हे त्यापैकी एक आहेलिंबाच्या रसामुळे पोटातील पेटक्यांपासून मुक्तता होते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारतेगरोदरपणामुळे शरीरातील व्हिटॅमिन सीची पातळी कमी होऊ शकतेत्यामुळे डोकेदुखी उद्भवू शकतेलिंबू देखील शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि त्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते आणि ते अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते.

लिंबाचा रस तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले साहित्य:

  • अर्धा लिंबू
  • आले किसलेले (पर्यायी)
  • गरम (किंवा उबदारपाण्याचा ग्लास

पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये थोडे आले घालाहलवा आणि प्यागर्भवती असताना घरी डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी ही एक प्रभावी पद्धत आहे

१०लव्हेंडर तेल

लैव्हेंडर तेल त्वचेला आराम देते आणि शांत करतेम्हणूनकपाळावर थोडे तेल मालिश केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.

गर्भधारणा डोकेदुखी दूर करण्यासाठी अतिरिक्त टिप्स

तुमहाला गरोदरपणात डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत.

  • दिवसभर थोडे खा आणि तुम्ही पुरेशी प्रथिने वापरत असल्याचे सुनिश्चित करा.
  • आपल्या आंघोळीच्या पाण्यात एप्सम साल्ट घाला आणि बरे वाटावे म्हणून कोमट पाण्याने अंघोळ घाला.
  • आपल्या शरीरावरचा ताणतणाव कमी करण्यासाठी अ‍ॅक्यूपंक्चर वापरुन पहा.
  • नियमित व्यायाम करा पण तो प्रमाणाबाहेर करू नका.
  • कॅफिन टाळाकारण चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणाऱ्या उत्तेजक घटकांमुळे देखील डोकेदुखी होऊ शकते.
  • सर्वात वाईट परिस्थितीतइतर कशाचाच उपयोग होत नसल्यास पॅरासिटामॉल टॅबलेट (६५० मिलीग्रामघेण्याचा विचार करा.
  • सर्वसाधारणपणेही डोकेदुखी घरात खूप व्यवस्थापित केली जातेपरंतु खालील परिस्थतीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.
  • वेदना असह्य होते.
  • डोकेदुखी सोबतच अस्पष्ट दृष्टी किंवा उजव्या ओटीपोटात वेदना आणि हात व चेहऱ्यास सूज असल्यास.
  • गर्भावस्थेच्या सहा महिन्यांनंतर डोकेदुखी सुरू होतेआणि ते टॉक्सॅमेमिया आणि प्रीक्लेम्पसियाचे लक्षण असू शकते.

डोकेदुखी ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकजण वेळोवेळी अनुभवत असतोतथापिगरोदरपणात ते गैरसोयीचे प्रमुख कारण असू शकतेवर नमूद केलेले घरगुती उपचार करून पहापरंतु जर वेदना असह्य झाल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्यातुम्हाला निरोगी आणि सुरक्षित गरोदरपणाची शुभेच्छा!

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User