252-पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सरासरी 65.41 टक्के मतदान....

पंढरपूर प्रतिनिधी --

0 78
252-पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सरासरी 65.41 टक्के मतदान....

252- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील 357 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सरासरी 65.41 टक्के इतके मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे,मनसेचे दिलीप बापू धोत्रे तर महाविकास आघाडीचे काॅंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल सावंत या उमेदवारांची चौरंगी लढत होती
पाहवयास मिळाली.आज मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागात जनतेनी उस्फुर्त प्रतिसाद देत मतदान हक्क बजावला.तसेच दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असुन या लोकशाही मार्गाने होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेत कोण बाजी मारणार आहे हे लवकरच कळेलच परंतु जनतेत ठिक ठिकाणी राजकीय चर्चा होत असताना पाहवयास मिळत आहे.

सोलापूर जिल्हा मतदार संघातील मताची टक्केवारी  सकाळी ०७:०० ते ०६:००

करमाळा -:६७.८५ टक्के 
माढा -: ७०.३६ टक्के
बार्शी -: ७२.५२ टक्के
मोहळ -: ६८.६२ टक्के
उत्तर सोलापूर -: ५६.६२ टक्के
मध्य सोलापूर -: ५३.३६ टक्के
अक्कलकोट -: ६४.३३ टक्के
दक्षिण सोलापूर -: ५८.३५ टक्के
पंढरपूर -: ६८.९७ टक्के
सांगोला -: ७३. ५९ टक्के
माळशिरस -: ५६.६९ टक्के
एकूण - ६५.४१ टक्के

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 1
Sad Sad 0
Angry Angry 0

Comments (0)

User